Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Top Live Stories India- मुस्लिम आरक्षणांतर्गत जी जात प्रमाणपत्रे वितरित केली जात होती, त्या प्रक्रियेला आता 'ब्रेक' लावण्यात आला आहे. जात पडताळणी किंवा वैधता (Validity) प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रियाही रद्द करण्यात आली

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 18, 2026 | 06:56 PM
Maharashtra breaking News Marathi

Maharashtra breaking News Marathi

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra to World Breaking News:

मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय 

मुंबई: मुस्लिम समाजाला (Muslim Community) देण्यात आलेल्या ५ टक्के आरक्षणाबाबत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. या आरक्षणासंदर्भात असलेला जुना शासन निर्णय (GR) रद्द करण्यात आला असून, यामुळे मुस्लिम समाजासाठी राबवली जाणारी जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रक्रिया आता पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.

२०१४ चा शासन निर्णय रद्द तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने २३ डिसेंबर २०१४ रोजी मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता राज्य शासनाने सुधारित शासन निर्णय प्रकाशित केला असून, त्यात २३ डिसेंबर २०१४ चा तो मूळ आदेश रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.

 

The liveblog has ended.
  • 18 Feb 2026 06:56 PM (IST)

    18 Feb 2026 06:56 PM (IST)

    Sunil Grover कडून Land Rover Defender 130 खरेदी, कारच्या किमतीत मुंबईत फ्लॅट घ्याल

    लोकप्रिय अभिनेता आणि कॉमेडियन Sunil Grover अलीकडेच त्याच्या नवीन Land Rover Defender 130 सोबत स्पॉट झाला आहे. डिफेंडर लाइनअपमधील ही सर्वात लांब एसयूव्ही असून ऑन-रोड किंमत जवळपास 2 कोटी रुपयांपर्यंत पोहोचते. लक्झरी आणि दमदार कार्सचे शौकीन असलेल्या सुनील ग्रोव्हर यांची ही नवी एसयूव्ही तिच्या आकर्षक डिझाइन आणि फीचर्समुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. लक्झरीसोबतच उत्कृष्ट ऑफ-रोडिंग क्षमता हवी असणाऱ्यांसाठी Defender 130 एक खास पर्याय मानला जातो.

  • 18 Feb 2026 06:35 PM (IST)

    18 Feb 2026 06:35 PM (IST)

    “पर्यावरण संवर्धन हे…” ; Mumbai Climate Week दरम्यान मंत्री पंकजा मुंडेंचे भाष्य

    मुंबई: राज्य शासन स्वच्छ हवा, स्वच्छ ऊर्जा आणि स्वच्छ वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. मुंबई क्लायमेट वीकदरम्यान आयोजित अर्थशॉट प्राईज उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी अर्थशॉट प्राइजचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेसन नॉफ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज आदी उपस्थित होते.

  • 18 Feb 2026 06:29 PM (IST)

    18 Feb 2026 06:29 PM (IST)

    आपत्ती आली तरी घाबरू नका! ‘दोन लाख विद्यार्थ्यांना…’; Mangal Prabhat Lodha यांची संकल्पना

    मुंबई: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील दोन लाख आयटीआयच्या विद्यार्थ्यांना टप्याटप्याने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळणार आहे. आपत्ती व्यवस्थापनाचा दीर्घ अनुभव असलेल्या ‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ आणि कौशल्य विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय यांच्यात आज यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

  • 18 Feb 2026 06:15 PM (IST)

    18 Feb 2026 06:15 PM (IST)

    SSC Exam 2026: विद्यार्थ्यांची 'परीक्षा' सुरू; ‘कॉपीमुक्त अभियान’ अन् वैद्यकीय कारणास्तव अनुपस्थित...

    सोनाजी गाढवे /पुणे:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी (SSC) परीक्षा (Career) शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार, दि. १८ मार्च २०२६ या कालावधीत राज्यभर आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत राज्य मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी दिली.

  • 18 Feb 2026 06:03 PM (IST)

    18 Feb 2026 06:03 PM (IST)

    Rahul Gandhi on BJP: “भारतीय डेटाची विक्री आणि चिनी उत्पादनांचे प्रदर्शन”; AI समिटवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल


    Rahul Gandhi News:
     देशाची राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘जागतिक एआय समिट’वरून (AI Summit) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या परिषदेला ‘अव्यवस्थित पीआर तमाशा’ संबोधत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या समिटमध्ये भारतीय प्रतिभेचा अपमान होत असून, भारतीयांचा डेटा विकला जात असल्याचा खळबळजनक दावा राहुल गांधींनी केला आहे.

  • 18 Feb 2026 05:47 PM (IST)

    18 Feb 2026 05:47 PM (IST)

    सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

    अभिनेता सलमान खानचे वडील ज्येष्ठ बॉलीवूड लेखक आणि सलीम खान यांना काल मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सलीम खान यांच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे. रूग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांच्या हेल्थबद्दल माहिती दिली आहे. लीलावती रुग्णालयाचे डॉ. जलील पारकर यांनी माध्यमांना सांगितले की सलीम खान यांची डिजिटल सब्स्ट्रैक्शन एंजियोग्राफी (DSA) करण्यात आली. ही मेंदूची शस्त्रक्रिया नाही.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 18 Feb 2026 05:31 PM (IST)

    18 Feb 2026 05:31 PM (IST)

    लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले अन् महिलेसोबत पुढे जे घडलं

    शहरातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ४० वर्षीय महिलेचा सहा जणांनी मिळून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शफिया सलीम शेख (वय ४०, रा. दांडेकर पूल) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत सहा आरोपींना अटक केली आहे.

    सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

  • 18 Feb 2026 05:09 PM (IST)

    18 Feb 2026 05:09 PM (IST)

    शिवजयंती मिरवणुकीत महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी

    छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजयंती उत्सवात मोठ्या संख्येने महिला सहभागी होत असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष नियोजन करावे, महिला पोलिसांची संख्या वाढवावी आणि मिरवणुकीदरम्यान वाहनांची घुसखोरी रोखावी, अशी ठाम मागणी रविवारी पोलिसांच्या वतीने आयोजित शिवजयंती महोत्सव समितीच्या समन्वय बैठकीत करण्यात आली. नागरिक व लोकप्रतिनिधींनी विविध समस्या मांडत ठोस उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली.

  • 18 Feb 2026 03:40 PM (IST)

    18 Feb 2026 03:40 PM (IST)

    30 मिनिटे मृत्यूशी झुंज… थांबलेलं हृदय, बंद झालेले श्वास, डॉक्टरांनी अक्षरशः खेचून आणला जीव

    एकदा का कुणाचा मृत्यू झाला की त्याचे पुन्हा जिवंत होणे अशक्य असते. ही गोष्ट आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. पण मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत होताना तुम्ही कधी पाहिले आहे का? अलिकडेच अशीच एक घटना सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसून आली आहे. डाॅक्टर हे कोणत्याही रुग्णासाठी देवदूताहून कमी नसतात आणि याचेच जिवंत उदाहरण अलिकडे सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओने अनेकांची मने जिंकली असून यात डॉक्टरांनी खऱ्या अर्थ्याने रुग्नाला मृत्यूच्या जाळ्यातून पुन्हा जिवंत केल्याचे अद्भुत दृश्य दिसून आले. चला व्हिडिओत नक्की काय घडलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

    वाचा सविस्तर 

  • 18 Feb 2026 03:30 PM (IST)

    18 Feb 2026 03:30 PM (IST)

    कब है होली? Kokan Railway ला पडला विसर?

    सावंतवाडी: कोकणच्या सर्वांत मोठ्या ‘शिमगोत्सवा‘साठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या जखमेवर रेल्वे प्रशासनाने मीठ चोळले आहे. सोमवारी दि. २ मार्च २०२६ रोजी होळी असताना, रेल्वेने चक्क तीन दिवस आधी म्हणजेच दि. २६ फेब्रुवारीलाच स्पेशल गाड्यांचे नियोजन केल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. हे नियोजन प्रवाशांच्या सोयीसाठी आहे की केवळ कागदोपत्री गाड्या धावण्यासाठी? असा जळजळीत प्रश्न आता विचारला जात आहे.

    वाचा सविस्तर 

  • 18 Feb 2026 03:19 PM (IST)

    18 Feb 2026 03:19 PM (IST)

    Pune News: पुण्याच्या पाण्यावरून हायव्होल्टेज ड्रामा!

    Water Resources Department Pune:   महापालिकेने तातडीने ९३३ कोटी रुपयांची थकबाकी भरावी, अन्यथा पाणी पुरवठा तत्काळ खंडित करण्याचा इशारा देणाऱ्या जलसंपदा विभागाला महत्पालिकेने दिला असला तरी ९३३ कोटी रूपये सोडा महापालिकेची कसलीही थकबाकी नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. ऊलट महापालिकेने देय रकमेपेक्षा ४११ कोटी रूपये जास्तीचे भरल्याचा दावा करत जलसंपदा विभागाला तोंडावर पाडले आहे.

  • 18 Feb 2026 02:45 PM (IST)

    18 Feb 2026 02:45 PM (IST)

    ‘ती’ एक मॅच अन् हार्दिक पांड्याने क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा दगड

    भारताचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याला कोणत्या वेगळ्या परिचयाची गरज नाही. भारतातच नाही तर जगभरात त्याचे बरेच चाहते आहेत. त्याने बऱ्याच वेळेला टीम इंडियाला कठीण परिस्थितीतून आपल्या खेळाच्या बळावर विजय मिळवून दिला आहे. कधी बॅटने, कधी बॉलने तर कधी दोन्हींचा करिश्मा दाखवत त्याने भारताला विजय मिळवून दिला आहे. या उंचीवर पोहोचण्यासाठी हार्दिकच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट होता. त्याबाबत स्वत: हार्दिक पांड्याने सांगताना २०१६ च्या टी-२० विश्वचषकातील एका मॅचची आठवण सांगितली.

  • 18 Feb 2026 02:40 PM (IST)

    18 Feb 2026 02:40 PM (IST)

    मुस्लीम आरक्षण रद्द झाल्याने राज्यात वादाची ठिणगी: काँग्रेसने महायुतीला धरले धारेवर

    राज्यामध्ये पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून मुस्लीम समाजाला देण्यात आलेले 5 टक्के आरक्षण हे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीचे सरकार राज्यामध्ये असताना मुस्लीम आरक्षण देण्यात आले होते. मात्र आता याला ब्रेक लावण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर मुस्लीम समाजासाठी राबवण्यात आलेल्या जात प्रमाणपत्र प्रक्रिया देखील थांबवण्यात आली आहे.

