स्ट्रीट फूड च्या शौकिनांचे एक वेगळेच विश्व असते. अनेकदा सोशल मीडियावर विचित्र पदार्थ व्हायरल होतात. कधी लोकांना ते आवडतात तर कधी लोकांना त्याचा रागही येतो. सध्या बाजारात एक नवीन डिश आली आहे, जी दिल्लीतील एका स्ट्रीट फूड विक्रेत्याने आणली आहे. ज्यांनी ही डीश खाल्ली आहे, तेच या रेसिपीची चव सांगू शकतील. परंतु, या डिशचा रंग खूपच रंगीबेरंगी आहे. हा एक समोसा आहे, जो स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी फ्लेवर्समध्ये बनवला जातो.
समोसा हब नावाच्या या दुकानात हे दोन्ही प्रकारचे समोसे दिले जातात. दिल्लीतील हे फूड आउटलेट हे स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी समोसे देत आहे. गुलाबी रंगाच्या समोसाला स्ट्रॉबेरी समोसा म्हटले जात आहे. ज्यामध्ये जाम आणि स्ट्रॉबेरी फिलिंग आहे. यासोबत ब्लूबेरी समोसे म्हणून ओळखल्या जाणार्या निळ्या रंगाच्या समोशामध्ये ब्लूबेरी जॅम आहे.
या दोन्ही समोशांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, त्यावर नेटीझन म्हटले आहे की आता तर मर्यादाच संपली, अशी प्रतिक्रियाही एका सोशल मीडिया यूजर्सने दिली आहे. मात्र, आता ही नवीन डिश लोकांच्या चवीला कितपत तृप्त करू शकते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.