Annabelle Doll missing know what the truth is
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या वॉरेंस ऑकल्ट म्युझियमधील अॅनाबेल डॉलची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियावर ही डॉल म्युझियमधून गायब झाली असल्याचा दावा केला होता. अमेरिकेच्या लुइसियाना राज्यात ही डल शेवटची पाहिली गेली होती. त्यानंतर डॉल म्युझियममधून गयाब झाली असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.
अमेरिकेतील लुइसियाना मदील ऐतिहासिक नॉटोवे रिसॉर्टला आग लागली होती. या घटनेनंतर लोकांनी अॅनाबेल डॉल गायब झाल्याच्या चर्चांणा उधाण आले. अनेकांनी सोशल मीडियावर अॅनाबेल डॉल कुठे गायब झाली? हे कसे शक्य आहे? असे विचारायला सुरुवात केली. तसेच वॉरेंस ऑकल्ट म्युझियमवरही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
परंतु या अॅनाबेल डॉल गायब होण्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. न्यू इंग्लंड सोसायचीटचे फॉर सायकिक रिसर्च (NESPR) यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.यामध्ये त्यांनी एनाबेल डॉल सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगतिले की, एनाबेल डॉलला पारदर्शक काचेच्या बॉक्समध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. सोशल मीडियावरील अॅनाबेलच्या गायब होण्याच्या अफवा खोट्या आहेत. डॉल सुरक्षित आहे.
BREAKING:⁰The infamous haunted doll Annabelle — yes, the one locked in the Warren Occult Museum — has reportedly gone missing.
No confirmation if it was stolen or just vanished…⁰But it’s GONE.⁰And no one is talking.
This isn’t just about a horror movie.⁰The real Annabelle… pic.twitter.com/M9CdJeMRRM— SuzanJ (@shadowJ47) May 24, 2025
what the HELL did you mean they lost the Anabelle doll??
— ¡chama! {Eva_Tsunaka #1 FAN} (@lucknoodle74302) May 25, 2025
WHAT THE HELL DO YOU MEAN THEY LOST THE ANNABELLE DOLL??? ONE OF THE MOST HAUNTED POSSESSIONS?? THAT ANNABELLE? pic.twitter.com/U7fz1S3r3F
— Lutsana ⁷ 🌑 (@theagustdoll) May 24, 2025
अॅनाबेल डॉल ही रॅग्गी एन डॉल आहे. ही डॉल दिसालाही भयावह आहे. १९७० च्या दशकता प्रसिद्ध पारानॉर्मल संशोधक एड आणि लोरेन वॉरने यांनी या डॉलमध्ये आत्माचा वास असल्याचे म्हटले होते. या घटनेनंतर या डॉलची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली. यावर चित्रपट देखील बनवले गेले. ही डॉल अत्यंत भयावह मानली जाऊ लागली. परंतु ही डॉल कुठेही गायब झालेली नसून संग्रहालयाते ठेवलेली आहे. ही एक सामान्य डॉल आहे. सोशल मीडियावरील अफवांमुळे मोठा गोंधळ उडाला होता. परंतु अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, डॉल कुठेही गायब झालेली नसून तिच्या ठिकाणी सुरक्षित ठेवलेली आहे.