लंडन : लंडन (London), बेलफास्ट, कार्डिफ आणि एडिनबर्ग (Edinburg) येथे राणी एलिझाबेझ द्वितीय (Queen Elizabeth II) यांच्या सन्मानार्थ ९६ तोफांची सलामी (Gun Salute) देण्यात आली. त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक वर्षासाठी एक अशी ९६ फेऱ्यांची रॉयल तोफांची (Royal Gun) सलामी आज दिली आहे.
#WATCH | The United Kingdom: Royal gun salutes of 96 rounds to mark each year of #QueenElizabethII‘s life taking place in London, Belfast, Cardiff and Edinburgh.
(Source: Reuters) pic.twitter.com/2CIGXzfQ97
— ANI (@ANI) September 9, 2022
राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर विविध देशांत त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी निधन झाले. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतानेही शोक व्यक्त करत ११ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा (National Condolence) जाहीर केला आहे.