Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेच्या ‘या’ धमकीमुळे घाबरले सौदी अरेबिया; BRICS मध्ये सामील होण्याचा निर्णय स्थगित

सौदी अरबने ब्रिक्समध्ये सामील होण्याचा निर्णय स्थगित केला आहे. यामागचे कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला चेतावणी दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 29, 2024 | 01:13 PM
अमेरिकेच्या 'या' धमकीमुळे घाबरले सौदी अरेबिया; BRICS मध्ये सामील होण्याचा निर्णय स्थगित

अमेरिकेच्या 'या' धमकीमुळे घाबरले सौदी अरेबिया; BRICS मध्ये सामील होण्याचा निर्णय स्थगित

Follow Us
Close
Follow Us:

वॉश्गिंटन: इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरबने ब्रिक्समध्ये सामील होण्याचा निर्णय स्थगित केला आहे. ब्रिक्स गटात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यां देशांचा समोवेश आहे. ब्रिक्सने 2023 मध्ये विस्ताराच्या अंतर्गत सौदी अरब, मिस्र, इराण, यूएई, आणि इथिओपियाला सदस्यत्वासाठी निमंत्रण दिले होते. इतर देशांनी हे निमंत्रण स्वीकारलेले आहे. मात्र, सौदी अरेबियाने अद्याप यावर अंतिम निर्णय घेतलेला नाही. यामागचे कारण म्हणजे अमेरिकेचा असलेला दबाव असल्याचे म्हटले जात आहे.

अमेरिकेचा दबाव आणि ट्रम्पचे विधान

सौदी अरेबियाच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला चेतावणी दिली आहे की, जर ब्रिक्स देशांनी अमेरिकन डॉलरला पर्याय म्हणून स्वतःची चलनप्रणाली विकसित केली, तर अमेरिका या देशांवर 100% टॅरिफ लागू करेल. अमेरिकन डॉलरचा जागतिक वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी अमेरिका ब्रिक्सच्या विस्ताराला नेहमीच विरोध करत आले आहे. त्यामुळे सौदी अरेबियावर अमेरिकेचा दबाव असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- TTP चे जोरदार प्रत्युत्तर; पाकिस्तानी हवाई हल्ल्यांनंतर मोठा घात, एका मेजरसह 16 जवान ठार केल्याचा दावा

सौदी अरेबिया आणि ब्रिक्सचे संबंध

मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाने यापूर्वी ब्रिक्ससोबत अनौपचारिक संबंध प्रस्थापित केले होते. मात्र, पूर्ण सदस्यत्वासाठी अद्याप सौदी अरेबिया राजी झालेला नाही. ऑक्टोबर 2023 मध्ये रशियातील कझान येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान सौदी अरेबियाच्या सहभागाबाबत संभ्रम होता. रशियाच्या क्रेमलिनच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले होते की, सौदी अरेबियाचा निर्णय नंतर जाहीर केला जाईल. मात्र, अद्याप अमेरिकेच्या दबावामुळे सौदी अरेबियाने अद्याप उत्तर दिलेले नाही. सध्या ब्रिक्सचे अध्यक्षपद रशियाकडे आहे.

भविष्यातील दिशा
सौदी अरेबियाचा ब्रिक्समध्ये प्रवेश पुढील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर अवलंबून आहे.

  • आंतरराष्ट्रीय राजकारण: सौदी अरेबियाचे अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांशी असलेले नाजूक संबंध.
  • आर्थिक धोरणे ब्रिक्सची वित्तीय धोरणे सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम करतील, याचा विचार.
  • सुरक्षा व ऊर्जा संबंध: रशिया आणि चीनसारख्या ब्रिक्स देशांशी असलेले संरक्षण व ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य.

सध्या सौदी अरेबियाचा निर्णय जागतिक राजकारणात नवे ताणतणाव निर्माण करत आहे. अमेरिकेच्या धोरणांपासून स्वतःला वेगळे ठेवत सऊदी अरब ब्रिक्समध्ये सामील होईल की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कझाकिस्तान विमान अपघातावर पुतिन यांनी मागितली माफी; म्हणाले, ‘हा अपघात रशियाने….’

Web Title: America saudi arabia freezes brics membership says report amid trums tarrif threat nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2024 | 01:13 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.