Kamala Harris: 'ड्रग्ज ही केवळ थाप आहे!' Venezuela कारवाईमागील खरं सत्य कमला हॅरिस यांनी केलं उघड ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Kamala Harris statement on Nicolas Maduro arrest : अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Maduro) आणि त्यांच्या पत्नीला ज्या पद्धतीने बेडरूममधून खेचून अटक केली, त्यावरून आता अमेरिकेतच दोन गट पडले आहेत. एकीकडे रिपब्लिकन पक्ष याला विजय मानत असताना, दुसरीकडे माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “ही कारवाई अमेरिकन कुटुंबांना महागात पडेल आणि यामुळे देशात महागाई आणि अराजकता वाढेल,” असा इशारा हॅरिस यांनी दिला आहे.
कमला हॅरिस यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून ट्रम्प प्रशासनाचा तीव्र निषेध केला. त्या म्हणाल्या, “मादुरो हा क्रूर हुकूमशहा असू शकतो, पण याचा अर्थ असा नाही की आपण आंतरराष्ट्रीय कायदा पायदळी तुडवावा. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या कृतीमुळे अमेरिका अधिक सुरक्षित किंवा मजबूत होणार नाही. आपण इतिहासात आधीही पाहिले आहे की, राजवट बदलण्याच्या नावे लढलेली युद्धे शक्तीप्रदर्शन म्हणून सुरू होतात, पण त्याचा शेवट केवळ विनाशात आणि सामान्य अमेरिकन कुटुंबांच्या आर्थिक ओझ्यात होतो.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Maduro Arrested : ‘कायर लोकांनो या…’ मादुरोचं चॅलेंज ट्रम्पने स्वीकारलं, सहपत्नीक घातल्या बेड्या; व्हेनेझुएलात आता अमेरिकन राजवट
हॅरिस यांनी ट्रम्प यांच्यावर हल्ला चढवताना सांगितले की, ही कारवाई ड्रग्ज किंवा लोकशाही वाचवण्यासाठी केलेली नाही. “हे केवळ व्हेनेझुएलातील तेलावर ताबा मिळवण्यासाठी आणि ट्रम्प यांना ‘प्रादेशिक महासत्ता’ (Regional Powerhouse) म्हणून सिद्ध करण्यासाठी सुरू आहे. जर ट्रम्प यांना खरोखरच लोकशाहीची काळजी असती, तर त्यांनी ड्रग्ज तस्करांना माफी दिली नसती. ते केवळ आपल्या सैनिकांचा जीव धोक्यात घालत आहेत आणि अब्जावधी डॉलर्स वाया घालवत आहेत,” असा सडेतोड आरोप त्यांनी केला.
Kamala Harris issues statement on the actions of Donald Trump’s administration in Venezuela. “Donald Trump’s actions in Venezuela do not make America safer, stronger, or more affordable. That Maduro is a brutal, illegitimate dictator does not change the fact that this action… pic.twitter.com/y7LNS1Dpdn — Pop Flop (@ThePopFlop) January 4, 2026
credit : social media and Twitter
केवळ हॅरिसच नव्हे, तर न्यूयॉर्क शहराचे महापौर जोहरान ममदानी (Zohran Mamdani) यांनीही या कारवाईला “युद्धाचे कृत्य” म्हटले आहे. ममदानी यांनी स्पष्ट केले की, या एकतर्फी कारवाईमुळे न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या हजारो व्हेनेझुएलाच्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. “हा फेडरल आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग आहे. यामुळे संपूर्ण प्रदेश अस्थिर होईल आणि त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील,” असे त्यांनी म्हटले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3 : युद्ध सुरू झालं! कराकसवर क्षेपणास्त्रांचा पाऊस, Venezuela भीषण स्फोटांनी हादरलं; अमेरिकेने विमान उड्डाणं रोखली
सीएनएनच्या अहवालानुसार, अमेरिकन सैन्याच्या डेल्टा फोर्सने (Delta Force) अत्यंत गोपनीयतेने ही मोहीम राबवली. कराकसमधील ‘फोर्ट ट्युना’ या कडक सुरक्षा असलेल्या लष्करी संकुलात कमांडो घुसले. मादुरो आणि त्यांची पत्नी झोपलेले असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. हे ऑपरेशन अवघ्या ३० मिनिटांत पूर्ण झाले आणि यात एकही अमेरिकन सैनिक जखमी झाला नाही. मात्र, या कारवाईने जागतिक राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला आहे.
Ans: हॅरिस यांच्या मते, ही कारवाई बेकायदेशीर असून यामुळे अमेरिका सुरक्षित होणार नाही, उलट तेलाच्या राजकारणामुळे अमेरिकन कुटुंबांवर महागाईचे ओझे वाढेल.
Ans: न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी याला "युद्धाचे कृत्य" (Act of War) म्हटले असून आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला आहे.
Ans: अमेरिकन सैन्याच्या डेल्टा फोर्सने रात्रीच्या वेळी 'फोर्ट ट्युना' संकुलात धाड टाकून ३० मिनिटांत मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले.






