फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा काय पाहायला मिळेल याचा नेम नसतो. कधी डान्स रिल्स तर कधी जुगाड तसेच स्टंट अशा अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसेच तुम्ही ट्रेन संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. लोकांना जीव धोक्यात घालून ट्रेनमध्ये चढताना, स्टंट करतानाचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मात्र, या व्हिडिओत काही वेगळेच दृश्य दिसलत आहे. काही लोक बाळाला धावत्या ट्रेनमध्ये चढत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अनेकांनी व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांनी या व्हिडिओ संतापजनक प्रतिक्रीया देकील दिल्या आहेत. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही लोक ट्रेनमध्ये चढत आहेत. एकजण चढून सर्व सामान वर घेतो. त्यांनंतर एका चिमुकलीला वर चढवण्यात आणखी दोनजण मदत करत असतात. त्यांच्या हातात एक लहान बाळ पण असते. ते त्या बाळाला चढवायला जातात त्याच वेळी अचानक ट्रेन चालू होते. तरी देखील या लोकांना भिती वाटत नाही. ते त्या बाळाला ट्रेनमधील एका माणसाच्या हातात देतात. त्यानंतर बाकी दोघे तिकून निघून जातात. ते त्यांच्या परिवारातील लोकांना सोडवण्यासाठी आले असतील. मात्र अशा परिस्थितीत जर ट्रेनचा स्पीड जास्त असतात तर त्या बाळाचा गंभीर दुकापत झाली असती.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @lumafact या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी संतापजक प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, अलीकडे लोकांना कशाचीच भिती राहिलेली नाही, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, आईला कसे काही वाटत नाही. आणखी एकाने अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे त्या बाळाचा जीव धोक्यात घालताना त्यांना काहीच कसे वाटले नाही. चौथ्या एकाने बॅग आधी दिली आणि नंतर बाळ दिले हे फार धक्कादायक होते. अशा प्रतिक्रीया लोकांनी दिल्या आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.