  • 18 Feb 2026 02:35 PM (IST)

    18 Feb 2026 02:35 PM (IST)

    विदर्भात परदेशी पाहुण्यांची तुरळक हजेरी! हवामान बदल, अधिवास हस्तक्षेपाने अडचण

    दरवर्षी हजारोंच्या संख्येने शेकडो स्थलांतरीत पक्षी दूरवरचा प्रवास पूर्ण करीत विदर्भातील जलाशयांवर विसावतात. यंदाही काही प्रजातींनी जलाशयांवर हजेरी लावली आहे. मात्र फेब्रुवारी अर्धा संपत आला असला तरी दरवर्षी लागणारी परदेशी पाहुण्यांच्या हजेरीत हवी तशी वाढ अजून झालेली नाही. केवळ अकोलाच नव्हे तर संपूर्ण विदर्भाची ती अवस्था असून हवामान बदल, पक्षी अधिवास अन् जलाशय परिसरातील वाढता मानवी हस्तक्षेप ही त्याची प्रमुख कारणे असल्याचे बोलले जात आहे.

  • 18 Feb 2026 02:30 PM (IST)

    18 Feb 2026 02:30 PM (IST)

    ‘आमचा काका गेलाय, आम्ही शांत बसणार नाही!’ रोहित पवार भाजपवर कडाडले

    Rohit Pawar PC:  ‘मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घातपाताचा मुद्दा मांडत असताना भाजपचे लोक मला ट्रोल करत आहेत.  मी ट्रोलर्सची माहिती घेतली, तर ते भाजपच्या बड्या नेत्याचे ट्रोलर्स आहेत. यातल्या एका ट्रोलरने  अपघाताच्या दोन तीन दिवस आधी एक ट्विट करून ते अवघ्या सात मिनिटात डिलीट केलं होत.  महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भुकंप होणार असल्याचे त्याने ट्विटमध्ये म्हटलं होतं. हे  पैसे घेऊन काम करणारे लोक आहेत,” अशा शब्दांत रोहित पवार यांनी यावेळी केला.  (Ajit Pawar Plane Crash )

  • 18 Feb 2026 02:25 PM (IST)

    18 Feb 2026 02:25 PM (IST)

    T20 World Cup 2026 दरम्यान भारतीय वंशाच्या खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा

    T20 World Cup 2026 News In Marathi : टी-२० विश्वचषकादरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील कॅनडाचा प्रवास संपत असताना, एका खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. कॅनडाचे माजी कर्णधार नवनीत धालीवाल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

  • 18 Feb 2026 02:20 PM (IST)

    18 Feb 2026 02:20 PM (IST)

    भरधाव वेगात बुलेटवर स्टंट ठरला जीवघेणा; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन मित्रांचा मृत्यू

    नागपूर: नागपूर येथून एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव वेगात बुलेटवर स्टंट करत असतांना बुलेट रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या खांबाला धडकली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना बजाज नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काचीपुरा परिसरात घडली. या अपघात मृत झालेल्या तरुणांची नावे युग विशाल चनकापूरे (वय 19) आणि रुद्र शशिकांत सोमकुंवर (वय 19) अशी आहे. हे दोघेही काचीपुरा येथील रहिवासी होते.

  • 18 Feb 2026 02:10 PM (IST)

    18 Feb 2026 02:10 PM (IST)

    ‘लक्ष्मी निवास’ मध्ये महाशिवरात्रीच्या पूजेत निलांबरीचा कट; सिद्धूचा थरारक सामना

    गाडे पाटीलांच्या घरी महाशिवरात्रीचा सण दरवर्षी अत्यंत भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. या पूजेची खास ओळख म्हणजे दरवर्षी नव्याने शंकराची पिंड तयार केली जाते. त्या पिंडीची विधीपूर्वक पूजा करून तिची घरात स्थापना केली जाते. यंदाही घरात उत्साह, श्रद्धा आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पवित्र दिवशी संपूर्ण कुटुंब एकत्र जमले असून सगळ्यांच्या चेहऱ्यावर भक्तिभाव आणि समाधान झळकत आहे.

  • 18 Feb 2026 01:55 PM (IST)

    18 Feb 2026 01:55 PM (IST)

    ‘मुसलमान कुत्र्यांपेक्षाही…’; ट्रम्प समर्थक खासदाराच्या वादग्रस्त पोस्टने जगभरात खळबळ

    अमेरिकेच्या (America) राजकीय वर्तुळात मोठा वाद पेटला आहे. फ्लोरिडा येथील डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) समर्थक खासदाराने मुस्लिम समाजाबद्दल सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. यामुळे अमेरिका आणि जगभरात वाद पेटला आहे. या पोस्टमध्ये खासदार रँडी फाइन यांनी मुस्लिमांची तुलना कुत्र्यांशी केली आहे. यामुळे मानवाधिकार संघटना आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर तीव्र टीका केली आहे. तसेच रँडी फाइन यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे.

  • 18 Feb 2026 01:40 PM (IST)

    18 Feb 2026 01:40 PM (IST)

    पाकिस्तानसाठी हा सामना ‘करो या मरो’, ही एक चूक अन् पाक T20 World Cup 2026 मधून बाद

    भारताविरुद्धच्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानचा टी-२० विश्वचषकातील (T20 World Cup 2026) प्रवास एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. ज्यामुळे आजचा (18 फेब्रुवारी) नामिबियाविरुद्धचा सामना ‘करो या मरो’ असा झाला आहे. एकेकाळी पाकिस्तान सुपर आठमध्ये प्रवेश करण्यासाठी चांगल्या स्थितीत दिसत होता. परंतु भारताविरुद्धच्या पराभवामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. परिणाणी त्यांच्या शेवटच्या ‘अ’ गटातील सामन्यात त्यांना ‘करो या मरो’ अशा परिस्थितीत सामोरे जावे लागले आहे.

