Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran US War: अमेरिकन वैमानिक आमच्या ताब्यात; बचाव हेलिकॉप्टरही पाडले… इराणचा मोठा दावा!

इराणच्या हवाई हद्दीत घुसखोरी करणाऱ्या अमेरिकेच्या एका अत्याधुनिक 'F-15 ईगल' (F-15 Eagle) फायटर जेटला इराणच्या लष्कराने यशस्वीरित्या पाडले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 03, 2026 | 07:49 PM
अमेरिकन वैमानिक आमच्या ताब्यात; बचाव हेलिकॉप्टरही पाडले... इराणचा मोठा दावा! (Photo Credit- X)

अमेरिकन वैमानिक आमच्या ताब्यात; बचाव हेलिकॉप्टरही पाडले... इराणचा मोठा दावा! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • अमेरिकन वैमानिक आमच्या ताब्यात
  • बचाव हेलिकॉप्टरही पाडले…
  • इराणचा मोठा दावा!
World War 3: पश्चिम आशियातील तणाव आता टोकाला पोहोचला असून इराणने अमेरिकेला मोठा लष्करी धक्का दिल्याचे वृत्त समोर येत आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या हवाई हद्दीत घुसखोरी करणाऱ्या अमेरिकेच्या एका अत्याधुनिक ‘F-15 ईगल’ (F-15 Eagle) फायटर जेटला इराणच्या लष्कराने यशस्वीरित्या पाडले आहे. इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) आपल्या प्रगत एअर डिफेन्स सिस्टमच्या सहाय्याने ही कारवाई केली.

बचाव मोहिमेवरही इराणचा प्रहार

इराणने केवळ फायटर जेटच पाडले नाही, तर कोसळलेल्या विमानाच्या वैमानिकाला वाचवण्यासाठी आलेल्या अमेरिकन ताफ्यावरही हल्ला चढवला. प्राप्त माहितीनुसार, अमेरिकेने आपल्या वैमानिकाच्या सुटकेसाठी एक C-130 मालवाहू विमान आणि चार ‘ब्लॅक हॉक’ (Black Hawk) हेलिकॉप्टर्स इराणच्या हद्दीत पाठवली होती. मात्र, इराणने याला घुसखोरी मानून कारवाई केली आणि हे हेलिकॉप्टर्सदेखील पाडल्याचा दावा केला आहे.

अमेरिकन वैमानिकाचे काय झाले?

‘तस्नीम’ न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार, F-15 जेटला लक्ष्य केल्यानंतर वैमानिकाने ‘इजेक्ट’ केले आणि तो इराणच्या भूमीवर उतरला. या वैमानिकाच्या सद्यस्थितीबाबत दोन वेगळे दावे केले जात आहेत. काही स्थानिक रिपोर्टनुसार, इराणच्या सैन्याने वैमानिकाला जिवंत पकडून बंदी बनवले आहे. तर दुसरीकडे, ‘प्रेस टीव्ही’ आणि ‘IRIB’ सारख्या सरकारी माध्यमांनी असा दावा केला आहे की, विमानाचा स्फोट इतका भीषण होता की वैमानिक वाचण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

War Update: ‘स्वतःला विजयी घोषित करा अन् युद्ध थांबवा’, ट्रम्पला त्यांच्याच भाषेत उत्तर द्या, माजी मंत्र्याचा इराणला मोलाचा सल्ला

F-35 की F-15? तांत्रिक संभ्रम कायम

इराणच्या ‘खतम अल-अंबिया’ लष्करी मुख्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे अमेरिकेचे दुसरे ‘F-35’ विमान आहे जे मध्य इराणच्या आकाशात पाडण्यात आले. मात्र, काही आंतरराष्ट्रीय संरक्षण तज्ञांच्या मते हे विमान ‘F-15E’ असू शकते. अमेरिकेने अद्याप अधिकृतपणे आपले विमान पाडल्याचे मान्य केलेले नाही, मात्र इराणने आपल्या नव्या एअर डिफेन्स सिस्टमच्या शक्तीचे प्रदर्शन करत हे यश मिळाल्याचे म्हटले आहे.

१९ मार्चच्या घटनेची पुनरावृत्ती?

यापूर्वी १९ मार्च रोजीदेखील इराणने एका अमेरिकन F-35 जेटला लक्ष्य केल्याचा दावा केला होता. ‘CNN’ च्या रिपोर्टनुसार, त्या वेळी विमानाचे नुकसान झाले होते आणि त्याने आपत्कालीन लँडिंग केले होते, ज्यात वैमानिक सुरक्षित होता. मात्र, ताज्या घटनेत इराणने अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे. IRGC च्या दाव्यानुसार, आज पहाटे 2:50 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. इराणने आतापर्यंत अमेरिका आणि इस्रायलचे १२५ पेक्षा जास्त ड्रोन पाडल्याचेही जाहीर केले आहे. सध्या या खळबळजनक दाव्यांची अधिकृत किंवा स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही, मात्र यामुळे जागतिक राजकारणात युद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत.

IranUSWar: अमेरिकेचे ‘अजेय’ विमान इराणने पाडले! 82 दशलक्ष डॉलर्सचे F-35 मातीत; स्वदेशी क्षेपणास्त्राने ‘अदृश्य’ शत्रूचा गेम, VIDEO

Web Title: American pilot in our custody rescue helicopter also shot down iran makes major claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 07:49 PM

Topics:  

  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

War Alert : ताजिक-अफगाण सीमेवर रशियाकडून अति-आधुनिक शस्त्रास्त्रांची तैनाती; आज मॉस्कोमध्ये महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बैठक
1

War Alert : ताजिक-अफगाण सीमेवर रशियाकडून अति-आधुनिक शस्त्रास्त्रांची तैनाती; आज मॉस्कोमध्ये महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बैठक

Strait Of Hormuz: होर्मुझमध्ये इराणी लष्कराचा टँकर्सवर हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अशा’ दाव्यानंतर मध्यपूर्वेत पुन्हा भडका
2

Strait Of Hormuz: होर्मुझमध्ये इराणी लष्कराचा टँकर्सवर हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अशा’ दाव्यानंतर मध्यपूर्वेत पुन्हा भडका

US-Iran War : इराण शरण येईल! डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर गंभीर दावा; तर ‘AI’ चे नाव बदलून केले ‘सुपर इंटेलिजन्स
3

US-Iran War : इराण शरण येईल! डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर गंभीर दावा; तर ‘AI’ चे नाव बदलून केले ‘सुपर इंटेलिजन्स

Iran Trolls UN: इराण गॉट नो चिल! ‘या’ भन्नाट ‘शोले’मधील ‘ठाकूर’ च्या मीमने संयुक्त राष्ट्रांना सोशल मीडियावर केले जोरदार ट्रोल
4

Iran Trolls UN: इराण गॉट नो चिल! ‘या’ भन्नाट ‘शोले’मधील ‘ठाकूर’ च्या मीमने संयुक्त राष्ट्रांना सोशल मीडियावर केले जोरदार ट्रोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.