सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा अशा गोष्टी पाहायला मिळतात ज्यामुळे आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा अशा मनोरंजक गोष्टी समोर येतात ज्या पाहिल्यावर हसू आवरता येत नाही. कधी जुगाडचे, तर कधी भांडणाचे जबरदस्त व्हिडिओ व्हायरल होतात तर कधी धोकादायक स्टंटचे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. याशिवाय अनेक प्रकारच्या ट्रकच्या, गाडीवरच्या, पुणेरी पाट्यांचे व्हिडीओ देखील आपल्याला पाहायला मिळतात.
सध्या असाच एक ट्रकच्या पाटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्रक ड्रायव्हरने असा काही मेसेज सोशल मीडियावर लिहिला आहे की, सध्या सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. हा मेसेज पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. यासाठी तुम्ही हा व्हिडिओ एकदा पाहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की, ट्रक ड्रयव्हरने नक्की काय मेसेज दिला आहे. या ट्रक वर दिसत असलेल्या नंबर प्लेटवरून हा ट्रक मध्यप्रदेशमधील असल्याचे कळून येते.
भन्नाट पाटी
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हायवे वरून एक भलामोठा ट्रक काही सामान घेउन जात आहे. या ट्रकच्या मागच्या बाजूला एक पाटी लावलेली आहे. त्या पाटीवर एक भला मोठा मेसेज लिहलेला आहे. हा मेसेज वाचल्यावर तुम्हाला नक्कीच हसू येईल. आणि थक्कही व्हाल. या पाटीवर हिंदीमध्ये लिहिले आहे की, ‘इतनी ही जल्दी है तो फिर हवाई जहाज मे सवारी कर बार बार हॉर्न बजाकर दिमाग मत खराब कर’ म्हणजे ‘एवढीच घाई आहे, तर विमानातून प्रवास कर, हॉर्न वाजून डोकं खराब करू नको. असे लिहिलेले आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर kem_cho_rajkotiyans या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ‘काहीही म्हणा, भावाने एक नंबर मेसेज लिहिलाय.’ तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, ‘मध्यप्रदेशातील लोक असेच असतात सर्वांचे डोकं खराब करतात.’ आणखी एका युजरने ‘इंदोरवाले काहीही करू शकतात.’ त्यांचा नाद नाही करायचा असे म्हटले आहे. अनेकांनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे.