viral video old lady riding bike in like a pro video goes viral
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. तसेच अलीकडे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतचे सर्वांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. डान्स, स्टंट, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. तसेच अलीकडे सर्वांनाच बाईक चालवायला येते. अगदी आजी-आजोबा देखील भन्नाट अशा वेगात स्कूटर, बाईक चालवत असतात. तुम्ही अनेक वयोवृद्ध पुरुषांना भुंगाट गाडी चालवताना पाहिले असेल. तर काही वयोवृद्ध महिला देखील गाडी चालवताना तुम्ही पाहिल्या असतील.
सध्या गेल्या काही दिवसांपासून एका आजींचा असाच काहीसा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आजी सुसाट, वाऱ्याच्या वेगाने दुचाकी चालवताना दिसत आहे. आजीचे अंदाजे वय ७० ते ८० दरम्यान असावे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आजी एका जुन्या मॉडेलच्या स्कूटरवरुन जात आहे. त्यांच्या स्कूटरला एक पिवशी देखील अडकवलेली आहे. तसेच आजीच्या स्कूटरचा वेग इचका आहे की, त्या आसपासच्या गाड्यांना मागे टाकत तुफान वेगात गाडी चालवत आहे. तुम्ही पाहू शकता की, व्हिडिओ बनवणाऱ्याच्या गाडीला देखील आजीने मागे टाकले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी यावर भन्नाट अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी, हेवी ड्रायव्हर म्हटले आहे, तर कोणी साईड व्हा! नातवाचा मॅटर झालेला दिसतोय असे म्हणत आहे, तर कोणी आजीचा नादच खुळा असे म्हणत आहे. काहींनी गॅंगस्टर आजी, रॉकिंग दादी, दादी बदमाश असे म्हटले आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर @humourshubb या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.