Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Peace : ‘इराण-रशियापासून युक्रेनपर्यंत…’ 72 तासांत थांबली आठ देशांमधील युद्ध; जाणून घ्या ‘हे’ दिव्य कसे घडले?

८ एप्रिल रोजी इराण आणि अमेरिकेने पहिल्यांदाच युद्धविरामाची घोषणा केली. त्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तात्पुरत्या युद्धविरामावर सहमती झाली. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील युद्धही थांबले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 10, 2026 | 12:28 PM
8 wars stopped in 72 hours iran usa russia ukraine israel ceasefire 2026

8 wars stopped in 72 hours iran usa russia ukraine israel ceasefire 2026

Follow Us
Follow Us:
  • जागतिक चमत्कार
  • इस्टर आणि मुत्सद्देगिरी
  • मध्यस्थीला यश

8 wars stopped in 72 hours 2026 : जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर (World War 3) असतानाच गेल्या ७२ तासांत काही अशा घडामोडी घडल्या आहेत, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. आशिया, युरोप आणि मध्य-पूर्व या तीनही खंडांना हादरवून सोडणारी ८ मोठी युद्धे अचानक थांबली आहेत. ८ एप्रिलपासून सुरू झालेला हा शांततेचा सिलसिला आजही कायम असून, यामुळे जागतिक राजकारणात एका नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे. यामध्ये इराण-अमेरिका, इस्रायल-लेबनॉन, रशिया-युक्रेन आणि पाकिस्तान-अफगाणिस्तान यांसारख्या कट्टर शत्रूंचा समावेश आहे.

रशिया-युक्रेन: इस्टरमुळे तोफा थंडावल्या

युरोपमधील सर्वात मोठा संघर्ष असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात शुक्रवारी एक आशेचा किरण दिसला. इस्टर सणाच्या पवित्र निमित्ताने रशिया आणि युक्रेन ३२ तासांच्या तात्पुरत्या युद्धविरामावर सहमत झाले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले की, दोन्ही देशांतील जनता हा सण साजरा करते, त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने हे पाऊल उचलले आहे. गेल्या वर्षी हा विराम केवळ ३० तासांचा होता, मात्र यंदा तो वाढवण्यात आला आहे. २०२२ पासून सुरू असलेल्या या युद्धात पहिल्यांदाच दोन्ही बाजूंनी इतक्या सकारात्मकतेने सहमती दर्शवली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Peace Talks: ‘आम्ही महासत्ता बनणार!’ मोजतबा खामेनींचे शस्त्रसंधीनंतरचे पहिलेच स्फोटक विधान; सूड घेणार म्हणत अमेरिकेला थेट चॅलेंज

इराण-अमेरिका: ३८ दिवसांच्या रक्तरंजित संघर्षानंतर शस्त्रसंधी

गेल्या ३८ दिवसांपासून एकमेकांचे वीज प्रकल्प आणि लष्करी तळ उडवून लावणाऱ्या इराण आणि अमेरिकेने ७ एप्रिल रोजी युद्धबंदीची घोषणा केली. हा युद्धविराम सध्या दोन आठवड्यांसाठी असला, तरी या काळात पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे शनिवारी (११ एप्रिल) महत्त्वाची शांतता चर्चा होणार आहे. जरी डोनाल्ड ट्रम्प यांनी “चर्चा फसल्यास इराणला मोठा फटका बसेल” अशी धमकी दिली असली, तरी सध्या तरी दोन्ही देशांच्या तोफा शांत आहेत. या २ आठवड्यांच्या काळात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान जागतिक नेत्यांसमोर असेल.