  • 18 Feb 2026 01:35 PM (IST)

    18 Feb 2026 01:35 PM (IST)

    पायलटचा वापर करून अजित पवारांच्या विमानाचा अपघात…? रोहित पवारांचे खळबळजनक दावा

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात आम्ही काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर तपास यंत्रणांना या घटनेचा तपास सुरू केला. याचे समाधान आहे. पण ज्या गतीने हा तपास सुरू आहे. त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.  अजित पवार यांच्या विमानातील इंधनाच्या टाक्या पूर्ण भरण्याची काय गरज होती. असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे. रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या अपघात आणि VSR विमान कंपनीच्या कारभारासंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • 18 Feb 2026 01:30 PM (IST)

    18 Feb 2026 01:30 PM (IST)

    महाराष्ट्रसह 10 राज्यातील राज्यसभा निवडणूका जाहीर; शरद पवार पुन्हा खासदारकी स्वीकारणार का?

    भारतीय निवडणूक आयोगाने १० राज्यांमधील ३७ रिक्त राज्यसभेच्या जागांसाठी द्वैवार्षिक राज्यसभेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. (Political News) यामध्ये महाराष्ट्रसह ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, आसाम, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि बिहार या राज्यांचा समावेश आहे. या राज्यामध्ये पक्षातील आमदार, खासदार हे राज्यसभा खासदारांसाठी मतदान करणार आहेत. मतदानाची तारीख १६ मार्च २०२६ रोजी निश्चित करण्यात आली आहे. मतमोजणी त्याच दिवशी होईल. एप्रिलमध्ये या जागा वेगवेगळ्या तारखांना रिक्त होणार आहेत यासाठी आयोगाने निर्णय घेतला आहे.

  • 18 Feb 2026 01:25 PM (IST)

    18 Feb 2026 01:25 PM (IST)

    युवराज-ताराची भावनिक प्रेमकथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

    स्टार प्लसने गेल्या अनेक वर्षांत प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या वैविध्यपूर्ण मालिकांद्वारे सातत्याने मनोरंजन केले आहे. आयकॉनिक प्रेमकथा आणि नात्यांमधील भावनिक गुंतागुंत प्रभावीपणे मांडण्याची या चॅनेलची खास ओळख आहे. सशक्त कथनशैली आणि लक्षात राहणाऱ्या पात्रांमुळे स्टार प्लसने भारतीय टेलिव्हिजनवर वेगळी छाप निर्माण केली आहे. हीच परंपरा पुढे नेत आता स्टार प्लस आपल्या आगामी तारा या मालिकेद्वारे आणखी एक नवी, हृदयस्पर्शी प्रेमकथा प्रेक्षकांसमोर सादर करण्यास सज्ज आहे.

  • 18 Feb 2026 01:20 PM (IST)

    18 Feb 2026 01:20 PM (IST)

    Inspector Manju मध्ये नवा ट्विस्ट; सत्या–मंजूच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री!

    ‘सन मराठी’वरील ‘इन्स्पेक्टर मंजू’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरत आहे. मालिकेत सतत नवे ट्विस्ट येत असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.काही दिवसांपूर्वी मंजूला सत्या निर्दोष असल्याचं कळतं. मात्र तिच्याकडे त्याचे ठोस पुरावे नसतात. सत्या आणि मंजूचं नातं पुन्हा सुरळीत झाल्यानंतर मम्मीसाहेब त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांचा कोणताही डाव यशस्वी होत नाही.

  • 18 Feb 2026 01:15 PM (IST)

    18 Feb 2026 01:15 PM (IST)

    ५१ वर्षांच्या कारकिर्दीनंतर रजनीकांत निवृत्त होणार? शेवटच्या चित्रपटावर काम सुरू

    ७५ वर्षांच्या वयातही, दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरहिट अभिनेता रजनीकांत आपल्या अभिनयाने लाखो लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. या वयातही ते चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारून तरुण कलाकारांशी स्पर्धा करत आहेत. चाहत्यांना रजनीकांत यांचा २०२५ चा ‘कुली’ चित्रपट खूप आवडला आणि ते सध्या त्यांच्या ‘जेलर’ चित्रपटाच्या सिक्वेलच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत आणि यादरम्यान, त्यांनी त्यांच्या निवृत्तीची योजना सुरू केली आहे. असा दावा केला जात आहे की रजनीकांत यांनी त्यांच्या शेवटच्या चित्रपटाची योजना आधीच सुरू केली आहे आणि यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

  • 18 Feb 2026 01:05 PM (IST)

    18 Feb 2026 01:05 PM (IST)

    मैत्रिणीने नशेची औषध दिलं, नंतर बलात्कार घडवून आणला अन् व्हिडीओ काढून…

    उत्तरप्रदेश येथून एक विश्वासाला तडा बसणारी घटना समोर आली आहे. दोन तरुणींनी मिळून एका मैत्रिणीची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन तरुणींनी आपल्या मैत्रिणीला घरी बोलावलं त्यांनतर तिच्यावर आपल्याच भावाकडून बलात्कार घडवून आणला. त्याचे व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल देखील केल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलगी ही १० विची विद्यार्थीनी आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

