Viral Video Of Mumbai Local Train Drunk Man Climb on Local Train Video goes viral
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मदेशीर तर कधी धक्कादायक असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. तसेच मुंबई लोकमधील देखील अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. कधी लोकलमधील लोकांचा कामावरुन जाताना भजन म्हणतानाचा व्हिडिओ, तर कधी तरुणांचा लोकमध्ये डोन्सचा व्हिडिओ. कधी लोकलमध्ये महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ. कधी धावत्या लोकमध्ये चढताना लोकांचा व्हिडिओ असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या असाच एक मुंबई लोकलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओत एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत लोकलच्या इंजिनवर चढला आहे. यामुळे ट्रेन वेळेवर सुटायला उशिर झाला आहे.
मुंबईची लोकल ही मुंबईतील लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. थोड्या वेळासाठीही ट्रेन चुकली किंवा ट्रेनला सुटायला वेळ झाला तर लोकांचे दिवसभराचे वेळापत्रक बिघडते. लोकांच्या कामकाजावर याचा परिणाम होतो. यामुळे अनेकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. काही मद्यपी लोकांच्या कृतीने तर अनेकवेळा प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. व्हायरल होत असलेला व्हिडिओत देखील एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत ट्रेनवर चढून धिंगाणा घालत आहे. यामुळे ट्रेन सुटायला उशिर होत आहे आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, मुंबईतील एक रेल्वेस्टेशनचे दृश्य दिसत आहे. स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. याच वेळी एक व्यक्ती ट्रेनवर चढला असून त्याने मद्यपान केले आहे. त्यांने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. मद्यधुंद अवस्थेत व्यक्तीला उतरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ट्रेनचा लोको पायलट त्याला काठीने मारुन खाली उतरण्यास सांगत आहे. मात्र, व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत काही ऐकत नाही. त्याला आपण काय करत आहोत याचे भान नसते. काही प्रयत्नांनंतर लोको पायलट त्याला खाली उतरवण्यास यशस्वी होतात. मात्र, तो व्यक्ती काही ऐकत नाही, रेल्वे ट्रॅकवर जाऊन बसून राहतो. स्टेशनवरील प्रवासी देखील त्याला हटवण्याचा प्रयत्न करत असतात. पम तो कोणाचेच ऐकत नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @chal_mumbai या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहे. विशेष करुन मुंबईतील लोकांनी. याच कारणांमुळे रोज उशिर होतो असे अनेकांनी म्हटले आहे. काहींनी अशा लोकांना चांगलेच बदडून काढले पाहिजे असेही अनेकांनी म्हटले आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.