डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्या मैत्रीला बहर; SpaceX च्या स्टारशिप चाचणी दरम्यान नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांचे आगमन
वॉश्गिंटन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला. यावेळी प्रचारादरम्यान इलॉन मस्क यांनी त्यांना आपला पाठिंबा दर्शवला होता. त्यावेळेपासून त्यांच्या मैत्रीची चर्चा सर्वत्र सुरू झाली. ट्रम्प यांनी इलॉन मस्कला ट्रम्प प्रशासनात देखील सामील केले. आता डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यातील वाढती मैत्री अमेरिकेच्या राजकारण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात चर्चेचा विषय बनली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नुकतेच ट्रम्प SpaceXच्या स्टारशिप लॉंचिग दरम्यान इलॉन मस्क यांच्यासोबत दिसले.
मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच SpaceX ने आपल्या स्टारशिप रॉकेटची चाचणी घेतली. यामध्ये हिंदी महासागरात यशस्वी लँडिंग झाले. या महत्त्वाच्या क्षणाला अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते. यामुळे त्यांच्या आणि मस्क यांच्या संबंधांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यांचे मस्कशी असलेले नाते किती घट्ट होत चालले आहे हे यावरून दिसून येते. सोशल मीडियावर संबंधित फोटो देखील व्हायरल होत आहेत.
सर्वात शक्तिशाली प्रक्षेपण वाहन
मीडिया रिपोर्टनुसार, SpaceX च्या स्टारशिपचे हे आत्तापर्यंतचे सर्वात शक्तिशाली लॉन्च व्हेईकल आहे. हे व्हेईकलद्वारे टेक्सासमधील स्टारबेस येथे चाचणी घेण्यात आली. या व्हेईकलद्वारे 400 फूट लांब असलेल्या स्टारशिप रॉकेटने उड्डाण केले. बूस्टर पुनर्प्राप्त करण्यात आलेल्या अडचणीं आल्या. त्यांनंतरही रॉकेटने आपल्या दुसरी टप्प्यात हिंदी महासागरात यशस्वीरित्या लॅंडिंग केले. मस्क यांनी याबाबत सांगितले की, येणाऱ्या काळात आणखी चाचण्या घेतल्या जातील आणि भविष्यात हे रॉकेट प्रक्षेपण टॉवरवर उतरवण्याचा प्रयत्न केला जाईल.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
ट्रम्प यांचे स्वागत
तसेच ट्रम्प यांच्या आगमनानंतर मस्क यांनी दक्षिण टेक्सासमधील SpaceX सुविधेत त्यांचे स्वागत केले. SpaceX च्या टेक्सासमधील सुविधेत ट्रम्प यांच्या आगमनाने मस्क-ट्रम्प संबंधांवर प्रकाश टाकला. ट्रम्प यांनी मस्कच्या कंपनीच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. यासोबतच त्यांनी मस्क यांना गव्हर्नमेंट डिपार्टमेंट ऑफ सुपरमार्केट (DOG) प्रमुखपदी नेमले आहे.
हे SpaceX साठी सरकारी प्रकल्पांमध्ये अधिक संधी निर्माण करणार आहे. तसेच ट्रम्प प्रशासनात इलॉन मस्क यांना गव्हर्नमेंट डिपार्टमेंट ऑफ सुपरमार्केट (DOG) पदाभार सोपवला आहे. मस्क यांच्या नेतृत्त्वाखाली SpaceX कडे अब्जावधी डॉलर्सचे सरकारी करार आहेत.
मागील मतभेद आणि बदललेले संबंध
गेल्या दोन वर्षांत मस्क आणि ट्रम्प यांचे संबंध बदलले आहेत. मस्क यांनी कधी काळी ट्रम्प यांच्यावर टीका केली होती. त्यांनी ट्रम्प यांना निवृत्तीचा सल्लाही दिला होता. मात्र आता मस्क ट्रम्प यांच्या जवळच्या सल्लागारांपैकी एक बनले आहेत. आज मस्क ट्रम्प यांचे नेतृत्व कौतुकाने स्वीकारत आहेत. दुसरीकडे, ट्रम्प यांचे मस्क यांच्या बुद्धिमत्तेचे आणि तांत्रिक योगदानाचे कौतुक सुरूच आहे. हे नाते अमेरिका आणि तंत्रज्ञानाच्या भविष्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते.