फोटो सौजन्य - Social Media
Viral व्हिडीओ @akkaas.creatives या इंस्टाग्राम हॅण्डलवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच @palcifer._.production च्या कोलॅब्रेशनने ही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये घडले असे की वधू वराची मांडवात एंट्री होत आहे. चारीबाजूने रोषणाई आहे. आगीचे फव्वारे उडत आहेत. त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत होत आहे. दरम्यान, त्यात एका चिमुरडीने धावत पळत त्यांच्यामध्ये येऊन नकळत त्यांचा तो क्षण खराब झाला आहे. अशामध्ये रागावलेल्या वराने सरळ त्या चिमुरडीला आपल्या हाताने ढकलून बाजूला सारले आहे आणि त्यात ती चिमुरडी जमिनीवर कोसळली आहे.
इतकंच काही ते या व्हिडिओमध्ये घडलं आहे. पण बातमी करण्याचे तात्पर्य असे की या गोष्टी बऱ्याच प्रसंगात घडत असतात आणि या गोष्टींना आळा घालणे गरजेचे आहे. लग्नाचे हे क्षण त्या वधू वरासाठी फार विशेष असतात त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर या प्रसंगात लक्ष दिले पाहिजे. यात वधू वरचे क्षणही दूषित होणार नाहीत आणि आपल्या पाल्याला इजाही होणार नाही.
असेच काही कमेंट्समध्ये पोस्टखाली सांगण्यात आले आहे. कमेंट्स वाचून वाटत आहे की कदाचित नेटकऱ्यांच्याही आयुष्यात हा प्रसंग बऱ्याचदा घडला आहे आणि त्याचा राग त्यांनी कमेंट्समध्ये काढला आहे तर काही क्वचित नेटकऱ्यांनी वराच्या कृतीला दोष दिला.