  • 18 Feb 2026 12:50 PM (IST)

    18 Feb 2026 12:50 PM (IST)

    सिद्धार्थ मल्होत्रावर कोसळला दुःखाचा डोंगर;

    बॉलीवूड इंडस्ट्रीमधून आता आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. सिद्धार्थ मल्होत्राचे वडील सुनील मल्होत्रा ​​यांचे निधन झाले आहे. अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे असे दिसते आहे. सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांच्या निधनाच्या बातमीने चाहते देखील चिंता व्यक्त करताना दिसले. अभिनेत्याने आता त्यांच्या आठवणीत एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने वडिलांच्या निधनाचे कारण उघड केले आहे.

  • 18 Feb 2026 12:40 PM (IST)

    18 Feb 2026 12:40 PM (IST)

    हरियाणा हादरलं! पतीनेच घेतला पत्नीचा जीव

    हिसार येथे पतीनेच दोन महिन्यांच्या गर्भवती पत्नी महकची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीचा मृतदेह माहेरी पोहोचताच कुटुंबावर शोककळा पसरली असून पोलिसांनी गुन्हा दाखल

  • 18 Feb 2026 12:30 PM (IST)

    18 Feb 2026 12:30 PM (IST)

    झुकेगा नही… Graduation Day ला सरांची पुष्पा स्टाईल ; Gen Alpha मुलांसोबत पोज देतानाचा VIDEO VIRAL

    सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ अतिशय संतापजनक असतात, तर काही व्हिडिओ थेट मनाला भिडतात. सध्या असाच एक शिक्षक विद्यार्थ्यांच्या नात्याच्या एक गोंडस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक सर आपल्या Gen Alpha विद्यार्थ्यांसोबत हटके स्टाईलमध्ये पोझ देताना दिसत आहे. हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत असून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

  • 18 Feb 2026 12:20 PM (IST)

    18 Feb 2026 12:20 PM (IST)

    काउंटडाउन झाला सुरु… गुगलच्या बहुप्रतिक्षित ईव्हेंटची तारीख जाहीर, Gemini आणि अँड्रॉईडवर असणार फोकस

    टेकप्रमींना आणि विशेषत: अँड्रॉईड यूजर्सना गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रतिक्षा होती, तो क्षण लवकरच येणार आहे. टेक दिग्गज कंपनी गुगलने त्यांचा वर्षातील पहिला आणि सर्वात मोठ्या ईव्हेंटची घोषणा केली आहे. कंपनीने ईव्हेंटची तारीख जाहीर केली आहे. तसेच याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट देखील शेअर करण्यात आली आहे. टेक दिग्गज कंपनी गुगलने त्यांच्या वर्षातील सर्वात मोठ्या डेवलपर कॉन्फ्रेंस Google I/O 2026 च्या तारीख जाहीर केली आहे.

  • 18 Feb 2026 12:10 PM (IST)

    18 Feb 2026 12:10 PM (IST)

    ‘माझी वसुंधरा’त सांगली जिल्हा परिषदेची सलग तिसऱ्यांदा राज्यात बाजी; पर्यावरणपूरक वाटचाल पुन्हा अधोरेखित

    पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि लोकसहभागाच्या बळावर राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात सांगली जिल्हा परिषदेने सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक पटकावून आपली पर्यावरणपूरक वाटचाल अधोरेखित केली आहे. जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींनी विविध लोकसंख्या गटांत उल्लेखनीय कामगिरी नोंदवत सुमारे साडेदहा कोटी रुपयांचे बक्षीस मिळवले आहे.

  • 18 Feb 2026 12:00 PM (IST)

    18 Feb 2026 12:00 PM (IST)

    पैसे द्या अन् बांधकाम कामगार व्हा..; माणमध्ये एजंटगिरी आणि भ्रष्ट्राचार फोफावला

    राज्य शासनाने बांधकाम मजुरांना आर्थिक बळकटी देण्यासाठी बांधकाम कामगार योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थी बांधकाम कामगारांना घरकुलासाठी आणि त्यांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा व त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती ही दिली जात असल्याने बांधकाम कामगारांसाठी (Construction Workers) ही योजना वरदान ठरली आहे, मात्र या योजनेचा लाभ खऱ्या बांधकाम कामगारांना न मिळता तो बोगस कामगारांना दिला जात असून हा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरुन एजंटानी शासनाचीच लुट सुरु केली असल्याचा प्रकार माण तालुक्यात घडत आहे.

