Viral Video: पोलिसांना बघताच तरूणाने केलं असे काही...; पाहून हसू आवरणार नाही
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे आश्चर्यकारक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की पाहून धक्का बसतो तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की, हसू आवरणे कठीण होऊन जाते. कधी मजेदार डान्स रील्स, कधी भांडण, कधी जुगाड तर कधी स्टंटचे अनेक व्हिडिओ सातत्याने सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणे कठीण होऊन जाईल. सहसा आपण पोलिसांना बघितले की घाबरतो. पण एका तरूणाने असे काही केले आहे की, तुमचा विश्वास बसणार नाही. हा तरूण रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसाच्या भोवती नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक खूप मजेशीर कमेंट करत आहेत. या व्हिडिओने सोशल मीडियावर हशा पिकला आहे.
तरूण पोलिसांभोवती आनंदाने नाचत आहे
व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक ट्रक रस्त्यावर उभा आहे. त्या ट्रकजवळ काही पोलिस कर्मचारी आहेत. दरम्यान एक तरूण तिथे आनंदात नाचताना दिसत आहे. हा तरूण कधी पोलिस कर्माचाऱ्यांच्या मागे नाचत आहे तर कधी पुढे. तसेच मधून मधून तो पोलिसांभोवती फिरत नाचत आहे. तो असे का करत आहे हे समजणे कठीण आहे. मात्र, हे दृश्य खूप मजेदार आहे. नाचणाऱ्या तरुणाला पोलीस अजिबात थांबवत नाहीत. ते आपले काम करत असतात. तर दुसरीकडे तरूण पोलीस कर्मचाऱ्याला पाहून बेफाम नाचत आहे.
हे देखील वाचा- ‘चकली की चकला’, भावाने बनवलेली चकली पाहून बहिणीने धू धू धुतला…; पाहा मजेशीर व्हिडिओ
व्हायरल व्हिडिओ
Truck के पेपर्स पूरे है🚒
ले काट ले चालान😂💫 pic.twitter.com/tJsP8v9AiS— Ritika (@Im_Ritikaa) October 26, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Im_Ritikaa या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘ट्रकचे कागदपत्र सगळे आहेत. आता चलान कट करून दाखवा.’ या व्हिडिओवर लोकांनी मजेदार प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, डान्सच्या गुन्ह्यासाठी पोलीस तुम्हाला आत टाकतील. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भावाचा स्वॅगच भारीय आणखी एका युजरने हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. सोशल मीडियावर मनोरंजन आणि विनोदाचे किती मोठे स्थान आहे, हे या घटनेवरून दिसून येते.
हे देखील वाचा- Viral Video: धावत्या ट्रेनमधून उतरत होता तरूण अन्…; पुढे जे घडले तुम्हीच पाहा