Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगात सर्व शक्तिशाली असलेल्या अमेरिकेच्या ‘Minuteman-III’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; पाहा ‘हा’ चित्तथरारक VIDEO

Minuteman iii Nuclear Missile : अमेरिका आणि चीनमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने एक अत्यंत धोकादायक आणि प्रबळ अणु क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून जागतिक सुरक्षेच्या समीकरणांमध्ये मोठा बदल घडवून आणला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 22, 2025 | 11:42 AM
America's 'Minuteman-III' missile the most powerful in the world successfully tested

America's 'Minuteman-III' missile the most powerful in the world successfully tested

Follow Us
Close
Follow Us:

Minuteman iii Nuclear Missile : अमेरिका आणि चीनमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने एक अत्यंत धोकादायक आणि प्रबळ अणु क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून जागतिक सुरक्षेच्या समीकरणांमध्ये मोठा बदल घडवून आणला आहे. अमेरिकन हवाई दलाच्या ग्लोबल स्ट्राइक कमांडने २१ मे रोजी कॅलिफोर्नियातील वँडेनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून ‘मिनिटमॅन-III’ या आंतरखंडीय अणु क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

या क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये इतकी प्रभावी आहेत की, चीनच्या संरक्षण यंत्रणांमध्ये चिंतेचे वारे पसरले आहेत. हे क्षेपणास्त्र ताशी तब्बल २४,००० किलोमीटर वेगाने अंतर कापण्यास सक्षम आहे आणि एकाच वेळी तीन वेगवेगळ्या लक्ष्यांवर अचूक हल्ला करू शकते. यामुळे ते केवळ शक्तिशाली नव्हे तर रणनीतीच्या दृष्टीने अतिशय घातक सिद्ध होते.

मिनिटमॅन-III: अमेरिकेची अणुशक्ती बळकट करणारे बलाढ्य शस्त्र

‘मिनिटमॅन-III’ क्षेपणास्त्राचे संपूर्ण नाव LGM-30G Minuteman-III असे आहे. हे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या त्रिस्तरीय आण्विक संरक्षण प्रणालीतील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये स्थल, जल आणि आकाशातून अणुशस्त्र हल्ल्याची क्षमता सामावलेली आहे. या क्षेपणास्त्राची बांधणी बोईंग डिफेन्स या अमेरिकन कंपनीने केली असून, त्याच्या एका युनिटची किंमत सुमारे $७ दशलक्ष (सुमारे ₹५८ कोटी रुपये) आहे. मिनिटमॅन-III हे १०,००० किलोमीटर पर्यंतचा पल्ला असलेले आंतरखंडीय क्षेपणास्त्र असून, जगातील कोणत्याही देशावर अचूक अणु हल्ला करण्याची क्षमता या एकाच शस्त्रात आहे.

Completely unrelated I’m sure: US tests Minuteman III intercontinental ballistic missile today. The unarmed nuclear-capable weapon was fired from California to the Pacific. pic.twitter.com/I633QfzhCc — 𝕋𝕙𝕖 𝔸𝕣𝕔𝕙𝕚𝕧𝕚𝕤𝕥 (@TheArchivistLC) May 22, 2025

credit : social media

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला मोहिमेत घालणार ‘हे’ अनोखे घड्याळ; खासियत जाणून बसेल आश्चर्याचा धक्काच

अत्याधुनिक इंजिन आणि तंत्रज्ञानाची सांगड

या क्षेपणास्त्रात तीन स्वतंत्र सॉलिड प्रोपेलंट रॉकेट मोटर्स लावण्यात आल्या आहेत

पहिल्या टप्प्यात: ATK M55A1 इंजिन

दुसऱ्या टप्प्यात: ATK SR-19 इंजिन

तिसऱ्या टप्प्यात: ATK SR-73 इंजिन

ही इंजिन्स मिनिटमॅन-III ला प्रचंड वेग आणि लांब पल्ल्याची क्षमता देतात. यामुळे शत्रूच्या कोणत्याही हवाई संरक्षण यंत्रणेला चुकवून हे क्षेपणास्त्र लक्ष्य गाठू शकते, असे संरक्षण विश्लेषकांचे म्हणणे आहे.

