Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jeffrey Epstein Case: अघोरी नार्सिसिस्ट! एपस्टीनच्या अत्याचाराला बळी पडलेल्या  रिना ओहचा धक्कादायक खुलासा

एपस्टीनच्या फ्लोरिडा येथील निवासस्थानाची कहाणी सांगिताना ती म्हणाली की, “ एपस्टीनच्या फ्लोरिडा येथील बंगल्यात पोहोचल्यावर मला परिस्थिती भयानक असल्याचे जाणवले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 20, 2026 | 01:52 PM
Jeffrey Epstein Case, Sexual Abuse and Exploitation, Psychological Torture, Global News, Jeffrey Epstein Survivors Stories,

Jeffrey Epstein Case, Sexual Abuse and Exploitation, Psychological Torture, Global News, Jeffrey Epstein Survivors Stories,

Follow Us
Close
Follow Us:
  • सुरुवातीला कोणतीही अट नसल्याचे सांगून शिष्यवृत्ती दिली, पण नंतर वारंवार फोन करून भेटीसाठी दबाव टाकला.
  • तिथे गेल्यावर रिना पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या. त्यांच्याकडे ना पैसे होते ना प्रवासाचे साधन, ज्यामुळे त्या तिथे अडकून पडल्या.
  • मसाज रूममध्ये जाणारे पाहुणे, संशयास्पद फोन कॉल्स आणि विचित्र पुस्तके पाहून त्यांना तिथे काहीतरी गंभीर गैरप्रकार सुरू असल्याचे जाणवले.
 

Jeffrey Epstein Case:  जगभरात खळबळ उडवणाऱ्या जेफ्री एपस्टीनचे नवनवे कारनामे सातत्याने समोर येत आहे.  जेफ्रिच्या कारनाम्यांना जगभरातील हजारो महिला बळी पडल्या.  यात भारतातील काही महिलांचाही समवेश होता. अशातच जेफ्रीच्या अत्याचाराला  बळी पडलेल्या रिना ओहने दशकांनंतर  मौन सोडले आहे. जेफ्रीच्या जाळ्यात अडकलेल्या रिनाने तिच्यासोबत घडलेल्या भयानक घटनांमुळे तिचे आयुष्य कसे बदलून गेले, ही सर्व आपबीती तिने एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितली आहे.

रिना ओहने जेफ्रीला रेजिंग नार्सिसिस्ट आणि मानसिक रोगी असल्याचे वर्णन केलं आहे.एपस्टिनने तिच्यावर केवळ शारिरीकच नव्हे तर वेगवेगळ्या पद्धतीने मानसिक आणि भावनिक अत्याचार केले. त्याचे कारनामे उघड करू नयेत, यासाठी त्याने तिला अनेकदा धमक्याही दिल्या.

पुन्हा युद्धाचं सावट?, इराणमध्ये लढाऊ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू; ट्रम्प यांनी दिलेली हल्ल्याची धमकी…

भारतीय वंशाची न्यू यॉर्कमधील रहिवासी असलेल्या ४० वर्षीय रीना ओह म्हणाली की, मी १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात एपस्टाईनला भेटली होते. तेव्हा मी २१ वर्षांची कला शाखेची विद्यार्थीनी होते. त्याने मला शिष्यवृत्तीचे आश्वासन देऊन आपल्या जाळ्यात ओढले.  एपस्टाईन म्हणाला की ही कोणत्याही अटींशिवाय शिष्यवृत्ती आहे आणि मला त्याला पुन्हा भेटण्याची गरज नाही. पण नंतर तो मला वारंवार फोन करत राहिला. जेव्हा मी त्याला भेटण्यात रस दाखवला नाही तेव्हा त्याने शिष्यवृत्ती मागे घेण्याची धमकी दिली. (Jeffrey Epstein Case)

एपस्टीनच्या फ्लोरिडा येथील निवासस्थानाची कहाणी सांगिताना ती म्हणाली की, “ एपस्टीनच्या फ्लोरिडा येथील बंगल्यात पोहोचल्यावर मला परिस्थिती भयानक असल्याचे जाणवले. मी एकटी पडले होते, अस्वस्थ वाटत होते.  मला खरोखर माहित नव्हते की मी कुठे आहे. देशाच्या त्या भागात हा माझा पहिलाच अनुभव होता. तिथे आणखी एक मुलगी होती. इतर लोक अगदी  सहजपणे ये-जा करत होते.  पण मी बाहेर जाऊ शकत नव्हते.  माझ्याकडे प्रवासासाठी कोणतेही साधन  आणि पैसेदेखील नव्हते. ”

