
A girl died during an exorcism in China and a court sentenced her mother to three years in prison
China exorcism death news 2026 : २१ व्या शतकात जग विज्ञानाच्या जोरावर चंद्रावर पोहोचले असताना, दुसरीकडे अंधश्रद्धेचा अंधार किती खोल आहे, याचे एक सुन्न करणारे उदाहरण चीनमधून (China) समोर आले आहे. दक्षिण चीनमधील एका न्यायालयाने नुकताच एका महिलेला तिच्या पोटच्या मुलीच्या हत्येप्रकरणी शिक्षा सुनावली. धक्कादायक बाब म्हणजे, ही हत्या कोणत्या रागातून नाही, तर ‘भूत उतरवण्याच्या’ (Exorcism) एका अघोरी विधी दरम्यान घडली. या घटनेने संपूर्ण चीनमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना ग्वांगडोंग प्रांतातील शेन्झेन शहरात घडली. ‘ली’ आडनाव असलेल्या एका महिलेच्या धाकट्या मुलीने अचानक विचित्र वागायला सुरुवात केली. तिला वाटले की तिला कोणत्यातरी ‘राक्षसाने’ पछाडले आहे. आई आणि मोठी बहीण देखील प्रचंड अंधश्रद्धाळू असल्याने त्यांनी यावर उपचार करण्याऐवजी स्वतःच ‘भूतमुक्ती’चा विधी करण्याचा निर्णय घेतला. त्यांना वाटले की त्यांच्या घरावर राक्षसांनी हल्ला केला आहे आणि त्यांच्या आत्म्याचा ताबा मिळवला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Yemen Partition: येमेन विभाजनाच्या उंबरठ्यावर; दक्षिणेकडील गट STCने जारी केले आपले संविधान, Saudi Arabiaने सुरू केले बॉम्बस्फोट
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हा अघोरी प्रकार घडला. विधी दरम्यान, आई आणि मोठ्या बहिणीने त्या मुलीला जमिनीवर पाडले. भूत पळून जावे म्हणून त्यांनी मुलीच्या छातीवर प्रचंड दाब दिला आणि तिच्या तोंडात जबरदस्तीने पाणी ओतले जेणेकरून तिला उलट्या व्हाव्यात. मुलीला या प्रक्रियेत प्रचंड त्रास होत होता, तरीही अज्ञानापोटी तिने त्यांना ‘पुढे सुरू ठेवा’ असे सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कुटुंबातील इतर सदस्य उठले, तेव्हा त्यांना ती मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिच्या तोंडातून रक्त येत होते आणि तिचा श्वास थांबला होता.
या प्रकरणी न्यायालयाने जुलै २०२५ मध्ये निकाल देताना ली आणि तिच्या मोठ्या मुलीला दोषी ठरवले. “आई आणि बहिणीचा मुलीला मारण्याचा कोणताही पूर्वहेतू नव्हता. त्यांना वाटले की ते तिची मदत करत आहेत. मात्र, त्यांच्या या निष्काळजीपणामुळे (Negligence) एका निष्पाप जीवाचा बळी गेला आहे,” असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने ली हिला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून ही शिक्षा ४ वर्षांसाठी स्थगित (Suspended Sentence) करण्यात आली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War Alert : ‘अमेरिकेने लायकीत राहावे…’ इराणने ट्रम्पला हस्तक्षेप न करण्याची दिली आक्रमक धमकी
या घटनेनंतर चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. “२१ व्या शतकातही लोक इतके हट्टी आणि अंधश्रद्धाळू कसे असू शकतात?” असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. या घटनेमुळे चीनमधील शिक्षण व्यवस्था आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. अंधश्रद्धेविरुद्ध लढण्यासाठी समाजात जनजागृती करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
Ans: मुलीचा मृत्यू 'भूतबाधा' उतरवण्याच्या अघोरी विधी दरम्यान छातीवर दाब पडल्यामुळे आणि जबरदस्तीने घशात पाणी ओतल्याने श्वास गुदमरून झाला.
Ans: न्यायालयाने आरोपी आईला ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे, जी ४ वर्षांसाठी स्थगित केली गेली आहे.
Ans: ही धक्कादायक घटना दक्षिण चीनमधील शेन्झेन (Shenzhen) शहरात घडली.