
elon musk on ai technology
एलॉम मस्क यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, AI आणि Robotics च्या दिशेने जग वेगाने वाटचाल करत आहे. पण यामुळे लोकांना नोकरी करण्याची गरज भासणार नाही. मस्क यांनी Zerodha चे सह-संस्थापक निखिल कामत यांच्यासोबत People by WTF पॉडकास्टमध्ये बोलताना हे भाकीत केल आहे. त्यांच्या मते, एआय आणि रोबोटिक्सच्या विकासामुळे मानवाची जवळपास सर्व कामे ते स्वत:च करतील.
मानव नोकरी केवळ छंद म्हणून करेल. मस्क यांचा विश्वास आहे की, येत्या १० ते २० वर्षात लोक निवांतपणे आपले जीवन जगतील. नोकरीसाठी लोकांना शहरांकडे जाण्याची देखील गरज भासणार नाही. लोक केवळ आवड म्हणून नोकऱ्या करतील.
मस्क यांनी असाही दावा केला की, भविष्यात सरकार लोकांना सर्वाच जास्त उत्पन्न (Universal High Income) देऊ शकतील. प्रत्येक नागरिकाला सरकारकडून एक ठराविक उत्पन्न दिले जाईल. यामुळे प्रत्येकाच्या गरजा पूर्ण होतील आणि जग सिग्युलॅरिटीकडे जाईल. येथे मानवी कल्पनेपेक्षा एआयचा प्रभाव अधिक असेल. लोकांना दुकानातून वस्तू खरेदी करण्याची गरज भासणार नाही. उदाहणार्थ, लोक एआय आणि रोबोटिकक्सच्या मदतीने घरीच भाज्या पिकवू लागतील.
मस्क यांनी असाही दावा केला की, मानवाच्या गरजा एआय आणि रोबोटिक्समुळे पूर्ण होतील, ज्यामुळे भविष्यात पैशाचे महत्व देखील कमी होईल. पैसा केवळ एक वस्तू बनून राहिल. तसेच भविष्यात उर्जा उत्पादनावर आधारित चलन तयार होईल.
एलॉन मस्क यांच्या म्हणण्यानुसार, एआय आणि रोबोट्स मानवाच्या सर्व गरजा पूर्ण करतील, पण त्यांच्या विकासावरही ते कार्य करतील. यामुळे एआय आणि रोबोटिक्सचे एक जग तयार होत राहिल. मानवाच्या गरजा या मर्यादित आहे. परंतु एआयचा विकास निरंतर राहिल. एक वेळ अशी येईल की एआय मानवासारखा विचार करु लागले.
Global billionaires List: जगातील अब्जाधीश क्रमवारीत मोठी उलथापालथ..; ‘या’ व्यक्ती आहेत टॉप 5
Ans: एलॉन मस्कच्या मते, एआय आणि रोबोटिक्सच्या विकासामुळे भविष्यात लोकांना नोकरी करण्याची गरज भासणार नाही.
Ans: भविष्यात सरकार लोकांना सर्वाच जास्त उत्पन्न प्रदान करेल असे एलॉन मस्कने म्हटले आहे.
Ans: भविष्यात पैशाचे महत्व कमी होऊन उर्जा उत्पादनावर आधारित चलन येत्या २० वर्षात0 तयार होईल, असे मस्क यांनी म्हटले आहे.