(फोटो सौजन्य: Instagram)
सध्या लग्नांचा हंगाम सुरू असून, सोशल मीडियावर लग्नांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यात डान्स, गाणी, प्रथा, तसेच नवरदेव-नवरीचे खास क्षण चर्चेत असतात. लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील खास आणि लक्षात राहणारे क्षण असले तरी काही वेळा एका चुकीमुळे संपूर्ण वातावरण बिघडू शकते. लग्नात फटाके फोडणे एक आजकाल फार सामान्य आहे मात्र कधीही फटाके फोडताना विशेष काळजी घेणे फार गरजेचे असते अन्यथा नको ते अपघात घडू शकतात. असाच काहीसा प्रकार एका लग्नात घडून आल्याचे समोर आले ज्यात फटाक्यांमुळे लग्नाचा अख्खा मंडपचा पेटून उठला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
काय दिसले व्हिडिओत?
व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते की मंडपाला आग लागलेली आहे. काही लोक धावपळ करत असून, काही मंडप उखडत आहेत तर काही पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही दृश्य पाहून कोणालाही धक्का बसेल. या व्हिडीओवर एक संदेशही दिला आहे – “फटाके उडवताना काळजी घ्या. लहान मुलांच्या हातात देऊ नका.” व्हिडीओच्या कॅप्शननुसार, ही घटना नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातल्या सावरगावात घडली आहे. लग्नामध्ये फटाके फोडताना ही घटना घडली. त्यामुळे अशा प्रसंगी सुरक्षितता पाळणे अत्यंत आवश्यक आहे. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, लोक हा व्हिडिओ चांगलाच शेअर देखील करत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @ram_phalke77 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘सावरगाव तालुका मुखेड ..काल ची घटना आहे…..लग्नामध्ये फटाके उडवताना थोडी काळजी घ्यावी.. लहान मुलांच्या हातात फटाके देऊ नयेत’ असे लिहिण्यात आले. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहे तर अनेकांनी यावर आपल्या कमेंट्स देखील शेअर केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मुलीच्या बापाला अजून भरपाई द्यावी लागेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण मी म्हणतो लग्नाच्या वेळी फटाके फोडलेच पाहिजे का”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.