पाकिस्तान-अफगाणिस्तान आणि चीनची मध्यस्थी

ड्युरँड लाईन आणि टीटीपी (TTP) वरून एकमेकांचे रक्त सांडणाऱ्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला शांत करण्यासाठी चीनने मोठी भूमिका बजावली. चीनमध्ये झालेल्या सात दिवसांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले न करण्याची शपथ घेतली आहे. यापूर्वी ईदच्या वेळी झालेला करार पाकिस्तानने मोडला होता, मात्र आता दोन्ही देशांनी सध्याची परिस्थिती पाहता शस्त्रे खाली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा करार कायमस्वरूपी नसला तरी सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

इस्रायल-लेबनॉन: वॉशिंग्टन बैठकीकडे लक्ष

२०२४ पासून लेबनॉनवर भीषण बॉम्बवर्षाव करणाऱ्या इस्रायलने अखेर आपले हल्ले थांबवले आहेत. इराणसोबतच्या युद्धविरामानंतरही इस्रायल लेबनॉनला लक्ष्य करत होता, मात्र आता वॉशिंग्टनमध्ये होणाऱ्या आगामी शांतता कराराच्या बैठकीपर्यंत इस्रायलने कोणतीही लष्करी कारवाई न करण्याचे मान्य केले आहे. लेबनॉनमधील सामान्य जनतेसाठी हा मोठा दिलासा असून, यामुळे मध्य-पूर्वेतील तणाव काही अंशी कमी झाला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran No Talks : इस्लामाबाद किल्ल्यासारखं सजवलं, पण पाहुणेच गायब; इराणचा शांतता चर्चेला सणसणीत नकार, त्यात पाकिस्तानचा अपमान

ही शांतता टिकणार का?

७२ तासांत घडलेला हा बदल जगासाठी सुखद धक्का आहे. मात्र, यातील बहुतांश युद्धविराम हे तात्पुरते आहेत. इराणमधील इस्लामाबाद चर्चा आणि इस्रायलची वॉशिंग्टन बैठक यावरच जगाचे भविष्य अवलंबून आहे. ट्रम्प यांची आक्रमक मुत्सद्देगिरी आणि विविध सणांचे औचित्य यामुळे जगाला मिळालेली ही ‘शांततेची ७२ तासे’ कायमस्वरूपी समाधानात बदलणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: गेल्या ७२ तासांत कोणकोणत्या देशांमधील युद्धे थांबली आहेत?

    Ans: इराण, अमेरिका, इस्रायल, लेबनॉन, रशिया, युक्रेन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या ८ देशांमधील युद्धे ७२ तासांत तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत.

  • Que: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धबंदी का झाली?

    Ans: इस्टर सणाच्या पार्श्वभूमीवर रशिया आणि युक्रेनमध्ये ३२ तासांचा तात्पुरता युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे.

  • Que: इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता चर्चा कोठे होणार आहे?

    Ans: इराण आणि अमेरिका यांच्यातील महत्त्वाची शांतता चर्चा शनिवार, ११ एप्रिल रोजी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे होणार आहे.

Web Title: 8 wars stopped in 72 hours iran usa russia ukraine israel ceasefire 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • Ceasefire
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

US Attacks Iran : इराणमध्ये स्फोटांची मालिका सुरुच! बुशहेरसह अनेक शहरांमध्ये स्फोट; ट्रम्प-नेतन्याहू चर्चेमुळे वाढली युद्धाची भीती
1

US Attacks Iran : इराणमध्ये स्फोटांची मालिका सुरुच! बुशहेरसह अनेक शहरांमध्ये स्फोट; ट्रम्प-नेतन्याहू चर्चेमुळे वाढली युद्धाची भीती

US Iran War: महासत्ता पुन्हा आमनेसामने; जिथे अली खामेनी यांना दफन केले जाणार दोन मोठे रेल्वे पूलच अमेरिकेने उडवले
2

US Iran War: महासत्ता पुन्हा आमनेसामने; जिथे अली खामेनी यांना दफन केले जाणार दोन मोठे रेल्वे पूलच अमेरिकेने उडवले

Iran US Conflict: ‘दादागिरीची किंमत मोजावी लागेल…’ होर्मुझवरून इराणचा एल्गार; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराण आक्रमक
3

Iran US Conflict: ‘दादागिरीची किंमत मोजावी लागेल…’ होर्मुझवरून इराणचा एल्गार; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराण आक्रमक

US Iran War 2026 : डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका घोषणेने पेटले युद्ध; चाबहार बंदरासह इराणच्या 90 तळांवर अमेरिकेचा भीषण बॉम्बहल्ला
4

US Iran War 2026 : डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका घोषणेने पेटले युद्ध; चाबहार बंदरासह इराणच्या 90 तळांवर अमेरिकेचा भीषण बॉम्बहल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.