  • 18 Feb 2026 11:50 AM (IST)

    18 Feb 2026 11:50 AM (IST)

    शिवजयंतीनिमित्त सांगलीत उद्या मेगा पदयात्रा; सकाळी साडेसात वाजता होणार सुरुवात

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात गुरुवारी (दि.१९) सकाळी ७.३० वाजता मेगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद सांगली ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ही पदयात्रा काढण्यात येणार असून, केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

  • 18 Feb 2026 11:40 AM (IST)

    18 Feb 2026 11:40 AM (IST)

    ‘The Kerala Story 2 – Go Beyond’ चित्रपटाला नितेश राणेंचा जाहीर पाठिंबा

    आज ‘द केरळ स्टोरी २: गोज बियॉन्’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर ट्रेलरची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून अनेकांनी चित्रपटाविषयी उत्सुकता व्यक्त केली आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ या गाजलेल्या चित्रपटाचा हा पुढील भाग असल्याने प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच या चित्रपटाची कथा जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

  • 18 Feb 2026 11:30 AM (IST)

    18 Feb 2026 11:30 AM (IST)

    पोलीस होण्याचं स्वप्न अधुरंच! सरावासाठी गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

    छत्रपती संभाजीनगर येथून एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २० वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सुशांत संतोष भोजने (२० वर्ष, रा. वरुडी, सध्या मुक्काम दावरवाडी शिवार) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

  • 18 Feb 2026 11:20 AM (IST)

    18 Feb 2026 11:20 AM (IST)

    मुंबईत फ्रान्स अध्यक्ष मॅक्रॉन यांचा ‘जय हो’ चा नारा; भारताचे केले भरभरुन कौतुक

    मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांची मुंबईत ऐतिहासिक बैठक झाली. या भेटीने भारत-फ्रान्स संबंध एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चेनंतर स्पेशल स्ट्रॅटेजिक ग्लोबल पार्टनरशिपची घोषणाही करण्यात आली आहे. याच वेळी मॅक्रॉन यांनी भारताचे भरभरुन कौतुक केले आहे. त्यांनी जय हो चा नारा देत भारताच्या तांत्रिक प्रगतीवर मोठे विधान केले आहेत. तसेच या भेटीत दोन्ही देशांतील भविष्यातील सहकार्याचा आराखडाही मांडण्यात आला आहे.

  • 18 Feb 2026 11:10 AM (IST)

    18 Feb 2026 11:10 AM (IST)

    भारत बनणार टेक लीडर? पंतप्रधान Narendra Modi च्या भाषणाने वाढली उत्सुकता

    एआय म्हणजेच कृत्रिम बुदधीमत्तेबाबत आमचा दृष्टीकोन अगदी स्पष्ट आहे, एआयने जागतिक विकासाला गती द्यावी, परंतु तो पूर्णपणे मानवकेंद्री राहिला पाहिजे. एआय मानवी क्षमता वाढवू शकते, पण अंतिम निर्णयाची जबाबदारी नेहमी माणसाकडेच असली पाहिजे. तंत्रज्ञान मानवाची सेवा करण्यासाठी आहे, त्याची जागा घेण्यासाठी नाही. या क्षेत्रात आम्ही केवळ प्रतिभा विकसित करत नाही आहोत, तर भारताने एआय क्रांतीत सहभागी होण्यापासून ती घडविण्याकडे वाटचाल करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, धोरणात्मक व्यवस्था आणि कौशल्यांचा पाया उभारत आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

  • 18 Feb 2026 10:55 AM (IST)

    18 Feb 2026 10:55 AM (IST)

    क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांचा जन्मदिन, 18 फेब्रुवारीचा इतिहास

    18 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

    • 1965: गांबियाला इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाले.
    • 1998: ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांना सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला.
    • 2001: संगीतकार आणि गायक भूपेन हजारिका यांना मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित केले.
    • 2002: नासाच्या मार्स ओडिसी स्पेस प्रोबने त्याच्या थर्मल एमिशन इमेजिंग सिस्टमचा वापर करून मंगळाच्या पृष्ठभागाचे मॅपिंग करण्यास सुरुवात केली.
  • 18 Feb 2026 10:50 AM (IST)

    18 Feb 2026 10:50 AM (IST)

    बंगळुरूत उभारली जाणार देशातील पहिली Humanity AI City

    भारत २०,००० अधिक जीपीयू जोडण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे देशातील एआय कंप्यूट इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्याच्या उद्देशाने एकूण उपलब्ध क्षमता सध्याच्या ३८,००० जीपीयूंपेक्षा जास्त होईल, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी सांगितले. जीपीयू किंवा ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट ही एक शक्तिशाली संगणक चिप आहे जी मशीनला जलद विचार करण्यास, प्रतिमा प्रक्रिया करण्यास, एआय प्रोग्राम चालविण्यास आणि नियमित प्रोसेसरपेक्षा जटिल कामे अधिक कार्यक्षमतेने हाताळण्यास मदत करते.

  • 18 Feb 2026 10:45 AM (IST)

    18 Feb 2026 10:45 AM (IST)

    मुस्लीम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द

    मुस्लीम आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.   मुस्लीम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के आरक्षण राज्य सरकारने रद्द केल आहे. याशिवाय मुस्लीम समाजासाठी राबवण्यात आलेल्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेलाही  ब्रेक लावण्यात आला आहे.  काँग्रेस  आणि राष्ट्रवादी काँग्रेस  यांच्या आघाडी सरकारने  मुस्लीम समाजाला हे आरक्षण दिले होते. तेव्हापासून ही प्रक्रिया राबवली जात होती. पण आता राज्य शासनाने सुधारित शासन निर्णय  आणि परिपत्रक जारी केल आहे. यात  मुस्लीम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द कऱण्यात आले आहे. राज्य सरकारच्या यानिर्णयामुळे राजकीय वातावरण मात्र तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • 18 Feb 2026 10:40 AM (IST)

    18 Feb 2026 10:40 AM (IST)

    आग लावणार तितक्यात चितेवरून उचललं पार्थिव...

