Earthquake in Pakistan: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण संबंध आहेत. पाकिस्तानची भारत सर्व बाजूने कोंडी करत असताना पाकिस्तानमध्ये एक नैसर्गिक आपत्ती आली आहे. पाकिस्तानच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. पाकिस्तानमध्ये ४.२ रिष्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर येत आहे.
पाकिस्तानमध्ये या आधी देखील जाणवले भूकंपाचे धक्के
पाकिस्तानमध्ये १९ आणि ३० एप्रिल रोजी देखील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपची तीव्रता ४.४ स्केल इतकी होती. या भूकंपाचे केंद्र उत्तर पाकिस्तानमध्ये असल्याचे म्हटले जात आहे.
चिलीमध्ये 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप
दक्षिण अमेरिका खंडातील चिली आणि अर्जेंटिना या देशांना आज सकाळी जोरदार भूकंपाचा सामना करावा लागला. ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली, लोकांनी आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी धाव घेतली. भूकंपानंतर त्सुनामीचा गंभीर इशारा देण्यात आला असून, चिली सरकारने किनारी भागात राहणाऱ्या नागरिकांना तात्काळ स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत.
अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण संस्था (USGS) ने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र अर्जेंटिनाच्या उशुआइया शहरापासून सुमारे २१९ किमी दक्षिणेस, समुद्राच्या आत होते. त्यामुळे या भूकंपाची तीव्रता केवळ जमिनीपुरती मर्यादित न राहता समुद्रालाही हादरवणारी ठरली आहे. परिणामी, चिलीच्या किनारी भागांमध्ये त्सुनामी निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी X (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सांगितले की, मॅगालेन्स प्रदेशातील समुद्रकिनारी भाग रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण आणि प्रतिसाद सेवा (ONEMI) सज्ज आहे. सरकारकडे भूकंप आणि त्सुनामीचा सामना करण्यासाठी सर्व आवश्यक साधनसामग्री आणि आपत्कालीन व्यवस्था उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चिलीमध्ये 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप; समुद्रात केंद्र, त्सुनामीचा इशारा, किनारी भाग रिकामे करण्याचे आदेश
भूकंपाचे धक्के जाणवताच, पुंता एरेनास (चिली) आणि रिओ गॅलेगोस (अर्जेंटिना) या शहरांमध्ये मोठी घबराट पसरली. लोक आपल्या घरातून बाहेर पडून मोकळ्या आणि सुरक्षित जागांकडे धावू लागले. सध्या पर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे वृत्त नाही, मात्र प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.