Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Nuclear Threat: ‘इराणला कायमचे नष्ट करण्याची वेळ आली आहे…’ नेतन्याहूंचा इशारा; इस्रायलमध्ये ‘राष्ट्रीय एकता सरकार’ची मागणी

Iran Nuclear Threat : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणच्या अणुकार्यक्रमाला धोका म्हटले असून तो कायमचा बंद करण्याची मागणी केली आहे. त्यांनी राष्ट्रीय ऐक्य सरकार स्थापन करण्याचे आवाहनही केले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणबाबत आणखी एक कडक विधान केले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 15, 2026 | 12:35 PM
Benjamin Netanyahu Iran Nuclear Threat Israel National Unity Government 2026

Benjamin Netanyahu Iran Nuclear Threat Israel National Unity Government 2026

Follow Us
Follow Us:
  • इराणच्या अणुकार्यक्रमावर कडक इशारा
  • राष्ट्रीय ऐक्य सरकार स्थापन करण्याचे आवाहन
  • विरोधकांचा आक्षेप आणि राजकीय पेच

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती आणि इराणसोबत (Iran Nuclear Threat)वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे काळजीवाहू पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी शनिवारी एक अत्यंत आक्रमक आणि मोठे विधान केले आहे. इस्रायलच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या इराणचा प्रश्न आता कायमस्वरूपी संपवण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट मत नेतान्याहू यांनी व्यक्त केले. देशातील नवीन सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर प्रसारित केलेल्या आपल्या भाषणात त्यांनी हा गंभीर इशारा दिला आहे. तेहरान पुन्हा एकदा आपला अणुकार्यक्रम सक्रिय करत असून, या संकटाचा सामना करण्यासाठी इस्रायलमध्ये सर्व प्रमुख पक्षांचे एक मजबूत ‘राष्ट्रीय एकता सरकार’ (National Unity Government) स्थापन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणच्या राजवटीवर थेट निशाणा साधला. इराणचे सरकार हे इस्रायलचा संपूर्ण विनाश करू पाहणारे शासन आहे, असा आरोप त्यांनी केला. या राजवटीने यापूर्वीच आपल्या हजारो निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे, त्यामुळे त्यांच्या हाती जर अणुबॉम्ब लागला, तर ते इस्रायलविरुद्ध त्याचा वापर करण्यास अजिबात मागेपुढे पाहणार नाहीत, अशी भीती नेतान्याहू यांनी व्यक्त केली. इराणने पुन्हा एकदा युरेनियम संवर्धनाला वेग दिला असून अणुबॉम्ब निर्मितीचे काम सुरू केले आहे, त्यामुळे इस्रायलवरील धोका अधिकच गडद झाला आहे. हा अस्तित्वाचा धोका एकदाचा आणि कायमचा मुळापासून उपटून टाकणे ही काळाची गरज असल्याचे नेतान्याहू यांनी ठामपणे सांगितले.

गडी आयझेनकोट यांच्या भेटीनंतर ‘राष्ट्रीय एकता सरकार’ची जोरदार चर्चा

गेल्या महिन्यात २७ ऑक्टोबर रोजी झालेल्या इस्रायलच्या २६ व्या संसदेच्या (Knesset) सार्वत्रिक निवडणुकीनंतर देशात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. १२० सदस्यांच्या इस्रायली संसदेत बहुमताचा सरकार स्थापन करण्यासाठी किमान ६१ जागांची आवश्यकता असते. या निवडणुकीत बेंजामिन नेतान्याहू यांचा ‘लिकुड’ (Likud) पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या आघाडीला केवळ ५३ जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे, विरोधी पक्षनेते गडी आयझेनकोट (Gadi Eisenkot) यांच्या ‘याशर’ (Yashar) पक्षाने आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या आघाडीने ४८ जागा जिंकल्या आहेत, तर अरब पक्षांच्या आघाडीने ऐतिहासिक कामगिरी करत १९ जागांवर विजय मिळवला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Flights : 530 उड्डाणे रद्द तर 430 विमानांना विलंब; FAA प्रमुखांनी मागितली प्रवाशांची माफी, जाणून घ्या कधी होणार सेवा पूर्व

