Viral video Rhino casually walks into wedding video viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. स्टंट, भांडण, जुगाड, यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसेच लग्नासंबंधी देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्न हा नवरा-नवरीसाठी आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. या दिवसाला खास बनवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे, डान्सचे आयोजन, रंगीबेरंगी सजावट, पाहुणे अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टीं लग्न समारंभात असतात. पण काही वेळा काही छोट्या छोट्या गडबडी देखील होतात. यामुळे लग्नानातील प्रत्येक क्षण अतिशय विस्मरणीय बनतात.
अनेकवेळा काही अनअपेक्षित पाहुणे देखील लग्नाला येतात. असे काहीसे नेपाळमध्ये घडलेले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नामध्ये एक गोंडस असा अनपेक्षित पाहुण्यानेने वाईल्ड कार्ड एन्ट्री मारलेली आहे. नेपाळच्या चितवनमध्ये एका लग्नसमारंभात ही अनोखी घटना घडली आहे. रिसेप्शन सोहळ्यावेली अचानक एक गेंडा थेट समारंभात आला आहे. नेपाळमधील चितवन एक प्रसिद्ध जंगल पर्यटन स्थल आहे. या ठिकाणीं गेड्यांचे प्रमाण अधिक आहे. एक गेंडा लग्नसमारंभात भटकत आला होता. अनेक लोक गेंड्याला पाहून उत्सुक झाले होते. तर काही जण घाबरले होते. याचा व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
A one-horned rhino gate crashed a wedding in Nepal.#greaterjammu pic.twitter.com/SsgySYGuGi
— Greater jammu (@greater_jammu) May 27, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असेलाला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @greater_jammu या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरही हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने व्हाट अ जेंटलमॅन असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने स्वागत नही करोगे हमार असे म्हटले आहे. आणखी एकाही नेटकऱ्यांनी नवऱ्याला घोडी नाही मिळाली बहुतेक असे म्हटले आहे. अनेकांनी किती गोंडस अशी कमेंट केली आहे. हार्ट इमोजी देखील यावर शेअर करण्यात आले आहेत. हा व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.