Trump Warns India: "मोदी चांगले आहेत, पण मला खूश करणं महत्त्वाचं!" ट्रम्प यांची भारताला पुन्हा टॅरिफ धमकी; रशियन तेलामुळे व्यापारयुद्ध भडकणार? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Donald Trump India tariffs 2026 : अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंध पुन्हा एकदा तणावाच्या वळणावर आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रशियाकडून होणाऱ्या तेल आयातीवरून भारताला थेट इशारा दिला आहे. “पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) हे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहेत, पण रशियासोबतचा व्यापार मला मुळीच आवडलेला नाही. भारताने मला खूश करणे गरजेचे आहे, अन्यथा आम्ही लवकरच टॅरिफ वाढवू,” अशा कडक शब्दांत ट्रम्प यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
एअर फोर्स वनवर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी भारत-अमेरिका व्यापारावर भाष्य केले. ते म्हणाले, “त्यांना (भारताला) मला खूश करायचे होते. पंतप्रधान मोदी खरोखरच खूप चांगले माणूस आहेत. पण त्यांना हेदेखील माहित आहे की रशियन तेलाच्या खरेदीमुळे मी खुश नाही. जर त्यांनी असाच व्यापार सुरू ठेवला, तर आम्ही त्यांच्यावर खूप वेगाने टॅरिफ (शुल्क) वाढवू शकतो.” ट्रम्प यांच्या या विधानामुळे जागतिक बाजारात आणि भारतीय निर्यातदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kamala Harris: ‘ड्रग्ज ही केवळ थाप आहे!’ Venezuela कारवाईमागील खरं सत्य कमला हॅरिस यांनी केलं उघड, मादुरोच्या अटकेवर संताप
ताज्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर २०२५ मध्ये भारताने रशियाकडून तब्बल ७.७ दशलक्ष टन तेल आयात केले. भारताच्या एकूण तेल आयातीपैकी हा वाटा ३५.१% इतका मोठा आहे. मे २०२५ नंतरची ही सर्वोच्च पातळी आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी करणे सुरू ठेवले आहे. मात्र, अमेरिकेने याला ‘रशियाच्या युद्धखर्चाला मदत’ असे संबोधत आधीच ऑगस्ट २०२५ मध्ये भारतीय वस्तूंवरील टॅरिफ २५% वरून ५०% पर्यंत वाढवले आहेत.
#BREAKING: US President Donald Trump has warned of fresh Tariffs on India over oil trade with Russia: “PM Modi is a very good man. He’s a good guy. He knew I was not happy. It was important to make me happy. They do trade, and we can raise tariffs on them very quickly”. pic.twitter.com/v6ZpY8Wjsq — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) January 5, 2026
credit : social media and Twitter
अमेरिका जरी दबाव टाकत असली, तरी भारताने आपले धोरण संतुलित ठेवले आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये भारताने अमेरिकेकडूनही मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केली. अमेरिकन तेलाचा वाटा मागील महिन्याच्या ४.२% वरून थेट १२.६% वर पोहोचला आहे. भारताने अमेरिकेकडून सुमारे २.८ दशलक्ष टन तेल खरेदी करून आपला व्यापार संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, रशियन तेलाची मोठी खरेदी ट्रम्प प्रशासनासाठी अद्यापही डोकेदुखी ठरत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Maduro Arrested: हुकूमशहांचा काळ जवळ! अमेरिकेची पुढची शिकार होणार ‘Putin’; झेलेन्स्की यांच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
भारत आणि अमेरिका यांच्यात एका मोठ्या व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. मात्र, रशियन तेल आणि कृषी उत्पादनांवरील शुल्कामुळे ही चर्चा सध्या अडखळली आहे. वाणिज्य मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, भारत रशियावरील अवलंबित्व कमी करण्यास तयार असला तरी अमेरिकेने लादलेले टॅरिफ मागे घ्यावेत अशी भारताची मागणी आहे. मार्च २०२६ पर्यंत हा करार पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी ट्रम्प यांच्या ताज्या धमकीमुळे यात अडथळे येऊ शकतात.
Ans: भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी करणे सुरू ठेवल्यामुळे ट्रम्प यांनी ही धमकी दिली आहे. रशियन तेल आयातीमुळे रशियाला युद्ध निधी मिळत असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.
Ans: ऑगस्ट २०२५ मध्ये अमेरिकेने रशियन तेल खरेदीचा दंड म्हणून अनेक भारतीय वस्तूंवरील टॅरिफ २५% वरून ५०% पर्यंत वाढवले आहेत.
Ans: भारताने नोव्हेंबर २०२५ मध्ये रशियाकडून ७.७ दशलक्ष टन (३.७ अब्ज डॉलर मूल्य) तेल आयात केले, जे एकूण आयातीच्या ३५.१% आहे.