तीन स्वतंत्र अणुवॉरहेड्ससह त्रिकालाबाधित हल्ल्याची क्षमता

या क्षेपणास्त्रात तीन स्वतंत्र अणुवॉरहेड्स बसवता येतात, जे एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणांवर तडाखा देऊ शकतात. यामुळे एका प्रक्षेपणातून अनेक धोरणात्मक ठिकाणांचा नाश शक्य होतो, जे संभाव्य युद्धाच्या परिस्थितीत निर्णायक ठरू शकते.

चीनसाठी थेट इशारा आणि जागतिक प्रतिक्रिया

अमेरिकेच्या या चाचणीला भौगोलिक दृष्टिकोनातून चीनच्या दिशेने स्पष्ट इशारा मानला जात आहे. दक्षिण चीन समुद्र, तैवान व अमेरिका-चीन दरम्यान सुरू असलेले तणाव यांच्याच्या पार्श्वभूमीवर ही चाचणी रणनीतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. तज्ञांच्या मते, मिनिटमॅन-III क्षेपणास्त्राची ही चाचणी केवळ अमेरिकेची ताकद दाखवण्यापुरती नाही, तर ती संभाव्य प्रतिस्पर्ध्यांना मनोवैज्ञानिक दबावाखाली आणण्यासाठी एक स्पष्ट धोरणात्मक पाऊल आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानपेक्षा वाईट हाल होणार बांगलादेशचे? लष्करप्रमुखांच्या हातात देशाची सूत्र, युनूस हतबल

आण्विक युद्धातील अमेरिकेची आघाडी अधिक ठाम

अमेरिकेच्या मिनिटमॅन-III क्षेपणास्त्राची ही यशस्वी चाचणी केवळ अमेरिकेच्या अणुशक्तीचा विस्तारच दर्शवत नाही, तर जागतिक पातळीवरच्या सुरक्षेच्या समीकरणांमध्येही मोठा भूकंप घडवून आणते. यामुळे अमेरिका अणुशक्तीच्या आघाडीवर अधिक ठामपणे उभी राहिली आहे, आणि चीनसह इतर संभाव्य विरोधकांसाठी हा एक गंभीर आणि थेट इशारा आहे. यामुळे येत्या काळात अमेरिका-चीन यांच्यातील सामरिक तणाव अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि त्यामुळे जागतिक संरक्षणाच्या समतोलावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Web Title: Americas minuteman iii missile the most powerful in the world successfully tested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 11:42 AM

Topics:  

  • America
  • China
  • international news

संबंधित बातम्या

America Shutdown: अमेरिकेत शटडाऊन लागू, ट्रम्पच्या राष्ट्रपतीकाळात 3 वेळा सरकार ठप्प; आतातरी झुकणार का?
1

America Shutdown: अमेरिकेत शटडाऊन लागू, ट्रम्पच्या राष्ट्रपतीकाळात 3 वेळा सरकार ठप्प; आतातरी झुकणार का?

Rajasthan: भारताचे चीनवरील अवलंबित्व संपणार; राजस्थानमध्ये १४ दशलक्ष टन लिथियमचा साठा सापडला
2

Rajasthan: भारताचे चीनवरील अवलंबित्व संपणार; राजस्थानमध्ये १४ दशलक्ष टन लिथियमचा साठा सापडला

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता
3

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता

Afghanistan Internet Ban: अफगाणिस्तानचा जगाशी संपर्क तुटला! तालिबानने देशभरात इंटरनेट केले बंद; नागरिकांचे हाल
4

Afghanistan Internet Ban: अफगाणिस्तानचा जगाशी संपर्क तुटला! तालिबानने देशभरात इंटरनेट केले बंद; नागरिकांचे हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.