(फोटो सौजन्य: X)
सध्याच्या धावपळीच्या जगात सोशल मीडिया एक असे साधन आहे जिथे लोक आपला मोकळा वेळ घालवू पाहतात आणि काही नवं, मजेदार पाहण्याच्या उद्देशाने इंटरनेटवर आपला रिकामा वेळ घालवतात. इथे तुम्हाला अनेक घटनांचे, सुंदर दृश्यांचे आणि माहितीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. अशातच यात काही असे व्हिडिओ देखील असतात जे अनेक लोकांची मने जिंकतात आणि त्यामुळे कमी वेळातच ते व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ एका छोट्या हत्तीचा असून यात तो आपल्या आईच्या खुशीत शांत झोपलेला दिसून येत आहे. अगदी मानवाचं बाळ जसं आईच्या खुशीत झोपतं तसाच छोटा गजराजही आपल्या आईच्या खुशीला बिछाना समजून त्यावर बिलगून झोपला आहे. हे दृश्य आता अनेकांचे मन मोहित करत असून छोट्या गाजराच्या या व्हिडिओला वेगाने शेअर केले जात आहे. चला यात दिसलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, या दृश्यात आपल्याला एकूण तीन हत्ती दिसून येतील. ज्यात एक हत्ती उभा आहे आणि तो उभा असलेल्याच ठिकाणी दोन हत्ती, ज्यातील एक आई आणि दुसरा तिचा गोंडस मुलगा आहे जो तिला बिलगून झोपला आहे. आईला झोपताना पाहताच छोट्या गजराजानेही एक शांत झोप काढण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी त्याने आपल्या आईजवळची जागा निश्चित केली. व्हिडिओमध्ये हत्तीण आणि तिचा मुलगा, छोटा गजराज शांत आणि गाढ झोपेत असल्याचे दिसते. शेवटी जे म्हणतात ना, आईच्या खुशीतचं खरा स्वर्ग दडलेला आहे आणि याच स्वर्गाचा अनुभव छोटा हत्ती व्हिडिओत घेताना दिसून येत आहे. हे मनमोहक दृश्य आता युजर्सना चांगलेच घायाळ करत असून लोक यावर आपल्या सुंदर प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत.
Luxury is sleeping on four tons of love💕
Chotu fast asleep on its mothers lap-Pure love wrapped in wrinkles pic.twitter.com/yev6iNsB1M — Susanta Nanda IFS (Retd) (@susantananda3) July 24, 2025
छोट्या गजराजाचा हा व्हायरल व्हिडिओ @susantananda3 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “झोपेत असताना त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य तर पाहा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खूप गोड आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “छोटू देखील स्वप्नात हसत आहे… तो स्वप्नात पाहत आहे की त्याला केळी मिळत आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.