चेन हिसकावून पळण्याच्या तयारीत होता चोर इतक्यात....; पाहा पुढे काय घडले
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपण पाहतो जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून हसू आवरता येत नाही. डान्स रील्स, स्टंट, जुगाड, भांडण असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तसेच चोरीच्या घटनांचे कॅमेरात कैद झालेल्या अनेक घटनांचे देखील व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
अलीकडे चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ एका चेन चोरी करणाऱ्या व्यक्तीचा आहे. पण चोरी करायला गेल्यावर असे काही घडले की त्याचा चोरीचा प्लॅन फसला आणि तो एका बस ड्राव्हरच्या हुशारीमुळे पकडला गेला. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही देखील बस ड्रायव्हरचे कौतुक कराल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती चेहरा झाकून दुचाकीवर बसलेला दिसत आहे. तेवढ्यात त्याचा दुसरा साथीदार मागून धावत येतो. नंतर तो एका महिलेच्या गळ्यातील चेनहिसकावून दुचाकीवर बसतो. ते दोघे तेथून पळून जामारच होते इतक्यात तेथून जाणऱ्या बसचा ड्रायव्हर त्यांना धडक देऊन खाली पडतो. लोक पकडण्याआधीच दोन्ही चोरटे पळून जातात. पण त्यांना त्यांची दुचाकी तिथेच सोडून जावी लागते. बस चालकाच्या धाडसाचा हा व्हिडीओ कधीचा आहे हे कळालेले नाही, मात्र ही बस हरियाणा रोडवेजची असून, याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा- जोरात समुद्राची लाट आली अन् चिमुकला वाहून जाणार इतक्यात…; घटनेचा थरारक व्हिडिओ
व्हायरल व्हिडिओ
चेन झपटकर भाग रहे थे बदमाश, हरियाणा रोडवेज के ड्राइवर ने किया कमाल। 🫡 pic.twitter.com/Jd90mbKX5X
— 𝐂𝐫𝐚𝐳𝐲 𝘾𝙡𝙞𝙥𝙨 𝐁𝐫𝐨 (@Crazyclipsbro) October 15, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Crazyclipsbro या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘चिन हिसकावून बदमाश पळत होते, हरियाणा रोझवेजच्या ड्रायव्हरने केले अप्रतिम काम.’ व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी आपली मतेही मांडली आहेत. एका यूजरने म्हटले आहे की, ‘हरियाणा रोडवेजची धोकादायक एंट्री, हे भारी ड्रायव्हर्स आहेत. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, याला तुम्ही जसे करता तसे भरता असे म्हणतात. आणखी एका युजरने म्हटले आहे की, हरियाणाच्या बस ड्रायव्हरला सलाम.
हे देखील वाचा- Viral Video: ती धावती ट्रेन पकडत होती अन् असे काही झाले की…; पाहा व्हिडिओ