कौन है ये लोग कहाँ से आते है? द्राक्षांची भजी बनवणाऱ्यावर संतापले खवय्ये; Video तुफान व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अलीकडे सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. स्टंट, जुगाड, भांडण, सत्य घटनांवर आधारित व्हिडिओ, तसेच प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ, खाण्या-पिण्याचे असे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. लोकांना सतत काहीतरी वेगळे एक्सपिरिमेंट करत राहण्याची सवय असते. खाण्या-पिण्याचे तर अनेक एक्सपिरिमेंट लोक करत असतात. गेल्या काही काळात कोणी गुलाबाचे भजी तयार करत आहेत, तर कोणी गुलाबजामचे वडे, तर कोणी विचित्र प्रकराचे आईस्क्रीम तयार करत आहे. कोणी आईस्क्रीमवर चीझ टाकत आहेत. कोणी पाणीपुरीमध्ये मॅगी बनवून खात आहे.
सध्या असाच एक विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती भजी बनवताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा व्यक्ती द्राक्षापासून भजी बनवत आहे. तुम्ही अनेक प्रकारची भजी खाल्ली असतील, कांदा, बटाटा, मिरची अशा प्रकारची भजी तुम्ही खाल्लया असतील. पण द्राक्षापासून भजी बनवतानाचा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसले. सध्या हा व्हिडिओ पाहून अनेक खवय्यांनी यावर संताप व्यक्त केवला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती द्राक्षांची एक जुड घेतो. त्यानंतर तो बेसनमध्ये द्राक्षांची जुड बुडवतो आणि सर्व बाजूंनी त्याला बेसन लावण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर तो ती द्राक्ष उकळत्या तेलात तळायला सोडतो. व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात येईल की, द्राक्षाच्या मउपणामुळे त्याला बेसनपीठ व्यवस्थित बस नाही आणि ते नीट तळले देखील जात नाही. आता कोण ट्राय करेल अशी भजी. हा व्हिडिओपाहून तर अनेक खवय्यांनी संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @meetyourlaughs या अकाऊंटवर तयार करण्यात आला आहे. अनेकांनी संतप्त अशा प्रतिक्रिया देत अशा लोकांना बदडून काढले पाहिजे असे म्हटले आहे. एका युजरने म्हटले आहे की, आता बेसपीठावर, मीठवर टॅक्स लागले. दुसऱ्या एका युजरने काय फालतूपणा लावला आहे असे म्हटले आहे. आणखी एका युजरने भाऊ भजीवर अत्याचार होत आहे. हा व्हिडिओ बनवणारा कोम आहे, त्याला धोपटा आधी, फुड ब्लॉगरच्या नावाखाली काहीही व्हिडिओ बनवतात लोकं असेही एका युजरने म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ अनेक खवय्यांच्या संतापाचे कारण बनल आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.