धक्कादायक! नाचताना साडी जनरेटरमध्ये अडकली अन् मृत्यूचा थरार कॅमेरात कैद, Video Viral
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील अनेक गोष्टी पाहून आपल्याला हसू येते तर काही गोष्टी इतक्या धक्कादायक असतात त्यांना पाहून आपल्या पायाखालची जमीनच हादरते. सध्या अशाच धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकदा सणसमारंभात, लग्नात लोक बेफाम होऊन नाचतात. बऱ्याचदा नाचताना लोकं आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करत नाहीत आणि अशा वेळी अनेकदा काही लहान मोठे अपघात घडत असतात. सध्या राजस्थानमधील अशीच एक दुर्घटना व्हायरल होत आहे. यात एका महिलेला एका अपघातात चक्क आपला जीव गमवावा लागला आहे.
राजस्थानमधील एका कार्यक्रमात नाचताऱ्या एका महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. त्या महिलेची साडी जनरेटरमध्ये अडकली आणि त्यामुळे तिचे डोके आणि मान यांचे तुकडे झाले. हा एक सर्वात दुःखद आणि भयावह मृत्यू म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. महिलेच्या थरारक मृत्यूची ही घटना तिथे असलेल्या एका व्यक्तीच्या कॅमेरात कैद झाली आणि आता हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
हेदेखील वाचा – ट्रक आडवा आला अन् अचानक सर्व दुचाकी रस्त्यावर जोरदार आपटल्या, Viral Video पाहून अंगावर काटा येईल
सदर घटना राजस्थानमधील बाडमेरच्या सिवाना येथील कुंडल गावातील असून मंगळवारी ही घटना घडून आली. सर्व ग्रामस्थ कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करत असताना ही भीषणा दुर्घटना घडली. देशातील वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या पद्धतीने जन्माष्टमी साजरी केली गेली. पण, या आनंदाच्या उत्सवाला क्षणार्धात गालबोट लागला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सर्व महिला, लहान मुलं आणि पुरुष मंडळी या ठिकाणी कृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवात नाचताना दिसत आहेत. तुम्हालाही या व्हिडीओमध्ये सुरुवातीला सर्वकाही व्यवस्थित चालत असल्याचे दिसेल. मात्र, काहीच क्षणांत एका महिलेच्या साडीचा पदर जनरेटरमध्ये ओढला गेल्याने तिचं डोकं त्यामध्ये अडकलं; जे नंतर फुटलं. तिच्या केसांसोबत त्वचा वेगळी झाली आणि फोर्समुळे तिची मानही तुटली. अशा या भयंकर प्रकारात सापडलेल्या महिलेचा मृत्यू झाला.
हेदेखील वाचा – दिवसभर पंखा चालवा 1 रुपयाही बिल येणार नाही, तरुणाचा हटके जुगाड होतोय Viral
#Janmashtami2024 #RajasthaNews #viralvideo pic.twitter.com/Via5lA2OHI
— Khushbu Goyal (@kgoyal466) August 28, 2024
या घटनेचा व्हिडिओ @Khushbu Goyal नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले असून अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दरम्यान अपघाताचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लोकांनी आपला उत्साह व्यक्त करताना स्वतःची काळजी घेणे आणि सावध राहणे तितकेच महत्त्वाचे आहेबेसावधतेने वावरणाऱ्या सर्वांना सावधान करणारा हा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे.