डोनाल्ड ट्रम्पला खूश करण्यासाठी थेट परिवाराशी हातमिळवणी; भेटवस्तूंची किंमत ऐकून फिरतील डोळे (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन चर्चा विषय बनत आहे. सत्तेत आल्यापासून त्यांनी घेतलेल्या निर्णयांपासून ते इतर देशांकडून मिळणाऱ्या कोट्यांवधींच्या भेटीनुळे ट्रम्प सतत चर्चेत येत आहे. दरम्यान अनेक देश ट्रम्प यांनी भेटवस्तू देऊन अमेरिकेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
व्हिएतनाम, इंडोनेशिया यांसारखे आशियाई देशांनी ट्रम्प कुटुंबाला अब्जावधी डॉलर्सचे प्रकल्प दिले आहेत. यामुळे ट्रम्प यांच्या कुटुंबीयांच्या व्यवसायिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे. अनेक देशांनी यामध्ये कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करुन ट्रम्प कुटुंबींयांना व्यवसायात अनेक सवलती दिल्या आहे. अमेरिकेशी जवळीक साधण्याच्या प्रयत्न आशियाई देश अनेक धक्कादयक निर्णय घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हिएतनामच्या विन्ह फुक प्रांतातील १३ हजार कोटीरुपयांच्या गोल्फ रिसॉर्ट ट्रम्प यांना देण्यात आला आहे. याला ट्रम्प इंटरनेशनल गोल्फ रिसॉर्ट प्रकल्प नाव देण्यात आले आहे. व्हिएतनाम सरकारने याला राष्ट्रीय प्राधान्यता दिली आहे. यामध्ये भूसंपादन आणि आर्थिक तपासणींच्या प्रक्रियांना कायदेशीर बाबींचे पालन न करता मान्यता देण्यात आली आहे.
हा प्रकल्प ट्रम्प कुटुंबीयांशी संबंधित आहे. तसेच इंडोनेशियातील बाली आणि पश्चिम जावामध्ये देखील ट्रम्प यांच्या कुटुंबाला हॉटेल्स आणि गोल्फ कोर्ससारखे प्रकल्पांची ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये कायदेशीर प्रक्रियांना दुर्लक्ष करण्यात आले आहे.
व्हिएतनाम आणि इंडोनेशियाव्यतिरिक्त तुर्की आणि अझरबैजानने ट्रम्प कुटुंबालवा आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. इस्तंबूलमध्ये तुर्कीने ट्रम्प टॉवर्स आणि कार्यालये सुरु करण्याचा प्रकल्प ट्रम्प कुटुंबाला देऊ केला आहे. यामध्ये डोगन होल्डिंगसोबत भागीदारी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे अझबैजानने ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेल हा प्रकल्प उद्योगपती मम्माडोव्ह यांच्या सहकार्यने तयार केला आहे. फिलिपिन्सने देखील ट्रम्प कुटुंबाला एक मोठी ऑफर देण्याचा विचार केला आहे. यासाठी पडद्यामागून लॉबिंग सुरु आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारने ट्रम्प यांच्या एआय प्रकल्पातील भागीदारीसाठी दोन हजार मेगावॅट वीज वाटपाला मंजुरी दिली आहे. या विजेचा वापर करुन बिटकॉइन मायनिंग केले जाणार आहे. अलीकडेच पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करण्याच्या हेतूने क्रिप्टोकरन्सीला कायदेशीर मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.
याशिवाय, कतार सरकारकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बोईंग ७४७-८ जंबो जेट भेट म्हणून दिले आहे. याचा वापर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या एअर फोर्स वन म्हणून केला जाणार आहे.