निवडणुकीनंतर राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी ६७ खासदारांच्या शिफारशीवरून गडी आयझेनकोट यांना नवीन सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी बेंजामिन नेतान्याहू आणि गडी आयझेनकोट यांच्यात एक महत्त्वाची सुरक्षाविषयक बैठक पार पडली. या भेटीचा संदर्भ देत नेतान्याहू यांनी शनिवारी आवाहन केले की, आयझेनकोट यांनी कोणत्याही पूर्वअटींशिवाय राष्ट्रीय एकता सरकार स्थापन करण्यासाठी वाटाघाटी सुरू कराव्यात. केवळ एका व्यापक आणि मजबूत आघाडीचे सरकारच इराणसारख्या बलाढ्य शत्रूचा धोका संपवून येत्या अनेक वर्षांसाठी इस्रायलची सुरक्षा सुनिश्चित करू शकते, असा दावा नेतान्याहू यांनी केला.

अरब पक्षांच्या पाठिंब्याला विरोध आणि विरोधी गटाचा पलटवार

नेतान्याहू यांनी आपल्या भाषणात विरोधी पक्षनेते गडी आयझेनकोट यांच्या संभाव्य सरकार स्थापनेच्या समीकरणावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. आयझेनकोट यांना अरब पक्षांच्या पाठिंब्याने सरकार का स्थापन करायचे आहे, असा थेट सवाल नेतान्याहू यांनी विचारला. अरब पक्षांच्या मदतीने बनलेले कोणतेही सरकार हे अत्यंत कमकुवत आणि देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरेल, असे ते म्हणाले. नेतान्याहू यांनी अरब पक्षांवर निवडणुकांमध्ये गैरप्रकार केल्याचा आणि दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचा गंभीर आरोप केला. लहान किंवा अरब पक्षांच्या कुबड्यांवर उभे असलेले सरकार इराणच्या अण्वस्त्र संकटाचा सामना करू शकणार नाही, त्यामुळे आयझेनकोट यांनी अरब पक्षांना दूर ठेवून आमच्यासोबत बहुमताचे सरकार स्थापन करावे, अशी इच्छा नेतान्याहू यांनी व्यक्त केली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Elon Musk : अवकाश इतिहासात नवा अध्याय! स्पेसएक्सच्या ‘चॉपस्टिक्स’ भुजांनी हवेतच झेलले 400 फुटी महाकाय रॉकेट, VIDEO VIRAL

दुसरीकडे, गडी आयझेनकोट आणि त्यांच्या विरोधी गटाने नेतान्याहू यांचा हा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. इस्रायली माध्यमांच्या वृत्तानुसार, आयझेनकोट यांच्या ‘याशर’ पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, नेतान्याहू राष्ट्रीय सुरक्षेचा आणि इराणचा बाऊ करून केवळ स्वतःची खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. गुरुवारी झालेल्या बैठकीत अशी कोणतीही नवीन माहिती समोर आलेली नाही, ज्यामुळे नेतान्याहू यांना सत्तेतून बाहेर काढण्याचा आमचा निर्णय बदलेल. उलट, नेतान्याहू यांनी मोसादच्या प्रमुखांना अमेरिकेत पाठवले आणि त्याची माहितीही आयझेनकोट यांना दिली नाही, असा आरोप विरोधी गटाने केला आहे. तसेच, नेतान्याहू यांनी अरब पक्षांविरोधात केलेल्या विधानांवरही आयझेनकोट यांनी टीका केली आहे.

