प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेक लोकांना प्राण्यांचे असे व्हायरल व्हिडिओ पाहायला फार आवडते. यातील बरेच व्हिडिओ इतके थरारक असतात की त्यांना पाहून बऱ्याचदा थक्क व्हायला होते. प्राणी म्हटले की आपोपाप आपल्या मनात सिंहाचा विचार येतो. सिंहली जंगलाचा राजा म्हटले जाते. सिंहाचे अनेक थरारक व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र तुम्ही कधी घाबरलेल्या जंगलाच्या राजाला पाहिले आहे का? नाही तर मग आजच्या या व्हायरल व्हिडिओत तुम्हाला हे दृश्य पाहायला मिळणार आहे.
सिंह आणि म्हशीच्या कळपाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये सिंहाला म्हशींच्या कळपातून निसटण्यासाठी बेशुद्ध पडण्याचे नाटक करावे लागले, मात्र तरीही तो सुटू शकला नाही. म्हशींचा कळप तिथे आल्यावर सिंहाचे झालेले हाल व्हिडिओत दिसून येत आहेत. त्यांना पाहताच जंगलाच्या राजाचा संयम सुटतो. मग पळून जाण्यासाठी तो अशी पद्धत अवलंबतो की ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही.
हेदेखील वाचा – धक्कादायक! पाईपमध्ये रॉकेट टाकून थेट व्यक्तीच्या अंगावर सोडला अग्निबाण, Viral Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डझनभर रान म्हशींचा कळप पोटाची खळगी भरण्यासाठी जंगलात इकडे तिकडे भटकत आहे. थोड्याच अंतरावर जंगलाचा राजा भक्ष्याच्या शोधात घात लपला असतो. मग त्याला काही हालचाल ऐकू आली जणू काही पीडिताच चालत येत आहे. पण थोड्याच वेळात हे स्पष्ट झाले की समोर शिकार नसून म्हशींचा कळप आहे, ज्यांच्याशी सामना करण्याची चूक सिंह क्वचितच करेल. सिंहालाही हे चांगलेच समजले की यांच्यासमोर आपला टिकाव लागणे अशक्य आहे. त्यामुळे तो शांतपणे जमिनीवर पडून राहतो. पण तोपर्यंत म्हशींचा कळप त्याच्या अगदी जवळ पोहचला होता आणि त्याला धडा शिकवण्याची संपूर्ण योजना त्यांनी आखली होती.
पुढे व्हिडिओत दिसते की, म्हशी एका मागून एक सिंहावर हल्ला करतात आणि भीतीने बिचारा सिंह त्यांच्यापासून दूर पाळण्याचा प्रयत्न करतो. सिंहाची झालेली ही अवस्था मुळातच तुम्ही कधी पाहिली असावी. सिंहाला म्हशींच्या कळपाने झोडपल्याचे यात दिसून येत आहे. जंगलाच्या राजाचे झालेले हे हाल पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत.
हेदेखील वाचा – क्षणार्धात मृत्यूने गाठलं! तरुणाने अचानक काही सेकंदातच मित्रांसमोर सोडले प्राण, घटनेचा थरारक Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @Latest Sightings नावाच्या युट्युब अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे,”त्याने आपल्या आयुष्यात मारलेल्या सर्व म्हशींची भुते सूड घेण्यासाठी परतल्यासारखे आहे” तर आणखीन एका युजरने लिहिले आहे, “असे वाटते, म्हशी मित्रांसोबत कुटुंबाचा बदला घेत आहेत”.