'ट्रेनच्या खिडकीतून लोकांना चढवायला सुरूवात केली अन्...'; पाहा व्हिडिओ
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा हास्यास्पद व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही ट्रेनचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. कोणी भांडताना तर कोणी चालत्या ट्रेनमधून उतरताना-चढताना असे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. सध्या एका वेगळाच व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत.
तुम्हाला माहितच असेल ट्रेनच्या जनरल भागामध्ये नेहमीच खूप गर्दी असते. ट्रेन सुटण्याच्या कित्येक तास आधी प्रवासी रांगेत उभे असतात. म्हणजे त्यांना ट्रेनमध्ये जागा मिळेल. काही लोक तर अशा युक्त्या करतात की हैराण व्हावे लागते. अशाच एका जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती आपल्या ओळखीच्या लोकांना सीट मिळवण्यासाठी ट्रेनच्या खिडकीतून चढवत आहे. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.
सीटसाठी ही कसली युक्ती आहे?
या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्रेनमध्ये चढण्यासाठी लांबच लांब रांग दिसत आहेत. याच दरम्यान एक सामान वाहू लोकांना ट्रेनच्या खिडतीतून चढवत आहे. तो व्यक्ती काही लोकांना ट्रेनच्या खिडकीतून आतमध्ये चढवतो. याशिवय तो त्यांचे सामानही खिडकीतून आतमध्ये फेकत आहे. एका महिलेलाही त्याने आत मध्ये असेच चढवले आहे. एकीकडे लोक फाटकातून ट्रेनमध्ये घुसून सीट मिळवण्याचा प्रयत्न करत होते, तर दुसरीकडे या व्यक्तीला खिडकीतून लोकांना चढवत आहे. दरम्यान, कोणीतरी त्या व्यक्तीचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला.
व्हायरल व्हिडिओ
“ट्रैन पर बैठा कर आऊँगा” got real 🚊👀 pic.twitter.com/lBQuL4l2j1
— Tamanna 💞 (@BewithTamanna) October 14, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @BewithTamanna या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकजण हा व्हिडिओ पाहून हैराण झाले आहेत. तर काहींना ही आयडिया भारी वाटली आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, या भावाला कशाचीच पर्वा नाही, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, असे पण कुणी बसवते का? तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, हे दृश्य खरेच मनोरंजक आहे. अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी शेअर करत भारी जुगाड म्हटले आहे.