इस्रायलच्या सुरक्षेचे भविष्य आणि पुढील राजकीय दिशा

सध्या इस्रायल एका अत्यंत नाजूक वळणावर उभा आहे. एकीकडे सीमेवर युद्धजन्य स्थिती आणि इराणचा वाढता अण्वस्त्र धोका आहे, तर दुसरीकडे देशांतर्गत राजकारणात कोणताही एक गट स्पष्ट बहुमताचा आकडा गाठू शकलेला नाही. बेंजामिन नेतान्याहू यांच्या मते, जर इस्रायलमध्ये राजकीय अस्थिरता राहिली किंवा कमकुवत सरकार आले, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अण्वस्त्रधारी इराणला स्वीकारण्याचा दबाव इस्रायलवर येऊ शकतो. त्यामुळे प्रादेशिक शांतता करार वाढवण्यासाठी आणि शत्रूंचा बंदोबस्त करण्यासाठी एकजुटीचे सरकार आवश्यक आहे. आता गडी आयझेनकोट दिलेल्या मुदतीत अरब पक्षांच्या बाहेरील पाठिंब्याने सरकार स्थापन करण्यात यशस्वी होतात की इस्रायलच्या राजकारणात आणखी काही मोठे नाट्यमय वळण येते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणबाबत कोणता गंभीर इशारा दिला आहे?

    Ans: इराण पुन्हा युरेनियम संवर्धन करून अणुबॉम्ब बनवण्याच्या प्रयत्नात असून, इस्रायलवरील हा अस्तित्वाचा धोका आता कायमचा संपवण्याची वेळ आली आहे, असे विधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केले आहे.

  • Que: इस्रायलमध्ये 'राष्ट्रीय एकता सरकार' स्थापन करण्याची मागणी का होत आहे?

    Ans: इस्रायलच्या संसदेतील १२० जागांपैकी नेतान्याहू यांच्या आघाडीला ५३ आणि विरोधी आघाडीला ४८ जागा मिळाल्या आहेत. कोणत्याही गटाकडे ६१ जागांचे बहुमत नसल्याने आणि इराणचा धोका रोखण्यासाठी नेतान्याहू यांनी राष्ट्रीय एकता सरकारचे आवाहन केले आहे.

  • Que: नेतान्याहू यांनी अरब पक्षांसोबत सरकार स्थापन करण्यास विरोध का केला आहे?

    Ans: अरब पक्षांच्या पाठिंब्यावर उभे असलेले सरकार कमकुवत आणि देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरेल, तसेच ते इराणचा धोका दूर करू शकणार नाही, असा दावा नेतान्याहू यांनी केला आहे.

Web Title: Benjamin netanyahu iran nuclear threat national unity government israel hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 12:35 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Saudi Arabia : हुथींनी सौदी अरेबियावर केला मोठा हल्ला; विमान पाडल्याचा दावा; रियाधच्या दिशेने डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन
1

Saudi Arabia : हुथींनी सौदी अरेबियावर केला मोठा हल्ला; विमान पाडल्याचा दावा; रियाधच्या दिशेने डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन

US Flights : 530 उड्डाणे रद्द तर 430 विमानांना विलंब; FAA प्रमुखांनी मागितली प्रवाशांची माफी, जाणून घ्या कधी होणार सेवा पूर्व
2

US Flights : 530 उड्डाणे रद्द तर 430 विमानांना विलंब; FAA प्रमुखांनी मागितली प्रवाशांची माफी, जाणून घ्या कधी होणार सेवा पूर्व

Russia Ukraine War : रशियाच्या शांततेच्या अटी कायम; युक्रेन आक्रमक,पाश्चात्य देशांचा दृष्टिकोन मात्र बदलला
3

Russia Ukraine War : रशियाच्या शांततेच्या अटी कायम; युक्रेन आक्रमक,पाश्चात्य देशांचा दृष्टिकोन मात्र बदलला

Nvidia : ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकले टेक जगताचे बादशहा; गुप्तचर यंत्रणांचा इशारा धुडकावून ट्रम्प यांनी जेन्सन हुआंगला का वाचवले?
4

Nvidia : ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकले टेक जगताचे बादशहा; गुप्तचर यंत्रणांचा इशारा धुडकावून ट्रम्प यांनी जेन्सन हुआंगला का वाचवले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.