'सारा जमाना हसीनों का दीवाना'! वरमायांचा LED पदर पाहून चमकतील डोळे; व्हिडिओ तुफान व्हायरल
सोशल मीडियावर रोज दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. अनेकवेळा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहिल्यावर हसून पोट दुखून येते. तसेच कधी जुगाड, कधी स्टंट, तर भांडणांचे डान्सचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. याशिवाय तुम्ही लग्नाचे देखील अनेक व्हिडिओ व्हायरल होताना पाहिले असतील.
कधी कपल्सच्या डान्सचे तर कधी घरातील सदस्यांच्या डान्सचे असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा त्यांच्या भन्नाट डान्समुळे तर कधी कॉस्ट्यूममुळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक कोळी समाजाच्या लग्नातील काही महिलांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ त्यांच्या डान्समुळे नाही तर अनोख्या साडीमुळे हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला पहिल्यांदा अमिताभ बच्चनच्या सारा जमाना हसीनों का दिवाना गाण्यातील कॉस्ट्यूम आठवेल.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, असे काय केले आहे या महिलांनी की अमिताभ बच्चनच्या गाण्यातील कॉस्ट्यूम आठवेल. तर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या महिला एकत्र एका कोळी गाण्यावर नाचत आहे. विशेष म्हणजे या महिलांच्या साडीच्या पदराला LED लाईट लावलेली आहे. ती लाईट तमकत आहे. आणि या महिला मस्त डान्स करत आहेत. काही मुली देखील तिथे डान्स करत आहेत. मात्र या महिलांचा हा व्हिडिओ त्यांच्या अनोख्या साडीमुळे चांगलाच चर्चेत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल पाहण्यासाठी येथे क्लिक करा व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशळ मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर banjopremi_kavi_official या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, लाईटला चार्जिंग कुठून होत आहे, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, साडी फॉल नाही बिडींग लाउन नाही मिळणार तर साडीला LED लाईट लाउन मिळेल. आणखी एकाने म्हटले आहे की, अशी साडी कुठे मिळेल. चौथ्या एकाने म्हटले आहे की, कोळी लोकांचा नाद नाय करायचा. अशा प्रतिक्रीया लोकांनी व्हिडिओवर दिल्या आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.