मासा टाकून बनवला चहा व्हिडीओ पाहून चहाप्रेमींना बसला धक्का
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. काही असे व्हिडीओ असतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर काही मजेशीर व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. अलीकडे तुम्ही खाद्यपदार्थांचे देखील व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील. लोक असे असे पदार्थ बनवतात की, पाहून खावेस वाटतात. तर काहीजण असे काही बनवतात की किळस येते. असे व्हिडीओ पाहून तो पदार्थ खाण्याची देखील इच्छा होत नाही.
चहाचे तर अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. अनेकजण असे असे चहा बनवतात की ते पाहून चहाप्रेमी देखील चक्रावून जातात. कोणी चहामध्ये केळी टाकते, तर कोणी आईसक्रीम. यांसारखे वेगवेगळे एक्सपिरीमेंट सतत कोणी ना कोणी करत असते. सध्या असाच एक विचित्र व्हिडीओ व्हायरल होत आहे. या चहामध्ये चहाची पाने, दूध, साखर आणि आले यांच्यासोबत आणखी एक खास गोष्ट जोडण्यात आली आहे. या खास वस्तूचे नाव आहे मासे.
फिश टी
@price_trader_ नावाच्या युजरने एक्सवर फिश टी पोस्ट केला आहे. या अकाऊंटवर अनेक व्हायरल व्हिडिओ शेअर केले जातात. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती चहा बनवत आहे. पण अचानक चहा बनवणारी व्यक्ती अचानक त्यात माशाचा तुकडा टाकते. मग ती चहा गाळते. ती चहा गाळून कपात ओतते आणि शिजलेले मासे कपावर काठीने ठेवते. व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, यापूर्वी एका व्हिडिओमध्ये ती चहा बनवत होती, त्यानंतर कोणीतरी कमेंट करून तुम्ही बंगाली आहात, मासे घालून चहा बनवा, असे म्हटले आहे. म्हणूनच हा चहा बनवला आणि पुढे विचारले, मला सांगा दुसरा कोणता चहा बनवायचा?
हे देखील वाचा – गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला पाठवले सरप्राईज; रिसीव्ह करायला आला अन्…पाहा व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
Where are Chai lovers? ☕
Here’s something for you 😉 pic.twitter.com/aDS0SjbmoW— SOUVIK (@price_trader_) October 2, 2023
चहाप्रेमी चक्रावले
व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्यांना चहा आवडतो ते लोक कमेंट करत आहेत, पण ज्यांना चहा आवडत नाही तेही कमेंट करत आहेत. राजू नावाच्या युजरने लिहिले, ‘थांब भाऊ. पाहिल्यावर मरेल मी, आणकी एका युजरने लिहिले, ‘भाऊ, अशा चहाचा व्हिडिओ दाखवला आहे की आता चहा दिसताच त्यात मासे दिसू लागतात.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘हे बघून मला जवळजवळ उलट्या झाल्या.’ आपले दु:ख व्यक्त करताना एका यूजरने लिहिले की, ‘भाऊ, मी शाकाहारी आहे, काहीतरी सोडा’