भारतासह तीन देशांमध्ये भूकंपाचे धक्के, उत्तराखंडमधील चमोली येथे तीव्रता 3.3
तुर्की ही भूकंप प्रवण क्षेत्रात येणारी भूमी आहे असून आज पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. 5.0 तीव्रतेचा हा भूकंप तुलनेने सौम्य असला तरी त्याने भूतकाळातील तीव्र आपत्तींच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. 15 मे रोजी तुर्कीच्या कुल्लू भागापासून 11 किमी पूर्वेला जमिनीखाली सुमारे 10 किलोमीटरच्या खोलीवर 5.0 तीव्रतेचा भूकंप झाला. सुदैवाने, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, किंवा मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान झाल्याचंही वृत्त नाही. मात्र, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
हिमाचलमध्ये सापडला 60 कोटी वर्षांपूर्वीचा ‘खजिना’; पृथ्वीवरील जीवनाच्या उगमाचा दुवा उजेडात
तुर्कीत वारंवार भूकंप का होतात?
तुर्की ही एनाटोलियन टेक्टॉनिक प्लेटवर स्थित असून ती आफ्रिकन आणि यूरेशियन प्लेट्सच्या मध्ये अडकलेली आहे. या प्लेट्स एकमेकांवर दबा निर्माण करतात आणि हा अचानक सुटतो तेव्हा भूकंप होतो. तुर्कीत वारंवार भूकंप होण्यामागे हेच प्रमुख कारण आहे.
तुर्कीत याआधी कधी आलेत विनाशकारी भूकंप
6 फेब्रुवारी 2023:
तीव्रता: 7.8
स्थान: दक्षिण-पूर्व तुर्की
परिणाम: सीरिया पर्यंत परिणाम, 50,000 हून अधिक मृत्यू
विशेष: इतिहासातील सर्वात प्रलयंकारी भूकंपांपैकी एक, त्यानंतर 7.5 तीव्रतेचा दुसरा मोठा धक्का
30 ऑक्टोबर 2020:
तीव्रता: 7.0
स्थान: एजियन समुद्र (इझमीर)
परिणाम: तुर्की व ग्रीस दोन्ही प्रभावित, समुद्राच्या तळाशी भूकंप
विशेष: सुनामीसदृश स्थिती निर्माण
ऑक्टोबर 2011:
तीव्रता: 7.1
स्थान: वान, पूर्वी तुर्की
मृत्यू: 600+
विशेष: अनेक इमारती कोसळल्या, मदत कार्यात अडचणी
17 ऑगस्ट 1999:
तीव्रता: 7.6
स्थान: इझमित (कोकाली)
मृत्यू: 17,000+
सध्याची परिस्थिती काय दर्शवते?
सद्याचा 5.0 तीव्रतेचा भूकंप मोठा नसेल, पण तो भविष्यातील संभाव्य आपत्तीची जाणीव करून देतो. भूकंप प्रवण देश असल्यामुळे तुर्कीला आता आणखी अधिक भूकंपप्रतिरोधक पायाभूत सुविधा आणि जागरूकतेच्या उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे.