धक्कादायक! रीलसाठी धावत्या ट्रेनमधून तरूणांची स्टंटबाजी; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात.अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून हसू आवरणे कठीण होऊन जाते. तसेच कधी जुगाड, भांडण, डान्स रील्स असे अनेक व्हिडिओ देकील व्हायरल होत असतात. याशिवाय तरूण लोकांचे स्टंट व्हिडिओ देखील सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात.
सध्या असाच एक काही तरूणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अनेकदा हे तरूण स्टंट करताना स्वत:च्या जीवाचा अजिबात विचार करत नाही. त्यांना रील बनवण्याचे असे वेड लागले आहे की, त्यांनी इतर लोकांची देखील काळजी नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हे तरूण धावत्या ट्रेनमधून स्टंटबाजी करत आहेत.
ट्रेनला लटकत प्रवास
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन प्लॅटफॉर्मवरून वेगाने जाताना दिसत आहे. या ट्रेनच्या दरवाज्याजवळ दोन तरूण उभे आहेत. त्यातील एक तरूण ट्रेनला लटकलून प्रवास करत आहे. तो त्याचा हात देखील प्लॅटफॉर्मवर लावण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरा तरूण त्याच्या मागे दरवाज्यामध्ये उभा आहे. या तरूणांना पाहून प्लॅटफॉर्मवरील अनेक लोक हैराण झाले आहेत. या तरूणांना ही स्टंटबाजी किती महागात पडू शकते हे कळत नाही.
हे देखील वाचा- ऐकावे ते नवलच! दिल्ली मेट्रोमध्ये अचानक अशी घोषणा झाली की; ऐकून खळखळून हसाल
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @mr_mahtab_1m या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ अनेकांनी संतपजनक प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, यांना बेदम मारले पाहिजे, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, अशा मुलांना त्यांच्या आईवडीलांबद्दल काही वाटत नाही का, त्यांना काही झाले तर काय होणार घरच्यांच. आणखी एका युजरने पोलिसांनी अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे असे म्हटले आहे. चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, त्यांच्यामुळे प्लॅटफॉर्मवरील एकाद्याला दुखापत होईल. मात्र अद्याप हा व्हिडिओ कुठला आहे हे कळालेले नाही.
हे देखील वाचा- Viral Video: पिसारा फुलवून नाचत होता मोर इतक्यात वाघ आला अन्…; पाहा व्हिडिओ