एपस्टाईनच्या घराबद्दल बोलताना रिना म्हणली,  एपस्टिनच्या बंगल्यात येणारे बहुतेक पाहुणे मसाज थेट रूममध्ये जात असत. त्याच्या कॉफी टेबलवरील पुस्तके, त्याचे वर्तन आणि त्याचे फोन कॉल्स पाहून तिला लगेच लक्षात आले की या  एपस्टाईनमध्ये काहीतरी गडबड आहे. त्याने मला परदेशात केलेल्या काही गोष्टींबद्दल सांगितले आणि नंतर मी जर कोणाला सांगितले तर मला शारीरिक इजा करण्याची धमकी दिली. एपस्टीन हा  “रेंजिंग नार्सिसिस्ट”  होता. मानसिक दबाव टाकून लोकांना नियंत्रित करत होता. ते फक्त शारीरिक शोषण नव्हते तर मानसिक आणि भावनिक छळ देखील करत होते.  या सगळ्या गोष्टीतून सावरण्यासाठी मला दशकांचा काळ गेला.

ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

ब्रिटनचे (Britain)  माजी  राजकुमार अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांच्या अलिकडेच झालेल्या अटकेवर प्रतिक्रिया देताना, रिना म्हणाली की, ही तर फक्त सुरुवात होती.  यामुळे मला कोणताही दिलासा मिळला नाही.  अमेरिकन सरकारनेदेखील या प्रकरणावर कोणतीही कारवाई केली नाही. सरकारने जबाबदारी नाकारली. पण एपस्टीन फाईलमध्ये ज्यांची ज्यांची नावे आली आहेत, त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणीही रिना ओहने यावेळी केली.

एपस्टीनच्या जाळ्यातून सुटका झाल्यानंतर रीना सर्वांपासून वेगळी झाली आणि फॅशन पीआरमध्ये काम करू लागली. तिला नियंत्रणात राहणे आवडत नव्हते. नंतर एपस्टीनने फॅशन शोसाठी आमंत्रणे मागितली, परंतु रीनाने कधीही ती मान्य केली नाहीत.

 

रीना तिची ओळख उघड करते

२०१९ मध्ये एपस्टाईनच्या अटकेच्या वेळी, रीनाने तिच्या  गोपनियतेचा आणि सुरक्षेचा त्याग करत  तिची ओळख उघड केली.  दरम्यान, तिच्यासोबत असलेल्या एक पिडीता व्हर्जिनिया गिफ्रेने तिच्या अप्रकाशित आठवणींमध्ये रीनाबद्दल खोट्या गोष्टी लिहिल्या. त्यामुळे रीनाने व्हर्जिनिया गिफ्रेविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आणि  ती गुन्हेगार नसून पिडीत  असल्याचे सिद्ध करावे लागले.

 २० लाखांहून अधिक फायली जाहीर झालेल्या नाहीत

रीना म्हणते की,  पैसा आणि शक्ती असलेले लोक तपासातून सुटतात. त्यांच्याकडे मजबूत कायदेशीर टीम्स आहेत आणि ते कायद्यातील प्रत्येक त्रुटीचा आधार घेत पळवाटा काढतात.  इतक्या घटना उघड होत असतानाही  अमेरिकन सरकारने कोणतीही जबाबदारी आलेली नाही. काही युरोपीय देश कारवाई करत आहेत आणि अमेरिकेनेही तेच केले पाहिजे. २० लाखांहून अधिक फायली अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. त्यात काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

पाकिस्तानच्या कराचीत सिलेंडरचा भीषण स्फोट; मोठ्या स्फोटानंतर तीन मजली इमारतच कोसळली, 16 जणांचा मृत्यू

प्रत्येक नाव उघड झाले पाहिजे

रीना म्हणते की, जेफ्री विरोधातील सर्व कारवाई पूर्ण पारदर्शकता असली पाहिजे.  आजही  जगभरातील अनेक भागांत महिलांच्या तस्करीचे काम अजूनही सुरू आहे. हे सर्व प्रकरण स्पष्ट होईपर्यंत मला शांती मिळणार नाही.   प्रत्येक नाव उघड झाल्यावर आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शपथेखाली दिले जाईल तेव्हाच पिडीतांना  न्याय मिळेल. असंही रिनाने म्हटले आहे

Web Title: A narcissist shocking revelation from epsteins abuse victim rina oh jeffrey epstein case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 01:52 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.