    शिवपुरीच्या मुक्तिधाममध्ये एका अंत्यसंस्काराच्या वेळी अचानक वन विभागाचे पथक आले आणि त्यांनी चितेवरील मृतदेह उचलून रुग्णवाहिकेत नेण्याची घाई केली. खरंतर घडलं असं की, मृत झालेला तो व्यक्ती वन विभागाचा कर्मचारी होता ज्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. सरकारी प्रक्रिया आणि फायदे सुनिश्चित करण्यासाठी शवविच्छेदन आवश्यक असल्याचे विभागाने म्हटले आहे आणि म्हणूनच मृतदेहाला शवविच्छेदनासाठी चितेवरुन उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

  • 18 Feb 2026 10:34 AM (IST)

    18 Feb 2026 10:34 AM (IST)

    हास्यजत्रेच्या कलाकारांसमोर रोहित शर्माने मारल्या गप्पा

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांना नेहमीच चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत असते. त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी चाहत्यांची नेहमीच गर्दी होताना दिसत असते. मात्र यावेळी हास्यजत्रेच्या शिलेदारांनाच खास ‘फॅन मोमेंट’ अनुभवण्याची संधी मिळाली आहे. कारण सुप्रसिद्ध क्रिकेटपटू रोहित शर्मा याला भेटण्याचा योग ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकातील कलाकारांना मिळाली आहे. काही क्षणांची ही भेट कलाकारांसाठी आयुष्यभराची आठवण ठरली आहे.

  • 18 Feb 2026 10:00 AM (IST)

    18 Feb 2026 10:00 AM (IST)

    खराब कोलेस्टरॉलमुळे रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या आहेत

    जीवनशैलीतील बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. हल्ली तरुण वयातील मुलामुलींना कोणत्याही वयात हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येत आहे. हृदयरोगाचे प्रमाण वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. चुकीच्या वेळी जेवण, अपुरी झोप, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येत आहे. शरीरात वाढलेले उच्च कोलेस्ट्रॉल पुढे जाऊन गंभीर आजारांचे कारण बनते. यामुळे हृदयविकाराचा झटका येणे, रक्तवाहिन्या ब्लॉक होणे, स्ट्रोक इत्यादी गंभीर आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे आजारांपासून बचाव करण्यासाठी जीवनशैली आणि आहारात बदल करणे आवश्यक आहे. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले अनावश्यक फॅट शरीरासाठी धोक्याचे ठरते.... वाचा सविस्तर- 

  • 18 Feb 2026 09:55 AM (IST)

    18 Feb 2026 09:55 AM (IST)

    Jalgaon Crime: पोलीस दलाच्या पंपात आर्थिक घोटाळा!

    जळगाव: जळगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा पोलीस दलाच्या मालकीच्या दक्षता पेट्रोल पंपावर १ कोटी ३३ लाख 752 रुपयांचा आर्थिक घोटाळा समोर आलं आहे. हा गैरप्रकार दक्षाता पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकानंच केल्याचे समोर आले आहे. या पेट्रोल पंपाचं व्यवस्थापक पद पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक वाघ मधुकर यांच्याकडे होते. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाधीक्षक संदीप उत्तमराव पाटील यांच्या फिर्यादीवरून अपहाराचा गुन्हा वाल्मिक मधुकर वाघ यांच्या फिर्यादीवरून दाखल केला आहे. वाचा सविस्तर- 

  • 18 Feb 2026 09:52 AM (IST)

    18 Feb 2026 09:52 AM (IST)

    RSS च्या शताब्दी वर्षात ‘शतक’ चित्रपटाची चर्चा

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त साकार होत असलेल्या ‘शतक’ या चित्रपटाबाबत देशभरात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. नवी दिल्लीतील केशव कुंज येथे आयोजित विशेष कार्यक्रमात संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या चित्रपटाविषयी मनोगत व्यक्त करत त्याला केवळ एक चित्रपट नव्हे, तर एका वैचारिक आणि राष्ट्रीय प्रवासाचे जिवंत चित्रण असे संबोधले आहे. वाचा सविस्तर- 

  • 18 Feb 2026 09:46 AM (IST)

    18 Feb 2026 09:46 AM (IST)

    आठवड्याभरात चेहऱ्यावरील पिंपल्स होतील कायमचे गायब!

    वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. प्रत्येक ऋतूनुसार हवामानात सतत काहींना काही बदल होत असतात. कधी ऊन तर कधी पाऊस, थंडी पडत असल्यामुळे आरोग्य बिघडते. चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येणे, त्वचा काळी पडणे. केसांमध्ये कोंडा होणे याशिवाय त्वचेच्या इतरही बऱ्याच समस्या उद्भवतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, काळे डाग, मुरूम आणि सुरकुत्या त्वचेचे सौंदर्य पूर्णपणे नष्ट करून टाकतात. त्यामुळे सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची काळजी घेणे खूप जास्त आवश्यक आहे. चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्सला बऱ्याचदा खूप जास्त खाज सुटते तर काहीवेळा पिंपल्समधून पाणी किंवा पू येतो. चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्समुळे त्वचा पूर्णपणे निस्तेज होऊन जाते. वाचा सविस्तर- 

  • 18 Feb 2026 09:41 AM (IST)

    18 Feb 2026 09:41 AM (IST)

    सकाळचा नाश्ता फक्त टेस्टीच नाही तर पौष्टिकही करा, घरी बनवा ‘हिरव्या मूगडाळीचे अप्पे

