viral video elderly man trying to board moving train causing him to fall off along with two others video goes viral
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. तसेच अपघांताचे देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. काही अपघात लोकांच्या निष्काळजीपणामुळे घडतात. नियमांचे पालन ने केल्याने अनेकांना गंभीर दुखापतीचा सामना करावा लागतो. बस, रेल्वे, कार असे अनेक अपघातांचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अनेकदा प्रशासनाने वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याच्या सुचना देऊनही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.
सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सुदैवाने अपघात टळला आहे. पण काकांना त्यांची अति घाई संकटात घेऊन गेली आहे. इवढेच नव्हे तर त्यांच्यासोबत आणखी दोन व्यक्तींना घेऊन काका धावत्या ट्रेनमधून पडले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वाहतूकींच्या नियमांचे पालने न केल्यास गंभीर अपघातही होऊ शकतो याची अनेक उदाहरणे सर्वांनी पाहिले असतील तरीही लोक आपला जीव धोक्यात घालतात.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, कर्नाटकच्या दावणगेरेचे रेल्वे स्टेशन दिसत आहे. प्लॅटफॉर्मवरुन एक ट्रेन सुटलेली आहे. ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी आहे. याच वेळी एक काका धावत ट्रेनकडे येत असतात. बहुतेक त्यांना उशिर झालेला असतो. ट्रेन सुटून जाऊ नये म्हणून काका घाई घाईत धावत्या ट्रेनमध्ये चढतात. परंतु अचानक त्यांचा तोल जातो. यामुळे काका खाली पडतात. तसेच स्वत:सोबत आणखी दोन व्यक्तींना घेऊन काका खाली पडतात. स्वत:सोबत इतराचांही जीव काका धोक्यात घातलतात. तीघेही ट्रेनखाली आले असते, पण स्टेशनवरील लोकांच्या तत्परतेने त्यांचा जीव वाचतो. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत होत नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @desi_cravings_ या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, दावणगेरे मधील भयानक क्षण, आज दावणगेरेत धावत्या ट्रेनचे व्हिडिओ काढताना, मी असे काहीतरी पाहिले जे मी कधीही विसरणार नाही. माझ्या डोळ्यासमोर एक माणूस ट्रेनमधून पडला. हा एक भयानक आणि हृदयद्रावक क्षण होता. ही घटना धावत्या ट्रेनमध्ये चढणे किंवा दारात उभे राहून प्रवास करणे किती धोकादायक असू शकते याची स्पष्ट आठवण करून देते. सुदैवाने, मदत लवकर पोहोचली आणि जवळपासचे लोक त्याला मदत करण्यासाठी धावले. सुरक्षित रहा, जागरूक रहा. असे लिहिले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.