
after Sharif Osman Hadi's demise people Attempt to burn journalists alive in bangladesh heartbreaking video viral
Daily Star and Prothom Alo office attacked Dhaka : बांगलादेशातील(Bangladesh) विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी (Sharif Osman Hadi) यांच्या हत्येनंतर संपूर्ण देश हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे. मात्र, या हिंसाचाराने आता एक अत्यंत क्रूर रूप धारण केले आहे. ढाका येथील देशातील सर्वात मोठ्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर मध्यरात्री जमावाने हल्ला केला. केवळ तोडफोड करून हे हल्लेखोर थांबले नाहीत, तर त्यांनी इमारतीला आग लावून आत असलेल्या पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल(Viral)) होत असून संपूर्ण जगातून यावर टीका होत आहे.
शुक्रवारी पहाटे ‘डेली स्टार’ आणि ‘प्रथम आलो’ या वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर शेकडो लोकांनी हल्ला चढवला. हल्लेखोरांनी आधी तळमजल्याची तोडफोड केली आणि नंतर इमारतीला आग लावली. धुराचे लोट इतके प्रचंड होते की आत असलेल्या पत्रकारांना श्वास घेणे कठीण झाले होते. ‘डेली स्टार’च्या पत्रकार झायमा इस्लाम यांनी फेसबुकवर “मला श्वास घेता येत नाहीये, तुम्ही आम्हाला मारत आहात” अशी हृदयद्रावक पोस्ट टाकून मदतीसाठी टाहो फोडला होता. धक्कादायक म्हणजे, अग्निशमन दलाच्या गाड्यांना जमावाने अडवून धरले होते, जेणेकरून मदत पोहोचू नये.
#BREAKING: Angry mob physically attacks Senior Journalist Nurul Kabir in Dhaka. He is Editor of New Age newspaper. He was dragged out of his car and assaulted by mobsters. This is the current state of Bangladesh. Major attacks on Media houses. pic.twitter.com/uLfBc0vYRK — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) December 18, 2025
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sharif Osman Hadi: एक गोळी डोक्यात लागली आणि ‘तो’ रक्ताच्या थारोळ्यात; उस्मान हादीच्या हत्येमुळे बांगलादेश हिंसाचाराने पेटला
या हिंसाचाराचा सर्वात भयानक चेहरा तेव्हा समोर आला, जेव्हा ज्येष्ठ पत्रकार आणि ‘न्यू एज’चे संपादक नुरुल कबीर तिथे पोहोचले. जमावाने त्यांना घेरले आणि त्यांना ‘अवामी लीगचे दलाल’ म्हणत शिवीगाळ केली. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, काही लोकांनी कबीर यांचे केस पकडून त्यांना धक्के दिले आणि मारहाण केली. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांची अशी विटंबना होताना पाहून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. अखेर बांगलादेशी सैन्याने घटनास्थळी धाव घेत पहाटे ४ वाजता अडकलेल्या २५ पत्रकारांची सुटका केली.
Devastation at Dainik Prothom Alo Newspaper in Dhaka, Bangladesh. Office being ransacked and gutted by radical mob. pic.twitter.com/ZQjEfqws7X — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) December 18, 2025
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Dhaka Shooting: हल्लेखोरांना भारताच्या ताब्यात द्या! युनूस सरकारने उच्चायुक्तांना बोलावले; पण भारताने ‘हा’ गंभीर आरोप फेटाळला
शरीफ उस्मान हादी यांच्या निधनासाठी निदर्शक काही माध्यमांना जबाबदार धरत आहेत. या वृत्तपत्रांनी भारताची बाजू घेतल्याचा किंवा अवामी लीगच्या विचारसरणीला पाठिंबा दिल्याचा आरोप जमावाकडून केला जात आहे. हादी हे इन्कलाब मंचचे प्रवक्ते होते आणि त्यांच्या हत्येनंतर निर्माण झालेली ही अराजकता बांगलादेशला गृहयुद्धाच्या दिशेने नेत असल्याचे चित्र दिसत आहे. अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी शांततेचे आवाहन केले असले तरी, जमिनीवरची परिस्थिती मात्र नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसत आहे.
Ans: ढाका येथील 'प्रथम आलो' (Prothom Alo) आणि 'डेली स्टार' (The Daily Star) या दोन मोठ्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर हल्ले झाले आहेत.
Ans: नुरुल कबीर हे पत्रकारांना वाचवण्यासाठी गेले होते, मात्र जमावाने त्यांना 'अवामी लीगचा एजंट' म्हणत केसांनी ओढून मारहाण केली.
Ans: इमारतीला आग लागल्यानंतर तिथे अडकलेल्या २५ पत्रकारांची सुटका बांगलादेशी सैन्याने (Army) पहाटे ४ वाजता केली.