चीनमध्ये आयोजित करण्यात आली रोबोटची पहिली किक-बॉक्सिंग स्पर्धा; VIDEO व्हायरल, ( फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मानवाने गेल्या काही काळात तंत्रज्ञानामध्ये अनेक मोठे बदल घडवून आणले आहेत. यामुळे मानवाचे जीवन सुलभ आणि सोपे झाले आहे. रोज काही ना काही नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागत आहे. आतापर्यंत मानवाने ज्याची कल्पना देखील केली नसेल असे अनेक शोध लागले आहेत. यातीलच एक अनोखा शोध म्हणजे रोबोटचा शोध आहे. रोबोटमुळे मानवाचे आयुष्य अगदी सोपे झाले आहे. रोबोट मानवाच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनला आहे.
अनेक मोठ मोठ्या रेस्टॉरंटमध्ये, कॅफेत रोबोट सेवा देताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियाने हज यात्रेदरम्यान मक्का आणि मदिनाच्या मशिदीत एक रोबोट ठेवला आहे. हा रोबोट लोकांच्या मदतीसाठी मशिदीत ठेवण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर चीनमधील रोबोटच्या किक-बॉक्सिंग स्पर्धेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या हांगझोऊमध्ये रविवारी २५ मे रोजी रोबोटच्या किक-बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पहिलीच ह्यूमोनॉइड रोबोट किक-बॉक्सिंगची स्पर्धा होती.
मीडिया रिपोर्टनुसार, चायनाच्या मीडिया ग्रुप वर्ल्ड रोबोट स्पर्धेचा भाग म्हणून रोबोटची किकबॉक्सिंग चॅम्पियनशीप आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत चार G-1 ह्यूमनॉइट रोबोट्समध्ये ही स्पर्धा झाली. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन रोबोट्स एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. एका रोबोटने काळ्या रंगाचे हेल्मेट आणि ग्लफ्ज घातले आबेत, तर दुसऱ्या रोबोटने गुलाबी रंगाचे. या रोबोटचते नियंत्रण तिथेच बाजूल असलेल्या दोन व्यक्तींच्या हातात आहे. रिमोट कंट्रोलच्या मदतीने दोन्ही रोबोट्समध्ये फायटिंग सुरु आहे. तसेच यासाठी लोकांची गर्दी देखील जमली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
🇨🇳 Robot gets KO’d in the world’s first humanoid ROBOT FIGHTING tournament in China pic.twitter.com/Abkux5FZnj
— Dott. Orikron 🇵🇹 (@orikron) May 25, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्सवर @orikron या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत, एका युजरने “हे काहीतरी मजेशीर आहे” असे म्हटले आहे. दुसऱ्या एकाने चीन जगाच्या कितीतरी पट पुढे आहे, तर तिसऱ्या एकाने सावधान, सॉफ्टवेअर सर्व लक्षात ठेवेल आणि एकदिवस मानवविरोधात वापरले असे म्हटले आहे. काहींना ही स्पर्धा मजेशीर वाटली आहे, तर काहींना भविष्यात मानवासाठी धोका असल्याचे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.