पोलीस महिला अधिकाऱ्याने ओलांडली मर्यादा, ऑन ड्युटीवर असताना केले किस, लज्जास्पद Video Viral
राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे असतात. देशात चोरी, दरोडा हे गुन्हे रोखण्यासह राज्यात महिलांसाठी सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी देखील पोलिसांवर असते. मात्र पोलिसच कायदा आणि सुवस्था मोडत असतील तर काय? होय असे खरेखोर घडले आहे. सध्या सोशल मीडियावर एका महिला अधिकाऱ्याचा एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला पोलीस अधिकारी भररस्त्यात एका महिलेच्या ओठांचे चुंबन घेताना दिसत आहे. व्हिडिओतील लज्जास्पद कृत्य पाहून आता अनेक युजर्स यावर तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
काय आहे प्रकरण?
ही घटना पश्चिम बंगालमधील सिलीगुरी येथे घडली आहे. यात एक महिला पोलीस अधिकारी पेट्रोलिंग ड्युटीदरम्यान मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) पदावर तैनात असलेल्या तानिया रॉय असे या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ही महिला पोलीस अधिकारी इतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह महिलांच्या सुरक्षिततेसाठी परिसरात पिंक पोलिस मोबाइल व्हॅनमधून पेट्रोलिंग करत होती. बुधवारी रात्रीच्या सुमारास पेट्रोलियम दरम्यान या पिंक व्हॅनने एका गाडीला धडक दिली. या घटनेनंतर अनेक स्थानिक महिला घटनास्थळी जमा झाल्या आणि त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसह वाद घालण्यास सुरुवात केली.
हेदेखील वाचा – Video Viral: म्हशींच्या कळपाला पाहून सिंहाची हवा झाली टाइट, झोपेचे नाटक करू लागला तितक्यात म्हशींनी केलं असं…
यावेळी घाटांस्ताहली उपस्थित असलेल्या महिलांनी तानिया रॉय या महिला पोलीस अधिकारी दारूच्या नशेत असल्याचा दावा केला. यांनतर तानिया रॉय यांनी आपण मद्यप्राशन केले की नाही हे तपासण्यासाठी वाद करत असलेल्या महिलांपैकी एका महिलेला आपल्या जवळ ओढले आणि तिच्यासोबत लाजिरवाणे कृत्य करण्याचा प्रयत्न करू लागले. यावेळी त्यांनी महिलेला जबरदस्तीने किस देखील केले. या घटनेमुळे आता कोलकाता पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या घटनेची संपूर्ण दृश्ये स्पष्ट दिसतील. यात दिसते की, महिला पोलीस अधिकाऱ्याने बाजूला उभ्या असलेल्या महिलेला अचानक आपल्याजवळ ओढले आणि तिला काही समजेल तितक्यातच तिच्या ओठांचे चुंबन घेतले. व्हिडिओत पुढे ही महिला अधिकारी तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करते मात्र लोक तिच्यावर संतापून तिला तेथून जाण्यास रोखतात आणि व्हिडिओचा इथेच शेवट होतो. या घटनेनंतर पुढे काय झाले याबाबत ककोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र व्हिडिओतील पोलीस अधिकाऱ्याचे धक्कादायक कृत्य पाहून आता अनेकजण यावर आपला संताप व्यक्त करत आहेत.
Only in Bengal a drunk policeman tries to kiss women in the streets & walks away freely.
Good going @KolkataPolicepic.twitter.com/7NVkyXyUTb
— Squint Neon (@TheSquind) October 25, 2024
हेदेखील वाचा – धक्कादायक! पाईपमध्ये रॉकेट टाकून थेट व्यक्तीच्या अंगावर सोडला अग्निबाण, Viral Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का
या धक्कादायक आणि लज्जास्पद घटनेचा व्हिडिओ एकाने आपल्या कॅमेरात कैद केला आणि नंतर याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हायरल व्हिडिओ @TheSquind नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘बंगालमध्ये एक मद्यधुंद पोलिस रस्त्यावर महिलांचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करतो आणि मुक्तपणे फिरतो’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बास्टर्डला निलंबित करा आणि जेलमध्ये टाका” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही महिला पोलीस आहे ना?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.