Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आम्हाला 16 तास, कामाला 72 तास? कामावरून थकून आलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला पत्नीने सुनावले खडेबोल; Video Viral

Heart Touching Video : रेल्वे कर्मचारी थकून-हारून घरी येताच पत्नीने त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. पती स्तब्ध राहिला पण... व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमुळे वर्क-लाईफ बॅलन्सचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 21, 2025 | 12:56 PM
आम्हाला 16 तास, कामाला 72 तास? कामावरून थकून आलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला पत्नीने सुनावले खडेबोल; Video Viral

आम्हाला 16 तास, कामाला 72 तास? कामावरून थकून आलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला पत्नीने सुनावले खडेबोल; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • पतीचा जास्त वेळ कामात जात असल्याने कुटुंब आणि नातेसंबंधांवर ताण येतो, ही आजच्या अनेक घरांची वास्तव परिस्थिती आहे.
  • कामावरून थकून आलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला पत्नीने रोखले आणि प्रश्नांचा भडीमार करायला सुरूवात केली.
  • हा वाद दोष देण्याचा नसून, कामाच्या दबावात अडकलेल्या नात्यांमध्ये समतोल आणि परस्पर समजून घेण्याची गरज अधोरेखित करतो.
कामाचा व्याप बघता ऑफिस हे कर्मचाऱ्यांसाठी जणू दुसरं घरंच झालं आहे. कर्मचाऱ्यांचा अधिकतर वेळ हा ऑफिसमध्येच जातो, त्यानंतर थकून हारून घरी गेल्यानंतर माणूस आरामाचा विचार करतो. या सर्व गोष्टीत कुटुंबाला वेळ देणे मात्र सर्वांना शक्य होत नाही. वर्क-लाइफ-बॅलन्सचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओमध्ये, एक माणूस ७२ तासांच्या ड्युटीनंतर घरी परततो. त्याच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसतो, पण तो दारात प्रवेश करताच त्याची पत्नी त्याच्यावर डाफरायला सुरुवात करते. पती कुटुंबाला कमी वेळ देत असून त्याचा अधिकतर वेळ हा कामावर निघून जातो असा पत्नीचा आरोप असतो.

भयंकर! चक्रीवादळाने महिलेला अक्षरशः ओढलं अन् क्षणार्धात ती थेट हवेत उडून गेली, पाहणाऱ्यांचाही अंगावर आला काटा; Video Viral

व्हिडिओमध्ये पती-पत्नीमधील संघर्ष दाखवण्यात आला आहे, जिथे पत्नी तिच्या पतीवर कामावर जास्तीत जास्त तास आणि घरी फक्त काही तास घालवण्याचा आरोप करते. पत्नी पतीवर कुटुंबाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करते. पतीने ७२ तास कामावर घालवले आणि फक्त १६ तास घरकामासाठी दिले असे ती म्हणते. ती त्याच्यावर ओरडत असताना, पती मात्र शांतपणे बसून उभा राहतो. इतके तास काम केल्यानंतर तो थकलेल्या अवस्थेत दिसून येतो ज्यामुळे त्याच्या तोंडातून एक शब्दही बाहेर निघत नाही. त्याच्या शांततेमुळे आणि त्याच्या डोळ्यातील थकवा पाहून व्हिडिओमधील वापरकर्त्यांना भावले. अनेकांनी कमेंट केली, “कधीकधी माणूस सर्वांसाठी लढतो, पण स्वतःसाठी कोणीही लढत नाही.” कामाचा आपल्या नातेसंबंधांवर कसा परिणाम होतो हे या व्हिडिओतून दिसून येते. कारण अनेक नोकरदारांच्या घरात हेच चित्र दिसून येते. हा व्हिडिओ केवळ पतीचा थकवा दाखवत नाही तर पुरुषांना त्यांच्या भावना दाबण्यासाठी आणि जबाबदाऱ्यांचे ओझे उचलण्यासाठी किती सामाजिक दबावाला तोंड द्यावे लागते हे देखील अधोरेखित करतो.

Wife confronts husband over his poor work life balance. WIFE: Aa gaye? You will give us 16 hours at home and 72 hours at work. I’ll be doing housework all day. Say something 😳 Video sparks debate on Mental health & managing personal & professional life. pic.twitter.com/cSwpXc01SE — News Algebra (@NewsAlgebraIND) December 21, 2025

बापरे! व्हिडिओ गेमच्या नादात व्यक्तीने स्वतःला तब्बल 2 वर्ष खोलीत कोंडलं, दरवाजा उघडताच दिसले किळसवाणे दृश्य; Video Viral

घटनेची दुसरी बाजू जर आपण समजून घेतली तरी पत्नीचा मुद्दाही पूर्णपणे चुकीचा नाही. पती कामात गुंतलेला असताना घर, मुले, जबाबदाऱ्या आणि भावनिक ओझे हे सगळं ती एकटी सांभाळत असते. दिवसभर घरकाम, मानसिक ताण आणि एकटेपणा सहन करताना तिलाही कुणीतरी समजून घ्यावं, बोलावं आणि साथ द्यावी अशी अपेक्षा असते.पत्नीचा आरोप हा केवळ “७२ तास काम आणि १६ तास घर” इतकाच मर्यादित नाही, तर तिची तक्रार आहे की पती भावनिकदृष्ट्या घरापासून दूर जात आहे. तिच्या मते, घर म्हणजे फक्त राहण्याचं ठिकाण नसून संवाद, साथ आणि सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Work life balance 16 hours at home and 72 hours at work wife scold tired husband viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 12:56 PM

Topics:  

  • shocking viral news
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

चीनमध्ये रोबोट्सचा स्टेजवर जलवा! जबरदस्त डान्सने केलं जगला हैराण, मस्कही थक्क, VIDEO VIRAL
1

चीनमध्ये रोबोट्सचा स्टेजवर जलवा! जबरदस्त डान्सने केलं जगला हैराण, मस्कही थक्क, VIDEO VIRAL

बापरे! व्हिडिओ गेमच्या नादात व्यक्तीने स्वतःला तब्बल 2 वर्ष खोलीत कोंडलं, दरवाजा उघडताच दिसले किळसवाणे दृश्य; Video Viral
2

बापरे! व्हिडिओ गेमच्या नादात व्यक्तीने स्वतःला तब्बल 2 वर्ष खोलीत कोंडलं, दरवाजा उघडताच दिसले किळसवाणे दृश्य; Video Viral

भयंकर! चक्रीवादळाने महिलेला अक्षरशः ओढलं अन् क्षणार्धात ती थेट हवेत उडून गेली, पाहणाऱ्यांचाही अंगावर आला काटा; Video Viral
3

भयंकर! चक्रीवादळाने महिलेला अक्षरशः ओढलं अन् क्षणार्धात ती थेट हवेत उडून गेली, पाहणाऱ्यांचाही अंगावर आला काटा; Video Viral

लोको पायलटचं रोमँटिक सरप्राईज! घरामागून ट्रेन धावताच हॉर्नमध्ये वाजवलं ‘I Love You’; पती-पत्नीचा क्यूट मूमेंट व्हायरल
4

लोको पायलटचं रोमँटिक सरप्राईज! घरामागून ट्रेन धावताच हॉर्नमध्ये वाजवलं ‘I Love You’; पती-पत्नीचा क्यूट मूमेंट व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.