90 अंडी खरेदी करून महिला गेली फिरायला; परत येऊन पाहते तर काय... कोंबडीच्या पिल्लांनी भरलं घरं; Video Viral
सोशल मीडियावर एक अजब गजब कथा खूप जास्त व्हायरल होत आहे. यात घडून आलेली ही घटना इतकी विचित्र आणि आश्चर्यकारक आहे की याने सोशल मीडिया युजर्स हादरून गेले आहेत. ही घटना चीनच्या शानडोंग प्रांतातील किंगदाओ शहरात घडून आली असून जियांग नावाच्या महिलेसोबत ही घटना घडून आली. आता आपल्याकडे अनेकजण अंडी खातात, झटपट तयार होणारी अंडी अनेकांच्या नाश्त्यासाठी एक सामान्य पर्याय आहे पण जियांगसोबत मात्र एक अनोखी घटना घडून आली. तिने अंड्यांचा ट्रे खरेदी करून ही अंडी घरात ठेवली आणि ती बाहेर फिरायला गेली. बहुदा अंडी लवकर खराब होत नाहीत ज्यामुळे त्यांना घरात साठवून ठेवले जाते पण घरी परतताच जियांगने पाहिलं की तीच संपूर्ण घर हे कोंबडीच्या पिल्लांची भरलेलं होत. हे सर्वच दृश्य तिला थक्क करणार होत, पिल्लांची भरलेलं हे घर तिने आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केलं आणि सोशल मीडियावर याचा व्हिडिओ शेअर केला.
आईच्या कुशीत जाऊन झोपला छोटा गजराज; दृश्य इतके मनमोहक की पाहून नजरचं हटणार नाही; Video Viral
जियांगने खाण्यासाठी तब्बल ९० अंडी विकत घेतली होती. मात्र, ती अंडी फ्रिजमध्ये न ठेवता तिने स्वयंपाकघरातच ठेवली. या दरम्यान शहरात तापमान वाढले आणि घरात आर्द्रताही अधिक होती, परिणामी, ती अंडी नैसर्गिक उबवली गेली. विशेष म्हणजे ही सामान्य अंडी नव्हती. चीनमध्ये “हुओझुझी” म्हणून ओळखली जाणारी ही अंडी अर्धविकसित भ्रूणासह विकली जातात आणि तेथील अनेक ठिकाणी ही अंडी एक स्वादिष्ट खाद्यपदार्थ मानली जातात. पण जियांगच्या बाबतीत मात्र ही अंडी खाण्याऐवजी पिल्लांमध्ये रूपांतरित झाली! दोन दिवसांत ९० अंड्यांपैकी जवळपास ४० ते ५० अंड्यांमधून पिल्ले बाहेर आली आणि उरलेली अंडीही फुटण्याच्या अंतिम टप्प्यात होती. घरी परतल्यावर जियांगच्या डोळ्यांसमोर हे सर्व चित्र उभे राहिले, घरभर खेळणारी पिलं आणि त्यांचा किलबिलाट… हे सर्वच पाहून तिला आश्चर्याचा धक्का मिळाला.
मुख्य म्हणजे या सर्व गोंधळानंतरही जियांगने पिल्लांची जबाबदारी स्वीकारली. तिने आपल्या मुलाला दोन पिल्ले पाळीव प्राण्यांसाठी दिली आणि उर्वरित पिल्लांची काळजी घेण्यासाठी ती आपल्या पालकांकडे पाठवली. या अनपेक्षित प्रसंगामुळे जियांगचं घर आनंदाने भरून गेलं आणि तिच्या अंडी विकत घेण्याच्या निर्णयाने एक सुंदर आणि अविस्मरणीय आठवण निर्माण केली. दरम्यान याचा व्हिडिओ व्हायरल होताच आता युजर्स यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काहीजण याला “लहानपणच स्वप्न पूर्ण झाल्याचं” म्हणत आहेत तर काहीजण “निसर्गाचा चमत्कार” मानत आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.