viral video Japani Girl Eating Fride lizard video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. स्टंट, जुगाड, भांडण, डान्स रिल्स यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तसेच तुम्ही फूड ब्लॉगिंगचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. यामध्ये विचित्र फूड कॉम्बिनेशनचे पदार्थांचे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. कधी गुलाबाचे पकोडे, तर कधी गुलाबजामचे पकोडे इथपर्यंत तर ठीक होते. पण काहींना आयस्क्रीममध्ये चीज टाकूव खायलाही सुरुवात केली.
सध्या एका वेगळाच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहताना किळस येत आहे. यामध्ये एक जपानी तरुणी फ्राय केलेल्या पालीला खाताना दिसत आहे. तसे पाहायला गेले तर चीनमध्ये अशा प्रकारच्या विचित्र खाद्य पदार्थांचे सेवन केले जाते. तेथील लोक असे काही पदार्थ खातात की आपण कल्पनाही करु शकणार नाही. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होताता. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ जपानमधील आहे.
या तरुणीने एक फूड ब्लाॉग सुरु केला आहे. यामध्ये जगातील विचित्र खाण्याचा स्वाद घेत आहे. याचा तिने व्हिडिओ देखील बनवला आहे. व्हिडिओमध्ये ही तरुणी जपानच्या एका योकोहामातील रेस्टॉरंटमध्ये फ्राय पालीचा पकोडा ऑर्डर केला आहे. शिवाय ती हा पदार्थ अगदी चवीने खाताना दिसत आहे. पकोडा एकमद कुरकुरीत असल्याचे ती सांगत आहे. अगदी तिच्या इन्स्टाग्राम पेजवर अशा विचित्र खाण्याचे अनेक व्हिडिओ आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांना अनेकांना उलटी आली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @tifaposts या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने एका युजरने हे चीनी लोकांना खाण्यासाठी दुसरे चांगले अन्न मिळत नाही का असा प्रश्न केला आहे. तर दुसऱ्या एका युजरने मी ते कधीही खाऊ शकलो नसतो असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने चीन आणि जपानमधील लोक नरकात जगत आहेत असे म्हटले आहे. अशा विविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.