After Trump these two Republican leaders are most popular
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राजकारणामध्ये सध्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योजक एलॉन मस्क यांच्यामधील वादाची चर्चा आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यामधील मैत्रिपूर्ण संबंध हे मागील वर्षभरापासून दिसून येत होते. मात्र एका विधेयकामुळे दोघांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योजक एलॉन मस्क यांच्या रुसवा-फुगवीची जोरदार चर्चा आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर सध्या रिपब्लिकन पार्टीच्या दोन नेत्यांची चर्चा रंगली आहे. डोनाल्ड ट्रम्प नंतर हे दोघे लोकप्रियतेच्या कळसावर पोहचले आहेत.
अमेरिकेतील राजकीय नेत्याची लोकप्रियता ही केवळ त्याच्या राजकारणावर अवलंबून राहिलेली नाही. तर त्याची आक्रमक भूमिका, निर्णय आणि प्रभावी उद्योजकांशी मैत्री यावर देखील नेत्याचे भवितव्य ठरत आहे. यामुळेच डोनाल्ड ट्रम्प हे निवडणून आल्यानंतर आणि त्यांच्या सरकारमध्ये एलॉन मस्कच्या भूमिकेला अतिशय महत्त्व प्राप्त झाले होते. तसेच एलॉन मस्क रिपब्लिकन पार्टीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय व्यक्तीमत्त्व बनले होते. पण आता रिपब्लिकन पार्टीमधील अशी दोन नेत्यांची नावे समोर आली आहेत ज्यांच्या राजकारणावर सध्या अमेरिकेच्या नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
एका सर्वेक्षणानुसार, रिपब्लिकन पक्षामध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना ५४% लोक पसंत करतात, तर उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांना ५०% लोक पसंत करतात आणि मस्क यांना ४३% लोकांची पसंती आहे. यावरुन मस्क यांचे स्थान राजकीय पातळीवर मजबूत होत असल्याचे स्पष्ट होते.
धक्कादायक बाब म्हणेज अलीकडेच मस्क यांनी ट्रम्प यांच्या बिग ब्युटीफुल विधेयकावर उघडपणे टीका केली होती. या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांना हटवण्याचीही मागणी त्यांनी केली होती. यानंतर मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर “ट्रम्प यांच्याकडे केवळ ३.५ वर्षे असल्याचे आणि त्यांच्या ४० वर्षे असल्याचे म्हटले होते. या विधानामुले ट्रम्प समर्थकांमध्ये खळबळ उडाली होती.
तसेच DOGE वरुन वाद असूनही मस्क यांना रिपब्लिकन पक्षातील काही मतदारांचा पाठिंबा मिळाला आहे. एका सर्व्हेनुसार ६३% रिपब्लिकन आणि ७०% ट्रम्प समर्थकांनी मस्क यांच्या DOGE अंतर्गत सरकारी खर्चात झालेल्या कपातीचे समर्थन केले आहे. परंतु केवळ ८% लोक मस्क यांना सत्ताधिकार देण्यास तयार आहेत.
क्विनिपियाक विद्यापीठाच्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की ७१% रिपब्लिकन लोकांचा असा विश्वास आहे की ट्रम्प प्रशासनात मस्ककडे योग्य प्रमाणात शक्ती आहे. पण फक्त ८% लोकांना त्यांच्याकडे अधिक शक्ती हवी आहे. याचा अर्थ पक्षाला मस्क आवडतात, पण त्यांना बिनशर्त पाठिंबा द्यायचा नाही.
मस्कची लोकप्रियता सध्या ट्रम्प (८७%) आणि व्हान्स (८०%) नंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण ट्रम्प हे त्यांच्या विरोधकांना जाहीरपणे लक्ष्य करण्यासाठी ओळखले जातात. जर त्याने थेट मस्कला लक्ष्य केले तर मस्कची लोकप्रियता कमी होण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात हा संघर्ष आणखी वाढू शकतो. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष हे महाशक्तीशाली डोनाल्ड ट्रम्प आणि युक्तीशाली एलॉन मस्क यांच्या वाद-विवादावर लागले आहे.