भर रस्त्यात मुलींचा हाय व्होल्टेज ड्रामा; एकमेकींच्या झिंज्या उपटत जबरदस्त हाणामारी
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो तर कधी एवढे मनोरंजक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात की हसू आवरणे कठीण होऊन जाते. अलीकडे सोशल मीडियावर भांडणाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वीच दोन शिक्षिकांमध्ये जोरदार भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत होता.
तर त्याआधी ट्रेनच्या सीटवरून बायकांच्या भांडणाचा व्हिडिओ पाहायला मिळला. सध्या असाच एक काही मुलींचा भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडिओ दिल्लीमधील नोएडाचा असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे या मुली रस्त्याच्या मधोमध भांडताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी आनंद लुटला आहे. अनेकांनी यावर आपल्या भन्नाट प्रतिक्रीया देखील दिल्या आहे.
मुलींमध्ये जोरदार भांडण
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन मुली भर रस्त्यात भांडताना दिसत आहेत. तिथे आणखी काही मुलीही उभ्या आहेत. त्या मुली त्यांची भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण भांडणाऱ्या मुली कोणालाही ऐकत नाहीत. भांडणा-या दोन मुली एकमेकींचे केस खेचून मारामारी करत आहेत. भांडण करताना दोघेही रस्त्यावर पडतात पण भांडण थांबत नाही. आजूबाजूला येणारे-जाणारे इतर विद्यार्थी देखील आहेत. दोघींमध्ये कोणत्या गोष्टीवरून भांडण झाले हे कळालेले नाही. मात्र हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील नोएडा येथील असल्याचे बोलले जात आहे.तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
Kalesh b/w Two Groups of School Girls on Road, Noida Up
pic.twitter.com/qhqjAfRj9v— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 20, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना ‘रस्त्यावर मुलींच्या दोन गटांमध्ये हाणामारी’ असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यत 89 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने म्हटले आहे की, ‘प्रकरण करवा चौथचे नव्हते का?’ तर दुसऱ्या एका यूजरने म्हटले आहे की, ‘केसांमध्ये हात अडकल्यासारखे वाटत आहे.’ आणखी एका यूजरने- ‘मुली मुलांपेक्षा कमी आहेत का? असे लिहिले आहे. तर एकाने या मुली फक्त केस पकडून का भांडतात? असेही विचारले आहे.