अति घाई संकटात नेई! घाईघाईत महिला रेल्वे रुळावर पडली इतक्यात...; VIDEO व्हायरल
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड आणि भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसेच अनेक अपघातांचे देखील व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा हे व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक रेल्वे अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना घाम सुटला आहे.
बऱ्याचवेळा लोक कुठेही जाण्यास उशीर झाला की घई करतात. अशा वेळी लोक रस्ता, रेल्वेरुळवरुन पळत सुटतात. मात्र, अति घाई संकटात नेई असे काही तरी घडते. अनेकदा रस्ता क्रॉस करताना किंवा रेल्वेरुळावरुन जाताना अपघात होऊ शकतो. व्यक्ती संकंटात सापडू शकतो. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ या संबंधीतच आहे. या व्हिडिओत एक महिला मालगाडीच्या खाली अडकली आहे. सध्या हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका रेल्वेट्रॅकवरुन एक मालगाडी वेगाने जात आहे. दरम्यान मालगाडीच्या खाली एक महिला अडकलेली दिसत आहे. मालगाडी अत्यंत वेगाने धावत असून महिला रुळावर झोपलेली आहे. काही वेळाने नागरिकांना समजताच सगळे तिच्या मदतीसाठी धावून येतात. ट्रेनचा वेग कमी होताच जमलेले नागरिक तिला सुखरुप बाहेर काढतात. मात्र, तिच्या घाईघाईत जाण्याने अडकल्याचे सांगितले जात आहे. तिला ही अति घाई संकटात ओढावून घेऊन गेली पण इतर लोकांच्या प्रसंगावधानाने तिचे प्राण वाचले.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
In a hurry, a woman fell on the railway track. Just then an army special goods train arrived. The woman lay down in the middle of the track. The entire train passed over her. The woman is absolutely safe, Mathura UP
pic.twitter.com/jRtTH3dP1D— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) January 7, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, काकू, कशाला एवढी घाई करायची, तर दुसऱ्या एका युजरने तिला सुखरुप वाचवणाऱ्यांचे कौतुक केले आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत असून या व्हिडिओतून लक्षात घेण्यासारखे आहे की, अति घाई केल्याने संकट ओढावते. यामुळे आपल्याला गंभीर दुखापत होऊ शखते किंवा आपला जीव देखील जाऊ शकतो.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक कर
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.