TTP चे जोरदार प्रत्युत्तर; पाकिस्तानी हवाई हल्ल्यांनंतर मोठा घात, एका मेजरसह 16 जवान ठार केल्याचा दावा(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. याचवेळी तहरी-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) च्या आतंकवादी कारवाया वाढल्या आहेत. यामुळे पाकिस्तानचे सैन्य आणि TTP यांच्यात सध्या संघर्ष उग्र स्वरूप घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी हवाई दलाने अफगाणिस्तानच्या सीमेजवळ हवाई हल्ला केला होता. त्यानंतर तालिबान ने सीमेवर मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात केले आहेत.
पाकिस्तानने घेतली हल्ल्यांची जबाबदारी
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री ( 18 डिसेंबर) पाकिस्तान आणि TTP याच्यांत जोरदार चकामक झाली. या गोळीबारात पाकिस्तानच्या एका मेजरसह 16 सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा TTP ने केला आहे. तसेच पाकिस्तान सरकारने केलेल्या या हवाई हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे, परंतु सरकारचा दावा आहे की, हे हल्ले अफगाणिस्तानच्या सीमेत न करता पाकिस्तानच्या आत करण्यात आले आहेत. पाकिस्तान सरकारच्या प्रवक्त्या मुमताज जहरा बलोच यांनी म्हटले की, हे हल्ले पाकिस्तानी नागरिकांच्या सुरक्षेसाठी करण्यात आले होते आणि त्यात सुमारे 50 लोकांचा मृत्यू झाला.
काय आहे TTP चा उद्देश?
मिळालेल्यामाहितीनुसार, TTP चा उद्देश पाकिस्तान सरकारला उलथवून अफगाणिस्तानमध्ये लागू करण्यात आलेल्या तालिबानी शरिया कायद्यासारखा कायदा पाकिस्तानात लागू करणे आहे. TTP ची स्थापना 2007 मध्ये झाली होती आणि ही संघटना अनेक कट्टरपंथी गटांची एकत्रित करणारी आहे. या संघटनेकडे सुमारे 30,000 हून अधिक सुसज्ज आतंकवादी असून त्यांनी 2012 मध्ये मलाला युसुफझईवर हल्ला केला होता. याशिवाय, चर्च, शाळा आणि इतर सार्वजनिक ठिकाणीही त्यांनी मोठे दहशतवादी हल्ले केले आहेत.
TTP आणि तालिबान
TTP आणि तालिबान यांच्यात महत्त्वाचा फरक आहे. तालिबान हा एक सुन्नी मुस्लिम गट आहे, ज्याचा मुख्य उद्देश्य अफगाणिस्तानमध्ये शरिया कायदा लागू करणे आहे. त्याचवेळी TTP पाकिस्तान सरकार आणि सैन्याच्या विरोधात लढा देत आहे. TTP पाकिस्तानला भ्रष्ट आणि इस्लामविरोधी मानते. पाकिस्तानी सैन्याने TTP विरुद्ध विविध अभियान राबवले आहेत, परंतु त्यामध्ये कोणताही ठोस परिणाम दिसून आलेला नाही.
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर आरोप
पाकिस्तानी सैन्याने अफगाण तालिबानवर प्रतिबंधित तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ला आश्रय देण्याचा आरोप केला. त्यांनी अफगाण सरकारला TTP दहशतवाद्यांना थारा न देण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानने म्हटले आहे की, TTP अफगाण भूमीचा वापर करून दहशतवादी पाकिस्तानात हल्ले घडवून आणत आहेत. या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्तानने सीमा ओलांडणाऱ्यांसाठी ‘एक-दस्तावेज’ प्रणाली लागू केली आहे. यामुळे अनधिकृत हालचालींमध्ये घट झाली आहे.