
Sheikh hasina on bangladesh elections
शेख हसीना यांनी मोहम्मद युनूस (Muhammd Yunus) यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, युनूस सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे. त्यांनी लोकांच्या मतदानाचा अधिकार हिरावून घेतला आहे. त्यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा युनूस सरकारने अवामी लीग पक्षावर आणि हसीना यांच्यांवर निवडणुकीत सहभाग घेण्यापासून बंदी घातली आहे. यावर उत्तर देताना हसीना यांनी गंभीर आरोप केले आहेत.
हसीना यांनी असोसिएटेड प्रेसला एक ईमेल पाठवला आहे. या इमेलमध्ये इशारा देण्यात आला आहे की, बांगलादेशच्या (Bangladesh) सार्वत्रिक निवडणुका निष्पक्ष होण्याची शक्यता कनी झाली आहे. यामुळे बांगलादेश अस्थिरतेला बळी पडत आहे. लोकांचे हक्कांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप हसीना यांनी केली आहे. त्यांनी हेही म्हटले आहे की, सरकारने त्यांच्या पक्षाला निवडणुकीतून वगळले आहे, ज्यामुळे लोकशाही समर्थकांच्या अधिकारांचे उल्लंघन होत आहे.
येत्या १२ फेब्रुवारी २०२६ रोजी बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहे. या निवडणुकीत १२७ दशलक्षहून अधिक मतदार मतदान करण्यास पात्र आहेत. २०२४ मध्ये हसीना सरकारच्या पायउतारानंतर हि पहिलीच निवडणूक होत आहे. अंतरिम सरकारने यावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे आणि निवडणुका निष्पक्ष घेण्याचे आश्वासन दिले आहे. निवडणुकीची पारदर्शकता निश्चित करण्यासाठी युरोपियन युनियन आणि राष्ट्रकुलसह ५०० परदेशी निरीक्षकांना आमंत्रित करण्यात आले आहे.
गेल्या काही काळात बांगलादेशात प्रचंड अस्थिरता पसरली आहे. डिसेंबर २०२५ पासून बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत पाच चे सहा जणांची हत्या करण्यात आली आहे. कट्टरपंथी गटांकडून ईशनिंदाच्या नावाखाली हिंदू अल्पसंख्यांना अट केली जात आहे, त्यांना मारहाण करुन जिंवत जाळले जात आहे. यामुळे बांगलादेशातील अल्पसंख्याकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या सर्व परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तसेच भारताने देखील हिंदूवरील होणाऱ्या अत्याचाराबाबत चिंता व्यक्त केली आहे.