फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सध्या सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की पाहून अंगावर काटा येतो. अपघातांचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या रस्ते अपघातांचे प्रमाण खूप वाढले आहे. काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे घडतात, तर काही अपघात दुसऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे होतात. नियमांचे पालन करण्याच्या सततच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून वाहन चालवण्यामुळे अनेकांचे प्राण धोक्यात येतात.
एक अपघात कोणाचे तरी आयुष्य संपवू शकतो, हे दुर्लक्षिले जात आहे. सध्या असाच एका भीषण अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर अंगावर अक्षरशः काटा येतो. मात्र, हा अपघात कुठे घडला आणि कधी याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. हा व्हिडिओ पाहून अनेकजणांचा थरकाप उडाला आहे. नेमके काय घडले ते आपण जाणून घेऊयात.
नेमकं काय घडलं?
व्हायरल होत असेलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकती की, व्हिडिओमध्ये एक बस जाताना दिसत आहे. व्हिडिओत बसच्या आतील दृश्य कॅमेरात रेकॉर्ड झालेले आहे. यामध्ये एक महिला आणि लहान मुलगा प्रवास करत आहे. संपूर्ण बस रिकामी आहे. अचानक बस रस्त्वायरुन जात असताना, बाडूने भरधाव वेगाने एक गाडी येते आणि बसला धडक देते. या धडकेत बस उलटते आणि त्यामध्ये असलेली महिला जोरात फेकली जाते तर मुलगाही जमिनीवर आपटतो. या अपघातामध्ये मुलाला दुखापत होते. मात्र, संकटाच्या क्षणी महिला धीर सोडत नाही. ती मुलाला उचलून घेते आणि त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करते.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला सहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी हा अपघात पाहून धक्कादायक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, हा व्हिडीओ पाहून लक्षात येते की, रस्त्यावरील वाहनचालकांनी नियमांचे पाळणे किती महत्त्वाचे आहे. तर दुसऱ्या एका युजरने त्या चिमुकल्याला काही झाले नाही ना असा प्रश्न विचारला आहे. आणखी एकाने नियम पाळून गाडी चालवणे हेच आपल्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे असे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.