धक्कादायक! दुकानदाराच्या नकळत महिलांची चोरी, मुलीला देखील केले सामील; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले...
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्यालाला पाहायला मिळतात. अनेकदा मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. याशिवाय, सत्य घटनांवर आधारित व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. कधी अपघातांचे तर कधी चोरीच्या घटनांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक चोरच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दुकानदाराच्या नकळत या महिलांना जीन्सची चोरी केले आहे.
मात्र, धक्कादायक बाब म्हणजे या महिलांना लहान मुलीसमोरच चोरी केली आहे. या व्हिडिओमुळे अनेकजण हैराण झाले आहेत. असे म्हणतात लहान मुले तेच शिकतात जे मोठी माणसे करतात. वडिधाऱ्यांकडूनच चांगल्या-वाईट सवयी ते शिकतात. यामुळे या दृश्याने अनेकांची झोप उडाली आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. मात्र, हा व्हिडिओ अद्याप कुठाला आणि कधीचा आहे याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की,. दोन महिला जीन्सच्या दुकानात खरेदीसाठी आलेल्या दिसत आहेत. तसेच या महिलांसोबत एक मुलगी देखील आहे. तसेच तिथे आणखी एक महिला देखील उभी राहिलेली आहे. त्यांच्या समोर टेबलवर दुकादाराने काही जिन्स दाखवण्यासाठी ठेवल्या आहेत. तसेच तो आणखी जिन्स देखील दाखवण्यासाठी काढत आहे. त्याचवेली या महिला तेथील एक जिन्स उचलतात आणि हातात असलेल्या पिशवीत टाकतात. विशेष म्हणजे ती पिशवी त्या मुलीच्या हातात असते. त्यानंतर त्या महिला दुसरी जिन्स बघण्याचे नाटक करतात. हे सगळे दुकानदाराच्या नकळत घडते. हे दृश्य व्हिडिओ दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @kucch_bikhre_ahsaas या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, भाऊ यांनी आपल्या मुलीली देखील यात सामील केले. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, या महिलांना कशाचीच भिती वाटली नाही का. यामुळे लहान मुलांना चुकीचा संदेश मिळत आहे. अशा प्रतिक्रीया देत लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. काहींना यावर तक्रार करुन त्या महिलांना शिक्षा झाली पाहिजे असे म्हटले आहे. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.