
22 Indians arrested in Nigeria drug case
22 Indians arrested in Nigeria drug case : आंतरराष्ट्रीय समुद्रमार्गे होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध नायजेरियन सरकारने मोठी कारवाई केली आहे. लागोसच्या मुख्य बंदरात उभ्या असलेल्या एका व्यापारी जहाजावर छापा टाकून नायजेरियाच्या ड्रग अंमलबजावणी संस्थेने (NDLEA) तब्बल ३१.५ किलो कोकेन जप्त केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात जहाजावरील २२ भारतीय खलाशांना (Indian Crew Members) अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय सागरी वर्तुळात खळबळ उडाली असून भारतीय दूतावास या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे.
नायजेरियाच्या ड्रग अंमलबजावणी संस्थेचे प्रवक्ते फेमी बाबाफेमी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एमव्ही अरुणा हुल्या’ (MV Aruna Hulya) हे व्यापारी जहाज मार्शल बेटांवरून निघाले होते. हे जहाज लागोस बंदरात पोहोचताच गुप्त माहितीच्या आधारे रविवारी त्यावर धाड टाकण्यात आली. झडतीदरम्यान जहाजाच्या गुप्त कप्प्यांमध्ये ३१.५ किलो कोकेन लपवून ठेवल्याचे आढळले. कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत कोट्यवधी रुपये आहे. या जहाजावरील सर्व २२ भारतीय कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना या तस्करीची माहिती होती का, याचा तपास केला जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trade War: ‘त्यांना मला खूश करायचे होते… ‘PM Modi आणि Trump यांच्यात ‘ऑइल’वरून ठिणगी; USने पुन्हा उगारली Tariff तलवार
नायजेरिया हा देश युरोप आणि इतर आफ्रिकन देशांसाठी ड्रग्ज तस्करीचा एक प्रमुख मार्ग (Hub) बनला आहे. गेल्या काही महिन्यांपासून नायजेरियन अधिकारी बंदरांवर विशेष पाळत ठेवून आहेत. नोव्हेंबर महिन्यातही अशाच प्रकारे ब्राझीलहून आलेल्या एका जहाजातून २० किलो कोकेन जप्त करण्यात आले होते आणि २० फिलिपिनो खलाशांना अटक करण्यात आली होती. सध्या लागोस बंदरातील ड्रग्ज कार्टेलचा शोध घेण्यासाठी नायजेरियाची एजन्सी अमेरिका आणि ब्रिटनच्या ड्रग्ज विरोधी संस्थांसोबत संयुक्तपणे काम करत आहे.
22 Indian Ship Crew Members Arrested In Nigeria With 31.5 Kg Cocaine https://t.co/ZbqWBSYE7H — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) January 4, 2026
credit : social media and Twitter
एकीकडे नायजेरियात भारतीयांना अटक झाली असताना, दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीत पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कराला जेरबंद केले आहे. आग्नेय दिल्लीच्या स्पेशल स्टाफ टीमने नेपाळचा रहिवासी असलेल्या ४६ वर्षीय महेशला अटक केली. त्याच्याकडून १०.९७० किलो उच्च दर्जाचे चरस जप्त करण्यात आले असून, याची बाजारातील किंमत साधारण १ कोटी रुपये आहे. डीसीपी हेमंत तिवारी यांनी सांगितले की, “आमचे लक्ष्य २०२७ पर्यंत दिल्लीला पूर्णपणे ड्रग्जमुक्त करण्याचे आहे आणि ही अटक त्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kamala Harris: ‘ड्रग्ज ही केवळ थाप आहे!’ Venezuela कारवाईमागील खरं सत्य कमला हॅरिस यांनी केलं उघड, मादुरोच्या अटकेवर संताप
नायजेरियात अटक करण्यात आलेल्या २२ भारतीय खलाशांच्या कुटुंबीयांनी भारत सरकारकडे मदतीची याचना केली आहे. अनेकदा आंतरराष्ट्रीय तस्कर खलाशांना अंधारात ठेवून जहाजाचा वापर ड्रग्ज वाहतुकीसाठी करतात. हे खलाशी या गुन्ह्यात सामील होते की त्यांना फसवण्यात आले आहे, हे आता नायजेरियन न्यायालयाच्या तपासातच स्पष्ट होईल. तोपर्यंत या सर्वांना लागोसमध्ये कोठडीत ठेवण्यात आले आहे.
Ans: लागोस बंदरात ३१.५ किलो कोकेन जप्त केल्याप्रकरणी २२ भारतीय क्रू सदस्यांना अटक करण्यात आली आहे.
Ans: 'एमव्ही अरुणा हुल्या' (MV Aruna Hulya) नावाच्या व्यापारी जहाजातून हे ड्रग्ज जप्त करण्यात आले, जे मार्शल बेटांवरून आले होते.
Ans: दिल्लीत नेपाळी नागरिक महेश याला १०.९७० किलो चरससह अटक करण्यात आली, ज्याची किंमत साधारण १ कोटी रुपये आहे.