    हिरव्या मुगडाळीचे अप्पे हे पारंपरिक चवीला आधुनिक हेल्दी ट्विस्ट देणारे उत्तम नाश्त्याचे पदार्थ आहेत. दक्षिण भारतीय पद्धतीतील अप्यांमध्ये हे अप्पे बाहेरून हलके कुरकुरीत आणि आतून मऊसर लागतात. हिरवी मुगडाळ ही प्रथिनांनी, फायबरने आणि आवश्यक खनिजांनी समृद्ध असल्यामुळे हे अप्पे पोटभरीचे आणि आरोग्याला पौष्टिक ठरतात. वाचा सविस्तर- 

  • 18 Feb 2026 09:40 AM (IST)

    18 Feb 2026 09:40 AM (IST)

    बारावी परीक्षेचा ताण असहाय्य झाल्याने विद्यार्थिनीचे टोकाचे पाऊल

    नाशिक : परीक्षेचा ताणतणाव, जेईईसारख्या परीक्षेचा निकालाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर खोलवर परिणाम करतो. विद्यार्थीनुरूप यश-अपयश ठरते. मात्र, सध्याची स्पर्धाच इतकी तीव्र झाली की, त्यात विद्यार्थ्यांना पुढे फरफटत जाण्याशिवाय पर्यायच राहत नाही. काही निभावून घेतात, तर काही कोवळे जीव मात्र स्पर्धेच्या पलीकडे पोहचतात. अशीच एक दुर्देवी घटना जयभवानी रोड परिसरात घडली.

  • 18 Feb 2026 09:20 AM (IST)

    18 Feb 2026 09:20 AM (IST)

    पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांना टोलचे पैसे परत मिळणार 

    पुणे/मुंबई: पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण वाहतूक कोंडीनंतरही वाहनचालकांकडून टोल आकारण्यात आल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) कडक पाऊल उचलले आहे. या प्रकरणी संबंधित टोल ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली असून, ज्या वाहनचालकांकडून टोल वसूल करण्यात आला आहे, त्यांना ती रक्कम परत करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    अपघात आणि ५० किलोमीटरची कोंडी ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:३० च्या सुमारास खंडाळा घाटातील अदोशी बोगद्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर प्रोपिलीन वायू वाहून नेणारा एक टँकर उलटला होता. गॅस गळतीचा धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी बंद केला होता. या अपघातामुळे महामार्गावर तब्बल ५० किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हजारो प्रवासी आणि वाहनचालक तासन्‌तास अन्ना पाण्याविना महामार्गावर अडकून पडले होते.

  • 18 Feb 2026 09:15 AM (IST)

    18 Feb 2026 09:15 AM (IST)

    पुण्यात फेब्रुवारीतच उन्हाळ्याचा तडाखा; किमान तापमानात मोठी वाढ

    पुणे: पुणेकर सध्या फेब्रुवारी महिन्यातच कडक उन्हाचा अनुभव घेत असताना, आता रात्रीच्या तापमानातही मोठी वाढ झाली आहे. शिवाजीनगर भागात सोमवारी किमान तापमान १४.८ अंश सेल्सिअस होते, त्यात मंगळवारी एकाच दिवसात ४ अंशांची वाढ होऊन ते १८.४ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. रात्रीच्या तापमानात झालेली ही वाढ सरासरीपेक्षा ५.५ अंशांनी जास्त असल्याने पुणेकरांना आता रात्रीचा उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यातच किमान तापमानाने १८ अंशांचा टप्पा ओलांडणे ही चिंतेची बाब मानली जात आहे.

    मिश्र वातावरणाची झाली समाप्ती? फेब्रुवारीच्या सुरुवातीला पुणेकर दिवसा ऊन आणि पहाटे गारवा अशा संमिश्र वातावरणाचा अनुभव घेत होते. मात्र, मंगळवारच्या नोंदीनुसार किमान तापमानात झालेली झपाट्याने वाढ पाहता, पहाटेचा गारवाही आता कमी झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) मते, पुढील काही दिवसांत उन्हाचा तडाखा अधिक वाढण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याची चाहूल यंदा वेळेआधीच लागल्याने पुणेकरांना आतापासूनच वाढत्या उष्णतेचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Maharashtra breaking news 18th february live udates in marathi maharashtra national international politics war sports crime entertainment share market gold sliver rates ipl updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 08:48 AM

Topics:  

  • international news
  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • National Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today:  बारामतीत पुन्हा विमान अपघात
1

Maharashtra Breaking News Updates Today:  बारामतीत पुन्हा विमान अपघात

Maharashtra Politics: राजकारणात मोठी खळबळ! सुनील तटकरे थेट ‘सिल्व्हर ओक’वर; शरद पवारांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण
2

Maharashtra Politics: राजकारणात मोठी खळबळ! सुनील तटकरे थेट ‘सिल्व्हर ओक’वर; शरद पवारांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण

Ahilyanagar : शेकडो वारकऱ्यांचे ‘टाळ-मृदुंग’ आंदोलन; लवांडेंना अटकेचा इशारा
3

Ahilyanagar : शेकडो वारकऱ्यांचे ‘टाळ-मृदुंग’ आंदोलन; लवांडेंना अटकेचा इशारा

Devendra Fadnavis News: राज्यातील १२ मंत्र्यांचा जपान दौरा रद्द! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
4

Devendra Fadnavis News: राज्यातील १२ मंत्र्यांचा जपान दौरा रद्द! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.